आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • World Cup Hockey | Australia Hockey Team In The Semi finals Of The World Cup

विश्वचषक हाॅकी:ऑस्ट्रेलिया हाॅकी संघ  वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीत

भुवनेश्वर4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

फ्लिन ओगिल्वी (३० वा मि.) अरन जेल्वेस्की (३२ वा मि.), हेवर्ड जेरेमी (३३, ३७ वा मि.) यांनी ऑस्ट्रेलिया संघाचा विश्वचषक हाॅकी स्पर्धेच्या उपांत्य फेरीचा प्रवेश निश्चित केला. यांच्या सर्वाेत्तम खेळीतून फाॅर्मात असलेल्या ऑस्ट्रेलिया संघाने मंगळवारी उपांत्यपूर्व फेरीत स्पेनला पराभूत केले. ऑस्ट्रेलिया संघाने ४-३ अशा फरकाने राेमहर्षक विजय संपादन केला. यासह ऑस्ट्रेलिया हा यंंदा विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठणारा पहिला संघ ठरला आहे. स्पेन संघाला पराभवामुळे स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. स्पेन संघाकडून झेव्हियर (२० वा मि.), मार्क रिकसेन्स (२४ वा मि.) मार्क मिरालेस (४१ वा मि.) यांनी प्रत्येकी एक गाेल केला. मात्र, एका गाेलच्या पिछाडीने स्पेन संघाला लाजिरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला.

बातम्या आणखी आहेत...