आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Women's Premier League | Bangalore's Chaitha Defeat; Warriors Won By 10 Wickets

महिला प्रीमियर लीग:बंगळुरूचा चाैथा पराभव; वाॅरियर्ज 10 गड्यांनी विजयी

मुंबई21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सामनावीर कर्णधार अलिसा हेली (९६) आणि देविका वैद्यने (३६) अभेद्य शतकी भागीदारीतून यूपी वाॅरियर्ज संघाचा महिला प्रीमियर लीगमध्ये माेठा विजय साजरा केला. हेलीच्या नेतृत्वाखाली वाॅरियर्ज संघाने शुक्रवारी स्पर्धेतील आपल्या तिसऱ्या सामन्यामध्ये स्मृती मानधनाच्या राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू टीमचा पराभव केला. युपी वाॅरियर्जने १३ षटकांत १० गड्यांनी सामना जिंकला. यासह संघाने स्पर्धेत माेठ्या विजयाची नाेंद केली. यादरम्यान सुमार फलंदाजी आणि गाेलंदाजीमुळे बंगळुरू संघाला सलग चाैथ्या पराभवाचा सामना करावा लागला. प्रथम फलंदाजी करताना बंगळुरू संघाने १९.३ षटकांत अवघ्या १३८ धावांत डाव गुंडाळला. प्रत्युत्तरात यूपी वाॅरियर्ज संघाने १३ षटकांत १० गड्यांनी विजयश्री खेचून आणली. वाॅरियर्ज संघाकडून साेफिईने ४ व दीप्ती शर्माने ३ बळी घेतले. गुजरात टीमसमाेर आज दिल्ली संघाचे आव्हान : विजयी ट्रॅकवर आलेल्या गुजरात संघाला महिला प्रीमियर लीगमध्ये आता बलाढ्य दिल्ली कॅपिटल्सच्या आव्हानाचा सामना करावा लागणार आहे. हे दाेन्ही संघ आज शनिवारी समाेरासमाेर असतील. सलगच्या दाेन पराभवानंतर गुजरात संघाने गत सामना जिंकला. दाेन विजयांनंतर दिल्ली संघाला पहिल्या पराभवाला सामाेरे जावे लागले.

बातम्या आणखी आहेत...