आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • World Cadet Wrestling Championship 2021 Indian Women's Team Won 3 Gold And 2 Bronze Medals; Indian Team In Second Place With 139 Points Priya Malik; News And Live Updates

सुवर्ण पदकाचा गोंधळ:प्रिया मलिकने वर्ल्ड कॅडेट रेसलिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले; चाहत्यांनी ऑलिम्पिक पदक समजले

बुडापेस्ट3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मीराबाईने वेटलिफ्टिंगमध्ये रौप्यपदक जिंकले

हंगेरी येतील बुडापेस्टमध्ये सुरू असलेल्या जागतिक कॅडेट कुस्ती स्पर्धेत भारताच्या प्रिया मलिकने 73 किलो वजन गटात सुवर्णपदक जिंकले आहे. या स्पर्धेत भारतीय मुलींनी 3 सुवर्णांसह एकूण 5 पदके जिंकली आहेत. परंतु, इकडे भारतात काही फॅन्स फॉलोव्हर्संना प्रियाच्या या यशानंतर तीने टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकले असा गैरसमज झाला आहे. सध्या सोशल मीडियावर प्रियाची जोरदार चर्चा सुरु आहे.

प्रियाने अंतिम फेरित 5-0 ने जिंकली
अंतिम फेरीत प्रियाने बेलारशियन कुस्तीपटूचा 5-0 असा पराभव केला. प्रिया व्यतिरिक्त आणखी दोन भारतीय पैलवानांनी सुवर्ण तर दोन कुस्तीगीरांनी कांस्यपदक जिंकले आहे. दरम्यान, तन्नूने 43 किलो व कोमलने 46 किलोमध्ये सुवर्णपदक जिंकले आहेत. तर दुसरीकडे, वर्षाने 65 किलो वजन गटात कांस्यपदक तर अंतिमने 53 किलो वजन गटात कांस्यपदक जिंकले आहे. या चॅम्पियनशिपमध्ये भारताने मुलींच्या गटात एकूणच द्वितीय क्रमांक पटकावला आहे. अमेरिकेची टीम प्रथम आणि रशियाची टीम दुसऱ्या स्थानांवर राहिली आहे.

कॅडेट वर्ग म्हणजे काय?
कॅडेटमध्ये 15 ते 17 वयोगटातील खेळाडू भाग घेऊ शकतात. कुस्तीतील जागतिक कॅडेट चँपियनशिपमध्ये 10-10 वजन गटांचा समावेश आहे.

मीराबाईने वेटलिफ्टिंगमध्ये रौप्यपदक जिंकले
टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने पहिले पदक जिंकले आहे. वेटलिफ्टर मीराबाई चानूने महिलांच्या 49 किलो वजन गटात एकूण 202 किलोग्रॅम वजन उचलून रौप्य पदक जिंकले. चीनच्या हौ झीहुईने 210 किलो वजन उचलून सुवर्णपदक जिंकले. इंडोनेशियाच्या कांटिका विंडीने कांस्यपदक जिंकले.

बातम्या आणखी आहेत...