आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Women's Premier League | The League Will Be In Demand For All rounders; Smriti, Deepti Will Become Icons

महिला प्रीमियर लीग:लीगमध्ये असेल अष्टपैलू खेळाडूंना मागणी; स्मृती, दीप्ती ठरतील आयकाॅन

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • येत्या 13 फेब्रुवारीदरम्यान पहिल्या सत्राच्या लीगसाठी रंगणार लिलाव प्रक्रिया गत दाेन वर्षांत ९ क्रिकेटपटूंच्या ३००+ धावांसह २०+ विकेट

पहिल्या सत्रातील महिला प्रीमियर लीगच्या आयाेजनाची तयारी आता शेवटच्या टप्प्यात आहे. यासाठी येत्या १३ फेब्रुवारीदरम्यान पहिल्या लिलाव प्रक्रियेचे आयाेजन केले जाणार आहे. यादरम्यान सर्वाधिक मागणी अष्टपैलू खेळाडूंना असणार आहे. कारण, याच आॅलराउंडर कामगिरीच्या बळावर टीमचा विजयाचा मार्ग अधिक सुकर हाेताे. त्यामुळेच आॅलराउंडर खेळाडूंच्या सहभागावरच संघांचा अधिक भर असेल. गत दाेन वर्षांमध्ये भारतातील आॅलराउंडर खेळाडूंची कामगिरी लक्षवेधी ठरली. भारताच्या ९ क्रिकेटपटूंनी गत दाेन वर्षांमध्ये ३०० पेक्षा अधिक धावा काढल्या. याशिवाय त्यांच्या नावे २० पेक्षा अधिक बळींची नाेंद आहे. त्यामुळेच या महिला लीगमध्येही आॅलराउंडर खेळाडूंचाच दबदबा राहण्याचे चित्र आहे. यादरम्यान जगातील नंबर वन आॅलराउंडर अॅश्ले गार्डनरला अधिक मागणी असेल. तिने गत दाेन वर्षांत लक्षवेधी कामगिरी करताना ३०० पेक्षा अधिक धावा काढल्या आहेत. त्यामुळे आता तिला अधिक मागणी असणार आहे. त्यापाठाेपाठ भारताची स्मृती मानधना, युवा विश्वचषक विजेत्या संघातील शेफाली वर्मा, श्वेता सहरावत, गाेलंदाज पार्श्वी सिंग यांनाही माेठी संधी मिळण्याचे चित्र आहे. भारताच्या युवांची कामगिरी गत दाेन वर्षांतील आंतरराष्ट्रीय सामन्यांत उल्लेखनीय ठरलेली आहे.

युगांडा-यूएईतील खेळाडूंना मिळणार संधी : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आयसीसीशी संलग्न असलेल्या देशातील युवा महिला खेळाडूंनाही लीगमध्ये सहभागी हाेण्याची संधी दिली आहे. त्यामुळेच युगांडासह यूएईमधील महिला क्रिकेटपटूंनीही या लीगमध्ये सहभागी हाेण्याचा निर्णय घेतला. या दाेन्ही देशांतील खेळाडूंची कामगिरी लक्षवेधी ठरलेली आहे. त्यांच्या नावे सर्वाेत्तम कामगिरीची नाेंद आहे. गत दाेन वर्षांमध्ये टाॅप-स्काेअरर पाच फलंदाजांमध्ये यूएईच्या तीन महिलांचा समावेश आहे. या गटात भारताची स्मृती मानधना दुसऱ्या स्थानी आहे. तसेच सर्वाधिक बळी घेणाऱ्या टाॅप-५ गाेलंदाजांमध्येही युगांडा आणि यूएईच्या खेळाडूंना आपली छाप पाडता आली. याशिवाय टांझानिया, बांगलादेश आणि आयर्लंडच्या महिला खेळाडूंही या लीगदरम्यान खेळताना दिसणार आहेत. संघातील ११ पैकी ५ महिला खेळाडू विदेशी असतील.

लीगमध्ये संघ १२ काेटींत खरेदी करू शकतील १८ खेळाडू
महिला लीगमध्ये सहभागी हाेणाऱ्या संघांकडे प्रत्येकी १२ काेटींची पर्स आहे. यातून त्यांना आपला १८ सदस्यीय संघ तयार करावा लागणार आहे. त्यामुळे आता हे संघ १२ काेटींत १८ खेळाडूंवर बाेली लावणार आहेत. यादरम्यान सध्या जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेल्या दीप्ती शर्मावर माेठी बाेली लागण्याचे चित्र आहे. तसेच याच शर्यतीत युगांडा संघाची जनेत एमबाबाजीचाही समावेश आहे.

२०२१ ते आजपर्यंत असाेसिएट नेशन्सचे सात शतकवीर; ४ खेळाडूंच्या ६००+ धावा
महिला क्रिकेटमध्ये असाेसिएट नेशन्सच्या खेळाडूंचा दबदबा कायम ठेवला आहे. त्यामुळेच त्यांना २०२१ पासून आजतागायत क्रिकेटच्या मैदानावर आपले वर्चस्व राखता आले. याच संघांच्या ७ महिला क्रिकेटपटूंनी शतकवीरचा बहुमान पटकावला. तसेच चार महिला फलंदाजांच्या नावे ६०० पेक्षा अधिक धावांचीही नाेंद आहे.

टॉप-5 स्कोअरर : भारत-यूएईचा दबदबा (जाने. २०२१ पासून) फलंदाज डाव धावा संघ कविशा 25 696 यूएई स्मृती 25 680 भारत एषा 23 675 यूएई तीर्था 26 658 यूएई हरमनप्रीत 22 612 भारत

टॉप-5 गाेलंदाजांमध्ये एकट्या युगांडाच्या ३ महिला गाेलंदाज; आॅस्ट्रेलियाची एकही नाही गाेलंदाजांमध्येही जागतिक स्तरावर युगांडा संघाच्या खेळाडूंना आपला दबदबा कायम ठेवता आला. संघाच्या तीन गाेलंदाजांजी टाॅप विकेट टेकर अव्वल पाचमध्ये स्थान मिळवले. भारताची दीप्ती यात आहे.

फक्त तीन महिला गाेलंदाजांनी घेतल्या ३० पेक्षा अधिक विकेट गाेलंदाज डाव विकेट संघ अवेको 26 40 युगांडा दीप्ती शर्मा 28 37 भारत एम्बाबाजी 25 36 युगांडा अकितेंग 24 29 युगांडा वैष्णवी 25 29 यूएई

बातम्या आणखी आहेत...