आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • World Record Day: Toby Breaks His Own Record Twice In 2 Hours In The 100m Hurdles, While Mondo Sets A New Record In The Pole Vault.

विश्वविक्रमाचा दिवस:100 मी. अडथळा शर्यतीत टोबीने 2 तासांतच दोनदा मोडला स्वता:चाच रेकॉर्ड, तर पोल वॉल्टमध्ये मोंडोचा नवा विक्रम

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोमवारी जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये विश्वविक्रमावर नाव कोरले गेले. येथे एका दिवसात तीन वेळा विश्वविक्रम मोडला गेला. 2 वेळा नायजेरियन धावपटूने नवा विक्रम केला. तर पोल वॉ़ल्टमध्ये स्वीडिश अ‍ॅथलीट मोंडो डुप्लांटिसने विक्रम केला.

नायजेरियाची धावपटू टोबी अमुसानीने जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमधील महिलांच्या 100 मीटर अडथळा शर्यतीचा विश्वविक्रम मोडला आहे. 25 वर्षीय अमुसानीने 2 तासांतच स्वतःचा विक्रम मोडला आहे.

USA यूजीन येथे सुरू असलेल्या जागतिक चॅम्पियनशिपमध्ये, टोबीने प्रथम उपांत्य फेरीत 12.12 सेकंदांसह नवा विश्वविक्रम नोंदवला आणि अंतिम शर्यतीसाठी पात्रताही मिळवली.

त्यानंतर बरोबर 2 तासांनंतर, अंतिम शर्यतीत तिने आपली वेळ सुधारून 12.06 सेकंद केली. यासह तिने जागतिक चॅम्पियनशिपमध्ये महिलांच्या 100 मीटर अडथळा शर्यतीत सुवर्णपदक जिंकले आहे.

फोटोंमध्ये पहा वर्ल्ड चॅम्पियन टोबीच्या विजयाचा आनंद...

नवीन विक्रम रचल्यानंतर टोबीची प्रतिक्रिया.
नवीन विक्रम रचल्यानंतर टोबीची प्रतिक्रिया.

एक दृष्टीक्षेप पदक विजेत्यावर

टोबी अमुसानी (नायजेरिया) 12.6 सुवर्ण

ब्रिटनी अँडरसन (जमैका) 12.13 रौप्य

जास्मिन कॅमाचो-क्विन (पोर्तो रिको) 12.23 कांस्य

टोबीने मोडला 6 वर्षे जुना विक्रम

टोबीने पहिल्यांदाच अमेरिकन धावपटू केन हॅरिसनचा 6 वर्ष जुना विक्रम मोडला. हॅरिसनचा 12.20 सेकंदाचा विक्रम होता. जो त्याने 2016 मध्ये बनवला होता.

डोळ्यांत पदकाची चमक दिसत होती.
डोळ्यांत पदकाची चमक दिसत होती.

मोंडोने 6.21 मीटरच्या उडीसह जिंकले सुवर्णपदक

पोल वॉ़ल्ट स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्वीडिश अ‍ॅथलीट मोंडो डुप्लांटिसने 6.21 मीटर उडी मारून नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला. त्याने स्वतःच्या विक्रमात सुधारणा केली अमेरिकेच्या क्रिस्टोफर निल्सनने (5.94 मी) रौप्य आणि अर्निस्ट जॉन ओबिना (5.94 मी) कांस्यपदक जिंकले.

मॉन्डो डुप्लंटिसने पोल वॉल्ट मध्ये स्वतःचा विक्रम सुधारला.
मॉन्डो डुप्लंटिसने पोल वॉल्ट मध्ये स्वतःचा विक्रम सुधारला.

सिडनीने स्वत:चा 400 मीटरचा विक्रम मोडला

दोन दिवसांपूर्वी शनिवारी अमेरिकेची धावपटू सिडनी मॅक्लॉफलिन (50.68 सेकंद) हिने महिलांच्या 400 मीटर हर्डल्स शर्यतीत नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला होता. तिने 28 दिवसांपूर्वी USA चॅम्पियनशिपमध्ये स्वतःचा विक्रम (51.41 सेकंद) मागे टाकला.

बातम्या आणखी आहेत...