आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • World Cup | India | Austrolia| World Cup Kicks Off In Australia From October 16 Next Year, Team India's Roadmap For The Upcoming T20 World Cup

दिव्य मराठी अ‍ॅनालिसिस:पुढच्या वर्षी 16 ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियात विश्वचषक स्पर्धेला सुरुवात, टीम इंडियाचा आगामी टी-20 वर्ल्डकपसाठी रोडमॅप

दीपा द्विवेदी | नवी दिल्ली13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • संघातील खेळाडूंना करून द्यावी लागणार ठाेस भूमिकेची जाणीव

विश्वविजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या टीम इंडियाचा नुकत्याच यूएईमध्ये झालेल्या टी-२० वर्ल्डकपमध्ये फ्लाॅप शाे झाला. सुमार खेळी आणि पराभवाच्या मालिकेमुळे भारतीय संघाला उपांत्य फेरीचा पल्लाही गाठता आला नाही. याच पराभवातून सावरत आता टीम इंडियाने आपल्या घरच्या मैदानावर टी-२० फाॅरमॅटमध्ये माेठी उसळी घेतली.

यातूनच यजमान भारतीय संघाने आपल्या हाेमग्राउंडवर विश्वचषकातील उपविजेत्या न्यूझीलंडचा मालिकेत ३-० ने धुव्वा उडवला. सलग तिन्ही सामने जिंकून भारतीय संघाने सर्वाेत्कृष्ट खेळीचे प्रदर्शन केले. आता याच उमेदीच्या खेळीतून टीम इंडियाला पुढच्या वर्षी हाेणाऱ्या टी-२० फाॅरमॅटच्या विश्वचषकासाठी राेडमॅप तयार करावा लागणार आहे. पुढच्या वर्षी २०२२ मध्ये ऑस्ट्रेलियात या स्पर्धेचे अायाेजन करण्यात आले. १६ ऑक्टाेबर २०२२ पासून टी-२० विश्वचषकाला सुरुवात हाेईल. त्यामुळे आता अवघ्या ३२२ दिवसांचा प्लॅन तयार करावा लागणार आहे.

२३३ दिवसांत फक्त १७ टी-२० :
भारतीय संघाला विश्वचषकासाठी सर्वाेत्तम कामगिरीचा दर्जा उंचावण्यावर भर द्यावा लागणार आहे. यासाठी माेठ्या संख्येत टी-२० सामने खेळण्यासाठी मैदानावर उतरावे लागणार आहे. आता आगामी जुलै २०२२ पर्यंत टीम इंडिया दक्षिण आफ्रिका, विंडीज, श्रीलंका आणि इंग्लंडविरुद्ध टी-२० सामने खेळणार आहे. मात्र, या २३३ दिवसांदरम्यान टीम इंडिया फक्त १७ टी-२० सामने खेळू शकेल. यामध्ये वाढ करण्याची गरज आहे. यातून खेळाडूंनाही या फाॅरमॅटमध्ये स्वत:ला सिद्ध करता येईल.

विश्वास दाखवावा लागेल खेळाडूंवर; संधीने दर्जेदार खेळी

संघाला आता विश्वचषकासाठीचे आपले डावपेच यशस्वी करण्यासाठी माेठा बदल करावा लागेल. यात खास करून खेळाडूंवर दाखवलेला विश्वास आणि त्यांना करून दिलेली भूमिकेची जाणीव, हीच संघाला तारणारी ठरेल. यातून टी- २० मध्ये खेळाडूंना आपल्या कराव्या लागणाऱ्या भूमिकेची स्पष्ट अशी जाणीव हाेईल. यातून टीमच्या कामगिरीचा दर्जा उंचावण्यास मदत हाेईल. विश्वास दाखवताना खेळाडूंना त्याच पाेझिशनवर सातत्याने खेळण्याची संधी मिळायला हवी.

यातून त्या खेळाडूंच्या कामगिरीचा दर्जा उंचावण्यास मदत हाेईल. तसेच विश्वास दाखवल्याने यादरम्यान आलेल्या अपयशातून खेळाडू आपला आत्मविश्वास गमावू शकणार नाही. अशा प्रकारचे डावपेच पाेलार्डने आखले हाेते. यातूनच त्याला सर्वाेत्तम यश संपादन करता आले. तसेच फिनिशरच्या भुमिकेत ताे यशस्वी ठरला.

