आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​​​​​​​आशिया चषक 2023:पाकिस्तान भारतात विश्वचषक खेळणार की नाही हे निश्चित नाही; PCB ने अद्याप ICC ला लेखी आश्वासन दिलेले नाही

मुंबई24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतात होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेसाठी जेमतेम 5 महिने बाकी आहेत, मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (ICC) पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून त्यात सहभागी होण्याचे कोणतेही लेखी आश्वासन मिळालेले नाही. त्यामुळे पाकिस्तानच्या वर्ल्डकपमधील प्रवेशावर शंका निर्माण झाली आहे. ​​​विश्वचषकाचा पहिला सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात 5 ऑक्टोबरला होण्याची शक्यता आहे. फायनल 19 नोव्हेंबरला होणार आहे. विश्वचषक लीगमध्ये 15 ऑक्टोबरला पाकिस्तानची भारताशी लढत होण्याची शक्यता आहे. आयसीसीने अधिकृत वेळापत्रक जाहीर केले नसले तरी, हा अंदाज वर्तविला जात आहे.

वृत्तसंस्था पीटीआयने आयसीसीच्या एका सदस्याचा हवाला देत सांगितले की, भारताचा पाकिस्तान दौरा आणि पाकिस्तानचा भारत दौरा बीसीसीआय किंवा पीसीबीवर अवलंबून नाही. त्यामुळे पीसीबी वर्ल्ड कपमधील सहभागाबाबत आयसीसीला कोणतेही आश्वासन देऊ शकत नाही. ते म्हणाले की, बीसीसीआयप्रमाणे इथेही पाकिस्तान सरकार मान्यता देईल, सरकारकडून मंजुरी मिळाल्यानंतरच पीसीबी निर्णय घेऊ शकेल.

पाकिस्तानचे सामने बंगळुरू-चेन्नई येथे होऊ शकतात

सुरक्षेच्या कारणास्तव बीसीसीआयने विश्वचषकात पाकिस्तानचे बहुतांश सामने दक्षिण भारतात व्हावेत अशी योजना तयार केली आहे. मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर भारत-पाक सामने अहमदाबादमध्ये आणि उर्वरित पाकिस्तानचे सामने बंगळुरू आणि चेन्नईत आयोजित केले जाऊ शकतात.

पीसीबीने कोलकाता व चेन्नईत आयोजन करण्याची केली मागणी
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला सुरक्षेच्या कारणास्तव कोलकाता येथील ईडन गार्डन्स आणि चेपॉक स्टेडियमवर एकदिवसीय विश्वचषकादरम्यानचे सर्व सामने खेळण्याची विनंती केली आहे.

12 ठिकाणी करण्यात आली शॉर्टलिस्ट करण्यात आली आहेत
आम्ही तुम्हाला सांगतो की विश्वचषक 5 ऑक्टोबरपासून सुरू होऊ शकतो आणि यासाठी 12 ठिकाणे निवडण्यात आली आहेत. यामध्ये चेन्नई आणि कोलकाताचाही समावेश आहे. उर्वरित 10 ठिकाणे अहमदाबाद, लखनौ, मुंबई, राजकोट, बेंगळुरू, दिल्ली, इंदूर, गुवाहाटी, हैदराबाद आणि धर्मशाला आहेत.

8 संघ थेट विश्वचषकासाठी ठरले पात्र
यावेळी विश्वचषकात 10 संघ सहभागी होणार आहेत. यातील आठ संघ 13 देशांच्या जुलै 2020 ते मे 2023 या कालावधीत झालेल्या सुपर लीगच्या आधारे थेट पात्र ठरले आहेत. दक्षिण आफ्रिका पात्रता मिळवणारा आठवा संघ ठरला आहे. याशिवाय भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेश, न्यूझीलंड, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया हे संघ आधीच पात्र ठरले आहेत.

जूनमध्ये होणाऱ्या पात्रता स्पर्धेच्या आधारे दोन्ही संघांची निवड केली जाईल. यात दोन वेळा विश्वचषक जिंकणाऱ्या वेस्ट इंडिज आणि एकदा विश्वचषक जिंकणाऱ्या श्रीलंकेच्या संघाचाही समावेश आहे. या दोघांशिवाय पात्रता फेरीत आणखी आठ संघ आहेत.

इतर क्रीडा बातम्या.

आशिया चषक:पाकने दिला UAE मध्ये आशिया कप आयोजित करण्यासाठी नवा प्रस्ताव; नाकारल्यास स्पर्धेतून माघार घेण्याची धमकी

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) आशिया क्रिकेट परिषदेला (ACC) एक नवीन प्रस्ताव दिला आहे. पीसीबीकडून असे सांगण्यात आले आहे की, जर एसीसी सदस्य भारताने इतर देशांमध्ये सामने आयोजित करण्याचा प्रस्ताव स्वीकारत नसतील तर पाकिस्तान ​​​​यूएईमध्ये आशिया कप आयोजित करण्यास तयार आहे. - येथे वाचा संपूर्ण बातमी