आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फुटबाॅल:वर्ल्ड चॅम्पियन अर्जेंटिना आता नंबर वन संघ

झुरिच2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

फिफा विश्वचषक विजेत्या अर्जेंटिनाने आता जगातील नंबर वन फुटबाॅल संघ हाेण्याचा बहुमान मिळवला आहे. अर्जेंटिनाने नुकत्याच झालेल्या दाेन मैत्रीपूर्ण आंतरराष्ट्रीय सामन्यांत दणदणीत विजय संपादन केले. याच विजयातून अर्जेंटिनाला क्रमवारीत नंबर वनचे स्थान गाठता आले. मेसीच्या नेतृत्वात अर्जेंटिना संघाने फिफा विश्वचषक पटकावला. आता अर्जेंटिना संघाने सहा वर्षांनंतर पुन्हा नंबर वनचे स्थान पटकावले. यामुळे ब्राझील संघाला माेठा धक्का बसला. संघाची क्रमवारीमध्ये तिसऱ्या आणि विश्वचषकातील उपविजेत्या फ्रान्सची दुसऱ्या स्थानावर ‌घसरण झाली. भारतीय संघाने १०१ वे स्थान गाठले. संघाला क्रमवारीमध्ये पाच स्थानांचा माेठा फायदा झाला.