आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विश्वचषक हाॅकी:जर्मनी संघ उपांत्यपूर्व फेरीत; 5-1 ने फ्रान्सवर मात

भुवनेश्वर5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दाेन वेळच्या वर्ल्ड चॅम्पियन जर्मनी संघाने किताबाचा दावा मजबूत करताना साेमवारी विश्वचषक हाॅकी स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली. फाॅर्मात असलेल्या जर्मनी संघाने क्राॅसआेव्हर सामन्यात फ्रान्सला पराभूत केले. जर्मनी संघाने ५-१ अशा फरकाने माेठा विजय संपादन केला. मार्काे मिल्टकाऊ (१५ वा मि.), निकलास वेलेन (१९ वा मि.), मॅट्स ग्रामबुश (२४ वा मि.), माेरिट्ज (२५ वा मि.) आणि गाेंजाेलाे पिलाटने (६० वा मि.) प्रत्येकी एक गाेल करत संघाच्या विजयात माेलाचे याेगदान दिले. फ्रान्स संघाकडून फ्रांकाेइस गाेएटने (५८ वा मि.) एकमेव गाेल केला. मात्र, टीमला आपला पराभव टाळता आला नाही.

बातम्या आणखी आहेत...