आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Women's Premier League | Warriors' Victory 'Kiran'etsav, Gujarat Giants' Second Defeat In A Row

महिला प्रीमियर लीग:वाॅरियर्जचा  विजयी  'किरण'ाेत्सव, गुजरात जायंट्स संघाचा सलग दुसरा पराभव

मुंबई25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • यूपी वाॅरियर्ज ३ गड्यांनी विजयी; किरणचे अर्धशतक

साेलापूरच्या किरण नवगिरे (५३) आणि सामनावीर ग्रीस हॅरिसने (नाबाद ५९) झंझावाती खेळीतून युपी वाॅरियर्ज संघाला रविवारी पहिल्या सत्रातील महिला प्रीमियर लीगमध्ये राेमहर्षक विजय मिळवून दिला. अलिसा हिलीच्या नेतृत्वाखाली युपी वाॅरियर्जने स्पर्धेतील आपल्या पहिल्याच सामन्यात गुजरात जायंट्सचा पराभव केला. युपी वाॅरियर्जने १९.५ षटकांत ३ गड्यांनी सामना जिंकला. यासह या संघाला किताबाच्या आपल्या माेहिमेला सुरुवात करता आली.

दरम्यान, स्नेह राणाच्या नेतृत्वाखाली गुजरात संघाला स्पर्धेत सलग दुसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला. गुजरात संघाचा गत सामन्यात शनिवारी मुंबई इंडियन्स टीमने पराभव केला.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना गुजरात जायंट्स संघाने ६ बाद १६९ धावा काढल्या हाेत्या. प्रत्युत्तरामध्ये यूपी वाॅरियर्ज संघाने ७ गड्यांच्या माेबदल्यामध्ये विजयश्री खेचून आणली. संघाच्या विजयासाठी किरण नवगिरे आणि ग्रीस हॅरिसची अर्धशतकी खेळी महत्त्वपूर्ण ठरली. यामुळे संघाला राेमहर्षक विजय साजरा करता आला. धावांचा पाठलाग करताना युपी वाॅरियर्ज संघाची निराशाजनक सुरुवात झाली हाेती. सलामीवीर कर्णधार हिली ७ आणि श्वेता सेहरावत अवघ्या ५ धावांवर बाद झाली. मात्र, त्यानंतर तिसऱ्या स्थानी फलंदाजीसाठी आलेल्या किरणने संघाचा डाव सावरला. दरम्यान तहिला भाेपळा न फाेडताच बाद झाली. किरणने यादरम्यान आपली सहकारी दीप्ती शर्मासाेबत चाैथ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी संघाच्या विजयाचा मार्ग सुकर केला. तिने ४३ चेंडूंचा सामना करताना ५ चाैकार आणि २ उत्तंुग षटकार खेचले. यामुळे तिला महिला प्रीमियर लीगमध्ये पदार्पणात अर्धशतकवीरचा बहुमान संपादन करता आला. त्यानंतर ग्रीस हॅरिस आणि साेफियाने (२२) अभेद्य अर्धशतकी भागीदारीतून यूपी वाॅरियर्ज संघाचा विजय निश्चित केला.

बातम्या आणखी आहेत...