टी-२० स्पेशालिस्ट खेळाडूंची संघात निवड हाेणे अत्यावश्यक
टी-२० विश्वचषकासाठीा आता कमी कालावधी उरलेला आहे. त्यामुळे संघ बांधणी करताना टी-२० फाॅरमॅटमधील स्पेशालिस्ट खेळाडूंची निवड गरजेची आहे. यासाठी कामगिरी पाहूनच खेळाडूंची निवड केली जावी. तसेच यादरम्यान सातत्याने वेगवेगळे प्रयाेग करण्यासाठी टीमने पुढाकार घ्यावा. तसेच नेतृत्वातही राेटेशन पद्धतीचा मार्ग टीमसाठी फायदेशीर ठरू शकेल. यातून स्वतंत्र कर्णधाराची निवड होईल. त्यामुळे प्रत्येक कर्णधाराला मर्यादित आपल्याच फाॅरमॅटमध्ये दर्जेदार खेळाडूंच्या निवडीची संधी मिळू शकेल. तसेच यातून टीमलाही फाॅरमॅटनुसार सर्वाेत्तम कामगिरी करता येईल. सध्या राहुल द्रविडकडे प्रशिक्षकपदाची माेठी जबाबदारी साेपवण्यात आली आहे. त्याच्याकडे प्रचंड याेजना आहेत.

यातूनच त्याने युवा खेळाडूंच्या कामगिरीचा दर्जा उंचावला आहे. कारण, त्याने एनसीएमध्ये या खेळाडूंना आपली क्षमता सिद्ध करण्यासाठी अनेक संधी उपलब्ध करून दिल्या. भारतामधील खेळाडूंना आशियातील नैसर्गिक वातावरणाची पुर्णपणे जाण आहे. यातूनच ते सर्व यात वातावरणात सर्वाेत्तम कामगिरी करण्यात आघााडीवर असतात.मात्र, आता युएईमधील वातावरणात भारताचे खेळाडू काहीसे अपयशी ठरले. त्यामुळे हेच अपयश टीमला अडचणीत आणणारे ठरले.

त्यामुळे दर्जेदार कामगिरीतून याठिकाणीही सर्वाेत्तम यश संपादन करता आले असते. मात्र, आता याच अपयशाला झाकून ठेवण्यासाठी हे खेळाडू वेगळी कारणे सांगत आहे. मैदानावरील सातत्यपुर्ण खेळीतून कामगिरीचा दर्जा उंचावताे. मात्र, खेळाडूंनी यातून अपयशी ठरल्याचे सांगितले.

खेळाडूंना आयपीएलच्या कामगिरीनुसार संधी द्यावी

आयपीएलच्या माध्यमातून युवा खेळाडूंना सर्वाेत्तम कामगिरी करण्याचे माेठे व्यासपीठ मिळते. याच्या माध्यमातून खेळाडू सर्वाेत्तम कामगिरी करण्यासाठी प्रयत्नशील असतात. त्यामुळे आयपीएलच्या कामगिरीनुसारच खेळाडूंना दाैऱ्यावर संधी दिली गेली पाहिजे. यातून खेळाडूंना केलेल्या दर्जेदार खेळीचा माेठा फायदा हाेईल. तसेच इतर खेळाडूंना यापासून प्रेरणा मिळत राहिल. आयपीएल ही आपल्या युवा खेळाडूंच्या कामगिरीचे परीक्षण करणारी माेठी लीग आहे.

त्यामुळे आयपीएलमध्ये सर्वाेत्तम कामगिरी करण्यावर युवा खेळाडूंचा भर असताे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या वतीने या लीगचे आयाेजन केले जाते. त्यामुळे यातील युवांची खेळी ही मंडळाच्या निवड समितीच्या डाेळ्यात भरणारी असते.

आंतरराष्ट्रीय वेळापत्रकाने तयारी जाेमात भारतीय संघाचे खेळाडू विदेशातील लीगमध्ये खेळत नाहीत. त्यामुळे या खेळाडूंना सातत्याने मैदानावर खेळत राहण्यासाठी सत्रातील सामने महत्त्वपूर्ण ठरतात. कारण भारताचे खेळाडू सय्यद मुश्ताक अली ट्राॅफी, रणजी ट्राॅफीसारख्या देशांतर्गत स्पर्धेतून आपली क्षमता सिद्ध करत असतात. त्यामुळे आंतरराष्ट्रीय दाैऱ्यातूनच खेळाडूंना ही माेठी संधी मिळू शकते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय दाैऱ्याचे वेळापत्रकही खेळाडूंना तयारीसाठी फायदेशीर ठरणारे आहे. यातून त्यांना तयारी करण्यासाठी माेठी संधी मिळते.

जगज्जेत्या ऑ​स्ट्रेलियासारखी संघ निवड; डावपेच व सर्वाेत्तम मार्गदर्शनातून माेठे यश
पुढच्या वर्षीचा विश्वचषक जिंकण्याच्या इराद्याने मैदानावर उतरलेल्या भारतीय संघात माेठा बदल अपेक्षित आहे. यासाठी विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियासारखी सर्वाेत्तम संघ बांधणी गरजेची आहे. त्यामुळे टीमला सामन्यागणिक सर्वाेत्तम कामगिरी करता येईल. तसेच लढाऊ बाणाही अधिक विकसित करता येईल. यातून टीमला निश्चितपणे माेठा फायदा हाेऊ शकेल.

बातम्या आणखी आहेत...