आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
बुधवार व गुरुवारी खेळाडू क्लब फुटबॉल सोडून आपापल्या देशाच्या संघात दाखल झाले. काहींनी आपल्या संघाला मोठा विजय मिळवून दिला आणि काही छोट्या संघाकडून मोठ्या टीमचा धक्कादायक पराभव झाला. काही स्टार खेळाडू चमकले, तर काही अपयशी ठरले. पॅरिसमध्ये झालेल्या सामन्यात जागतिक विजेत्या फ्रान्सला पराभवाचा सामना करावा लागला. रँकिंगमध्ये ५५ व्या स्थानावरील फिनलंडने जगातील नंबर-२ टीम फ्रान्सला त्यांच्या घरच्या मैदानावर २-० ने हरवले. हा फिनलंडचा फ्रान्सवर पहिला विजय ठरला. दोघांत १९६० मध्ये पहिला सामना झाला होता. आतापर्यंतच्या ८ सामन्यांमध्ये फ्रान्सने विजय मिळवला. पॅरिसच्या स्टेड डी फ्रान्स स्टेडियममध्ये फिनलंडकडून मार्क्स फॉर्सने २८ व्या व वलाकारीने ३१ व्या मिनिटाला गोल केला. फ्रान्सच्या टीममध्ये मँचेस्टर युनायटेडचा पोग्बा, एव्हर्टनचा डिगने व चेल्सीचा गिराऊडदेखील होते.
राेनाल्डाेच्या गाेलने पाेर्तुगालचा विजय
पोर्तुगालने घरच्या मैदानावर एंडोराला ७-० ने हरवले. लिस्बनमध्ये झालेल्या सामन्यात पोर्तुगालकडून पेड्रो नेटोने आठव्या, पॉलिन्होने २९ व्या व ६१ व्या, रेनाटो सांचेसने ५६ व्या, क्रिस्टियानो रोनाल्डोने ८५ व्या, जोआओ फेलिक्सने ८८ व्या मिनिटाला गोल केला. एंडोराच्या गार्सिलाने ७६ व्या मिनिटाला आत्मघाती गोल केला. हा रोनाल्डोचा पोर्तुगालसाठी १०२ वा गोल होता. ३५ वर्षीय रोनाल्डो सर्वाधिक गोल करण्याच्या इराणच्या एली डेईच्या विक्रमापासून ७ गोल दूर आहे. पोर्तुगालने एंडोराला सलग सहाव्यांदा मात दिली.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.