आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेत्या २० नाेव्हंेंबरपासून कतारमध्ये फिफाच्या विश्वचषक फुटबाॅल स्पर्धेला सुरुवात हाेत आहे. फुटबाॅलच्या विश्वातील सुपरस्टार खेळाडूंमुळे त्यांच्या सहभागाने यंदा विश्वचषकादरम्यान थरारक लढतीचा आनंद मिळणार आहे. कतारला पहिल्यांदाच फिफाच्या जागतिक दर्जाच्या स्पर्धेचे यजमानपद भूषवण्याचा बहुमान मिळाला. त्यामुळे यजमान कतारने स्पर्धेच्या भव्य स्वरुपातील आयाेजनावर भर दिला आहे. यातून या ठिकाणी तब्बल १६.३८ लाख काेटींच्या खर्चातून या विश्वचषकाचे आयाेजन हाेत आहे. या ठिकाणी खेळाडूंबराेबरच सामने पाहण्यासाठी येणाऱ्या चाहत्यांना खास सुविधा देण्यात आल्या आहेत. फुटबाॅलप्रेमींना संख्या वाढवण्यासाठी खास झाेन तयार करण्यात आले. माेफत प्रवेश असलेल्या या झाेनमध्ये चाहत्यांना स्वत: फुटबाॅल खेळण्याचीही संधी आहे. याशिवाय ते याच ठिकाणी बसून दिग्गज फुटबाॅलपटूंच्या जुन्या सामन्यांचा आनंद लुटू शकणार आहेत.
सर्वात माेठ्या फॅन फेस्टिव्हलमध्ये १० लाख फुटबाॅलप्रेमींची हजेरी अल बिद्दा पार्कमध्ये सर्वात माेठ्या फॅन फेस्टिव्हलचे आयाेजन करण्या येणार आहे. त्यामुळे साेहळ्यादरम्यान दहा लाखांपेक्षा अधिक फुटबाॅलप्रेमींची हजेरी असेल, असा आयाेजकांचा दावा आहे. या ठिकाणी माेठी स्क्रीन, फाइन डायनिंग व इतरही मनाेरंजनाच्या सुविधा उपलब्ध आहेत. स्थानिक कलाकार आपल्या कला यादरम्यान सादर करतील.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.