आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॅडमिंटनच्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेला रविवारी ह्युलवा येथील कॅरोलिना मारिन स्पोर्ट््स पॅलेसमध्ये सुरुवात होत आहे. यामध्ये पीव्ही सिंधूच्या नेतृत्वाखाली भारतातील २५ खेळाडू सहभागी होत आहेत. दोन वेळेची ऑलिम्पिक पदक विजेता सिंधू गतविजेती आहे. तिने २०१९ मध्ये बासेल येथे विजेतेपद पटकावले. त्यानंतर ती या खेळातील भारताची पहिली विश्वविजेती ठरली. २६ वर्षीय खेळाडूने चॅम्पियनशिपमध्ये एक सुवर्ण, दोन रौप्य आणि दोन कांस्यपदके जिंकली आहेत. आता तिला सर्वाधिक ६ पदके जिंकणारी पहिली महिला खेळाडू हाेण्याची संधी असेल. तिचे व चीनच्या झेंग निंगची प्रत्येकी पाच पदके आहेत. सलग तीन स्पर्धांमध्ये उपांत्य फेरी गाठताना तिने वर्ल्ड टूर फायनल्समध्ये रौप्यपदक जिंकले. तीन वेळची चॅम्पियन कॅरोलिना मारिन आणि २०१७ ची विजेती नोझोमी ओकुहाराने स्पर्धेतून माघार घेतली.
कांस्यविजेत्या साई प्रणीतचा सलामी सामना मार्क केलजोशी
पुरुष एकेरीत १२ व्या मानांकित किदांबी श्रीकांतचा सामना स्पॅनिश खेळाडू पाब्लो अबियन आणि कांस्यपदक विजेत्या बी साई प्रणीतचा हॉलंडच्या मार्क केलजोशी होईल. माजी नंबर-१० खेळाडू एचएस प्रणय आठव्या मानांकित लाेंग एंगसशी भिडेल, तर लक्ष्य सेनच्या प्रतिस्पर्ध्यांनी चॅम्पियनशिपमधून माघार घेतली आहे. दुहेरीत भारताच्या ११ जोड्या सहभागी होत आहेत. ५० देशांतील ३३७ खेळाडू या स्पर्धेत भाग घेत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.