आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराफेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात प्रस्तावित महिला प्रीमियर लीगचा (डब्ल्यूपीएल) खेळाडूंचा लिलाव पुढे ढकलला. आता खेळाडूंचा लिलाव ११ फेब्रुवारीला दिल्ली किंवा १३ फेब्रुवारीला मुंबईत आयोजित केला जाईल. अंतिम निर्णय बीसीसीआयकडून शेवटच्या आठवड्यात घेतला जाईल. लिलाव पुढे ढकलण्याचे कारण यूएईमध्ये सुरू असलेली आयएलटी टी-२० व द. आफ्रिकेत सुरू असलेली एसए टी-२० लीग आहे. महिला प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स, लखनऊ सुपर जायंट्ससह ज्या फ्रँचायझी खरेदी केल्या आहेत त्यांचेच संघ या लीगमध्ये खेळतात. अशात कर्मचारी-पदाधिकारी व्यग्र असल्याने लिलाव पुढे ढकलला. या संघांनी बीसीसीआयला लिलावाच्या तारीखेत बदल करण्याची विनंती केली होती.
झुलन मुंबईची गोलंदाजी प्रशिक्षक व मेंटॉरदेखील भारताची माजी वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी डब्ल्यूपीएलमध्ये मुंबई संघाची गोलंदाजी प्रशिक्षक व मेंटॉरची भूमिका बजावेल. झूलन मुंबईत सहभागी झाल्याची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही, मात्र दिल्ली कॅपिटल्स संघाचे संचालक सौरव गांगुलीने माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.