आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • World Athletics | For The First Time India Won The Silver, Neeraj Chopra 88.133 M. Silver Medal Won In Javelin Throw

जागतिक अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद:प्रथमच भारताला 'नी'रजत, नीरज चोप्राने 88.13३ मी. भालाफेक करून मिळविले रौप्यपदक

युजीन/पानिपत6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भालाफेकीत सुवर्ण पटकावणारा हरियाणाचा नीरज चाेप्रा याने जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत रविवारी चौथ्या प्रयत्नात ८८.१३ मी. भाला फेकून रौप्यपदक जिंकले. ग्रेनाडाच्या अँडरसन पीटर्सने ९०.५४ मी. भालाफेक करत सुवर्ण जिंकले. स्पर्धेच्या ३९ वर्षांच्या इतिहासात देशाला मिळालेले हे पहिले रौप्यपदक आहे. २००३ मध्ये लांब उडीत अंजू बॉबी जॉर्जने कांस्यपदक जिंकले होते.

नीरज चोप्राशी दिव्‍य मराठीचा विशेष संवाद...
रौप्यपदकावर समाधानी, पण पूर्ण संतुष्ट नाही
-सुवर्णाची आशा, कामगिरी कमी पडली ?

रौप्यपदक मिळवून मी आनंदी आहे, परंतु या कामगिरीवर पूर्ण संतुष्ट नाही. स्पर्धेदरम्यान हवेची दिशा वेगळी होती तरीही मी माझ्या वतीने सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न केला. पुढील वेळी निश्चित सुवर्णपदक जिंकेन.

-अँडरसनचे आव्हान कायम, रणनीती बदलणार?
अँडरसनने सलग ९० मीटर भालाफेक कशी केली हे तोच सांगू शकतो. मी माझ्या तंत्रावरच लक्ष केंद्रित करेन. आता फार वेळ हाती नाही. कॉमनवेल्थ स्पर्धा समोर आहेत. कुणाची कॉपी करण्यापेक्षा स्वत:चे तंत्र भक्कम करण्यावर भर देईन.

आशा बाळगणे खरे आहे, परंतु खेळात रोज स्थिती एकसारखी नसते. सुवर्णपदकाची मला जिद्द आहेच. अर्थात, प्रत्येक वेळी सुवर्णपदक जिंकू शकत नाही. - नीरज चोप्रा

^नीरज चोप्राच्या या कामगिरीबद्दल त्याचे अभिनंदन. भारतीय क्रीडा क्षेत्रासाठी हा आनंदाचा क्षण आहे. पुढील स्पर्धेसाठी त्याला शुभेच्छा.-नरेंद्र मोदी, पंतप्रधान

बातम्या आणखी आहेत...