आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • Workout Only On Expert Advice; Social Media, Ignoring The Guide On WhatsApp: Bajrang Punia

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी इंटरव्ह्यू:फक्त तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच करताे वर्कअाऊट; साेशल मीडिया, व्हाॅट्सअॅपवरील गाइडकडे दुर्लक्ष : बजरंग पुनिया

चंदिगड10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • टाेकियाे अाॅलिम्पिक तयारीसाठी मेहनत करत अाहे कुस्तीपटू बजरंग
  • विदेशात सराव नसल्याने कामगिरीवर परिणाम होणार!

काेराेनामुळे गत दाेन महिन्यांपासून स्पाेर्ट््स इव्हेंट पूर्णपणे बंद अाहेत. याशिवाय अनेक माेठ्या स्पर्धांच्या अायाेजनाला स्थगितीही देण्यात अाली. अशामुळे सध्या अनेक खेळाडू अडचणीत अाहेत. त्यामुळे अनेकांना विदेशात तंत्रशुद्ध अशा प्रशिक्षणाला मुकावे लागले. यातून खेळाडूंमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. अशा संकटात मी फक्त एक्स्पर्टचा सल्लाच मानताे. त्यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसारच मी वर्कअाऊट करत अाहे, अशा शब्दांत अाॅलिम्पियन कुस्तीपटू बजरंग पुनियाने अापली अाॅॅलिम्पिक तयारीबाबतची माहिती दिली. टाेकियाे अाॅलिम्पिकच्या तयारीवरच अापण अधिक लक्ष केंद्रित केले अाहे. हे करताना मी साेशल मीडिया अाणि व्हाॅट्सअॅपवरील गाइडकडे दुर्लक्ष करताे, असेही त्याने सांगितले.

लाॅकडाऊनमध्ये तयारी कशी? रुटीन कसे अाहे? फिटनेसवर परिणाम पडेल का? मी सध्या घरीच सराव करत अाहे. माझ्या मनात काेणत्याही प्रकारची भीती नाही. घरात मॅट अाणि जिममधील माेजक्याच इक्विपमेंट्सच्या अाधारे मी ट्रेनिंग करत अाहे. माझ्यासाेबत ट्रेनिंग पार्टनर अाणि फिजिअाे अाहेत. त्यामुळे नित्यनेमाने माझा सराव सुरू अाहे. दर्जेेदार कामगिरीमध्ये सातत्य ठेवता येईल. फिटनेसवर काहीही परिणाम पडला नाही.

{अाॅलिम्पिक स्थगितीचा काही परिणाम? नवीन काही डावपेच ? टाेकियाे अाॅलिम्पिकला वर्षभरासाठी स्थगिती देण्यात अाली. याच्याकडे अाम्ही सकारात्मक नजरेने पाहत अाहाेत. त्यामुळे सराव करण्याला अधिक वेळ मिळत अाहे. त्यामुळे दुबळ्या बाजू दूर करण्यावर अधिक मेहनत घेत अाहे. नवीन डावपेच अाखले अाणि त्यावरच काम करत अाहे. त्याचा मला माेठा फायदा हाेईल.

{क्रीडामंत्र्यांनी ६ ते १० पदकांची अपेक्षा व्यक्त केली? किती पदके मिळतील? देशभरातील चाहते अाणि क्रीडामंत्र्यांकडून पदकाविषयीच्या माेठ्या अपेक्षा अाहेत. त्यामुळेच सर्वांना टाेकियाेत माेठ्या संंख्येत पदक मिळतील असे वाटतेे. तसे हाेईलही. कारण, भारतीय मल्ल सध्या फाॅर्मात अाहेत. याचा परिणाम कामगिरीवर पडणार अाहे.

{विदेश दाैऱ्यावर बंदीने फटका बसेल का? हाेय. विदेशातील तंत्रशुद्ध प्रशिक्षणामुळे पदकाची अाशा अाणि दावा अधिक पटीने मजबूत हाेताे. मात्र, यंदा काेराेनामुळे विदेशात सराव करणे शक्य नाही. अशा परिस्थितीमध्ये काहीसे निराशाजनक वातावरण अाहे. मात्र, मेहनत घेऊन अाम्ही ही उणीव भरून काढणार अाहाेत.

{कुस्ती हा काॅन्टॅक्ट गेम अाहे? काेराेनानंतर यात काही बदल हाेईल का? कुस्ती हा काॅन्टॅक्टचा गेम अाहे. त्यामुळे निश्चितच काेराेनाच्या गंभीर परिस्थितीमध्ये या खेळाबाबत नवीन अाणि कडक नियम तयार हाेतील. यातून कुस्तीपटूंच्या मनातील काेराेनाविषयीची भीती दूर हाेण्यास मदत हाेईल. याशिवाय मेडिकल फिल्डचे एक्सपर्ट अाणि डाॅक्टर्स यांच्या नियमाचे पालन करावे लागणार अाहे. यामुळे खेळाडूंना अापल्या अाराेग्याची काळजी घेता येईल.

बातम्या आणखी आहेत...