आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासामनावीर जेस जाेनासन (२९) आणि मरिझेन कापने (३२) अभेद्य भागीदारीतून दिल्ली कॅपिटल्स संघाचा महिला प्रीमियर लीगमध्ये चाैथा विजय साजरा केला. मेग लॅनिंगच्या नेतृत्वाखाली दिल्ली संघाने साेमवारी स्मृती मानधनाच्या राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा पराभव केला. दिल्ली कॅपिटल्स संघाने १९.४ षटकांमध्ये सहा गड्यांनी सामना जिंकला. यामुळे बंगळुरू संघाला यंदाच्या पहिल्या सत्रातील लीगमध्ये सलग पाचव्या पराभवाचा सामना करावा लागला. प्रथम फलंदाजी करताना बंगळुरू संघाने ४ बाद १५० धावा काढल्या. प्रत्युत्तरामध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाने २ चेंडू आणि सहा गडी राखून विजयश्री खेचून आणली. संघाच्या विजयामध्ये अलीसे कॅपसीने ३८, जेमिमा राॅड्रिग्जने ३२ धावांचे याेगदान दिले. यादरम्यान कर्णधार मेग १५ आणि शेफाली वर्मा शून्यावर बाद झाली. दरम्यान, दिल्ली संघाची गाेलंदाज शिखा पांडे चमकली. तिने चार षटकांमध्ये २३ धावा देताना ३ बळी घेतले. गुजरातसमाेर आज मुंबईचे आव्हान कर्णधार हरमनप्रीतच्या नेतृत्वाखाली फाॅर्मात असलेला मुंबई इंडियन्स संघ मंगळवारी महिला प्रीमियर लीगमध्ये सलग पाचवा विजय साजरा करण्यासाठी सज्ज झाला आहे. याची मुंबई संघाला माेठी संधी आहे. मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्स संघांमध्ये आज मंगळवारी सामना हाेणार आहे. ब्रेबाॅर्न स्टेडियमवर हे दाेन्ही संघ सांयकाळी ७.३० वाजेपासून समाेरासमाेर असतील. हरमनप्रीतच्या नेतृत्वाखाली मुंबई संघाने सलग ४ विजय संपादन केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.