आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डब्ल्यूपीएल:बंगळुरूने यूपीला हरवत खाते उघडले

मुंबई17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुधवारी झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने महिला प्रीमियर लीगमध्ये (डब्ल्यूपीएल) पहिला विजय नोंदवला. पहिले पाच सामने गमावलेल्या आरसीबीने सहाव्या सामन्यात यूपी वॉरियर्सचा ५ गडी राखून पराभव केला. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना यूपीचा संघ २० व्या षटकात १३५ धावांवर बाद झाला. प्रत्युत्तरात बंगळुरूने १८ व्या षटकात ५ गडी गमावून लक्ष्य गाठले. गुरुवारी दिल्लीचा सामना गुजरातशी होणार आहे.

२० वर्षीय कनिका विजयाची हीरो २० वर्षीय अष्टपैलू कनिका आहुजाने आरसीबीच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. तिने ३० चेंडूत ४६ धावा केल्या. रिचा घोषने ३१* धावांची नाबाद खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. या विजयासह आरसीबीने गुणतालिकेत आपले खातेही उघडले. संघ दोन गुणांसह चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. दुसरीकडे, यूपी संघ चार गुणांसह तिसऱ्या स्थानावर विराजमान आहे.

बातम्या आणखी आहेत...