आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Wrestling Out Of The Commonwealth Games; Big Loss For India, Shooting Comeback

मोठा निर्णय:राष्ट्रकुल स्पर्धेतून कुस्ती बाहेर; भारताचे मोठे नुकसान, नेमबाजीचे पुनरागमन

मेलबर्न2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आगामी २०२६ मध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेबाबत मोठा निर्णय घेण्यात आला. खेळातून कुस्तीला बाहेर करण्यात आले आहे. याचा सर्वाधिक फटका भारताला बसेल. यंदाच्या बर्मिंगहॅम गेम्समध्ये भारताने कुस्तीमध्ये ६ सुवर्णांसह १२ पदके जिंकली होती. आतापर्यंत भारताने या खेळात ४९ सुवर्णांसह ११४ पदके मिळवली. कॉमनवेल्थ गेम्स फेडरेशन (सीजीएफ) आणि कॉमनवेल्थ गेम्स ऑस्ट्रेलियाने बुधवारी व्हिक्टोरिया २०२६ गेम्ससाठी क्रीडा वेळापत्रक जाहीर केले. नेमबाजी २०२६ च्या राष्ट्रकुल स्पर्धेत पुन्हा समावेश केला. ही भारतासाठी दिलासादायक बाब आहे. नेमबाजीत भारताने १३५ पदके जिंकली आहेत.

२०२६ च्या स्पर्धेतील समाविष्ट खेळ अॅथलेटिक्स, बॅडमिंटन, ३×३ बास्केटबॉल, ३×३ व्हीलचेअर बास्केटबॉल, बॉक्सिंग, बीच व्हॉलीबॉल, कोस्टल रोइंग, क्रिकेट टी २० (महिला), सायकलिंग (बीएमएक्स, माउंटन बाइक, रोड, ट्रॅक व पॅरा-ट्रॅक), डायव्हिंग, गोल्फ, जिम्नॅस्टिक्स, हॉकी, लॉन बाॅल, नेटबॉल, रग्बी ७, नेमबाजी, स्क्वॉश, जलतरण, टेबल टेनिस, ट्रायथलॉन, वेटलिफ्टिंग, पॅरा - ट्रायथलॉन, अॅथलेटिक्स, लॉन बाॅल, नेमबाजी, पॉवरलिफ्टिंग, जलतरण, टेबल टेनिस.

बातम्या आणखी आहेत...