आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अॅथलेटिक्स:मास्क घालून, स्वत:ला सॅनिटाइझ केल्यानंतरच खेळाडू मैैदानावर हाेतील दाखल

मोनॅको9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जागतिक अॅथलेटिक्सची आरोग्य व सुरक्षेची नियमावली

जागतिक अॅथलेटिक्सने कोरोना व्हायरसमुळे आरोग्य व सुरक्षेच्या बाबतीत नियमावली जाहीर केली. यात स्पर्धापूर्व, स्टेडियम, स्पर्धा आणि खेळाडूंसाठी विशेष उपायांचा समावेश आहे. खेळाडूने मास्क घातला आणि स्वत:ला सॅनिटाइझ केले असेल तरच स्पर्धास्थळी जाता येईल.

1. प्री-इव्हेंट : आयोजन समिती प्रत्येक खेळाडूला वेलकम किट देईल. त्यात प्रत्येक दिवसाप्रमाणे ३ मास्क, सॅनिटायझर, संसर्ग राेखणारे कपडे आणि त्यांच्या क्रीडाप्रकारानुसार सुरक्षा व संबंधित नियमांची माहिती पुस्तिका असेल.

- विमानतळ किंवा स्टेशन ते हॉटेलपर्यंत येताना वाहनचालकासह सर्वांना मास्क वापरणे आवश्यक. सर्वांमध्ये सुरक्षित अंतर असेल.

2. स्टेडियममध्ये चाहते व स्पर्धा संबंधित लोकांना येण्यासाठी वेगवेगळे मार्ग असावेत. खेळाडूंना तेव्हाच प्रवेश द्यावा, जेव्हा मास्क घातलेला असावा आणि स्वत:ला सॅनिटाइझ केलेले असावे.

- स्टेडियममध्ये सर्वांना मास्क घालणे बंधनकारक. व्यायाम व स्पर्धादरम्यान खेळाडूंना सूट असेल.

- वॉर्मअप करण्यासाठी मोठी खुली जागा असावी, ती स्पर्धा होत असलेल्या स्टेडियमजवळ असावी. खेळाडूंना वेगवेगळ्या वेळेत बोलावले जावे. सर्वांकडे आपापले सुरक्षेचे साहित्य असावे.

-बाहेरील जागेवर लॉकरूम असावी. येथेही खेळाडूंना मास्क अनिवार्य. प्रत्येक खेळाडूच्या वापरानंतर साहित्य सॅनिटाइझ केले जावे.

3. कॉम्पिटिशन: मैदानावर कमीत कमी खेळाडू असावेत. ऑफिशियल खेळाडूंच्या संपर्कात येतात. मैदानावर त्यामुळे त्यांना मास्क व फेस शील्ड घालावी लागेल.

- अंतिम रेषा पार केल्यानंतर खेळाडूंनी चाहते व ऑफिशियल्स यांच्यापासून दूर राहावे.

4. स्पर्धेनंतरचे नियाेजन : माध्यम विभागाबाहेर बनवायला हवे. लाेकांची कमीत कमी संख्या असावी. माध्यम व खेळाडूंदरम्यान पातळ ग्लास असायला हवा आणि प्रत्येक चर्चेनंतर त्याला सॅनिटाइझ करावे.

- मैदानावर जास्तीत जास्त व्यक्ती खेळणाऱ्या असाव्या. थेट पुरस्कार वितरण सोहळा नसावा. त्याची डिजिटल व्यवस्था करावी.

5. इतर महत्त्वपूर्ण उपाय : प्रत्येक शर्यतीनंतर स्टार्टिंग ब्लॉक सॅनिटाइझ केले जावे.

- स्टीपलचेस शर्यतीदरम्यान ज्या पाण्याचा वापर केला जातो त्यात क्लोरीन मिसळणे आवश्यक.

- रिले शर्यतीदरम्यान बॅटनला प्रत्येक वेळी उपयोगानंतर सॅनिटाइझ केले जाईल. रिले संघाने शर्यतीनंतर एकत्र येणे आणि गळाभेट घेणे टाळावे.

- व्हर्टिकल जंपदरम्यान प्रत्येक संधीनंतर हाताला सॅनिटायझर

- प्रत्येक उडीनंतर ऑफिशियलकडून लॅडिंग मॅटला स्वच्छ केले जावे. पुनर्वापराच्या प्लास्टिक किंवा टिश्यूचा पातळ थराचा जंपिंग मॅटवर वापर करायला हवा. उडी मारल्या जाणाऱ्या मातीमध्ये केमिकलचा वापर करावा, ज्यामुळे संक्रमण होऊ नये.

- वस्तू फेकल्या जाणाऱ्या प्रकारात ऑफिशियलला प्रत्येक वेळी वापर झाल्यानंतर हात स्वच्छ वा डिस्पोजेबल ग्लोव्हजचा उपयोग करावा लागेल.

- एकत्र स्पर्धेदरम्यान खेळाडू ज्या खोलीचा उपयोग करतात त्याऐवजी खुल्या जागेचा वापर व्हावा. प्रशिक्षकांनी इलेक्ट्राॅनिक वस्तूच्या माध्यमातून त्यांच्याशी चर्चा करावी.

बातम्या आणखी आहेत...