आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप:कसाेटीसाठी भारत, न्यूझीलंड टीम जाहीर; फायनलवर पावसाचे सावट

साउदम्प्टन2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शुक्रवारपासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलला हाेणार सुरुवात

भारत अाणि न्यूझीलंड हे दोन्ही तुल्यबळ संघ येत्या शुक्रवारपासून आयसीसीची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकण्यासाठी सज्ज झाले अाहेत. या प्रतिष्ठेच्या फायनलसाठी दोन्ही टीमने अापल्या शिलेदारांच्या नावाची घोषणा केली. भारताने अापल्या १५ सदस्यीय संघामध्ये पाच वेगवान गोलंदाज अाणि दाेन फिरकीपटूंची निवड केली अाहे. विराट कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडिया चॅम्पियनशिप जिंकण्याची मोहीम फत्ते करण्यासाठी उत्सुक अाहे. यासाठी टीम कसून तयारी करत अाहेत. मात्र, टीमच्या याच मोहिमेला मुंबईत जन्मलेल्या एजाज पटेलच्या फिरकीचा अडसर ठरू शकताे.

या फिरकीपटूची न्यूझीलंडच्या १५ सदस्यीय संघामध्ये निवड झाली. न्यूझीलंड टीम २० खेळाडूंसह इंग्लंड दाैऱ्यावर दाखल झाली हाेती. यातून टीमने १५ जणांची फायनलसाठी निवड केली. दुखापतीतून सावरलेल्या विलियम्सन अाणि यष्टिरक्षक फलंदाज वाॅल्टिंगला संघात स्थान निश्चित करता अाले. २५ वर्षीय वाॅल्टिंग हा करिअरमधील शेवटची कसोटी खेळणार अाहे. यादरम्यान जॅकब डफी, डग ब्रेसवेल, डाेरिल मिचेल, रचिन अाणि मिचेल सॅटनर यांना विश्रांती देण्यात अाली. न्यूझीलंड टीमचे खेळाडू सध्या यजमान इंग्लंड संघाविरुद्ध मालिका विजयाने फाॅर्मात अाहेत. अाता हीच लय कायम ठेवण्याचा या टीमचा प्रयत्न असेल. दुसरीकडे टीम इंडियाने कसून सरावावर भर दिला.

पाणी फेरले जाण्याचे संकट :
प्रचंंड मेहनतीतून भारत अाणि न्यूझीलंड टीम फायनल जिंकण्यासाठी सज्ज झाल्या अाहेत. मात्र, या दाेन्ही टीमच्या या मेहनतीवर पाणी फेरले जाण्याचे चित्र अाहे. कसाेटीच्या पाचही दिवस या ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात अाला अाहे. यात पावसाच्या व्यत्ययाची पहिल्या दिवशी ८० टक्के, दुसऱ्या, तिसऱ्या व चाैथ्या दिवशी ७० टक्के शक्यता अाहे. पावसामुळे ही कसाेटी अनिर्णीत राहिल्यास दोन्ही संघांना संयुक्तपणे चॅम्पियनशिप जाहीर करण्यात येईल. याचीही तरतुद अायसीसीने केली अाहे.

संभाव्य संघ
भारतीय संघ :
विराट कोहली (कप्तान), अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, शुभमान गिल, चेतेश्वर पुजारा, ऋषभ पंत, वृद्धिमान साहा, हनुमा विहारी, जडेजा, अश्विन, बुमराह, शमी, ईशांत, सिराज, उमेश यादव.

न्यूझीलंड संघ: विलियम्सन (कर्णधार), टॉम, ट्रेंट बोल्ट, डेवॉन कॉनवे, कॉलिन डी ग्रँडहोम, मॅच हेनरी, कायल जेमिसन, टॉम लॅथम, हेनरी निकोल्स, एजाज पटेल, टीम साउथी, रॉस टेलर, निल वॅगनर, बीजे वॅटलिंग, विल यंग.

एजाजच्या फिरकीचे जाळे टीम इंडियासाठी अडचणीचे
मुंबईमध्ये जन्मलेला एजाज पटेल सध्या अापल्या न्यूझीलंड टीमकडून उल्लेखनीय कामगिरी करत अाहे. त्यामुळेच त्याची टीम इंडियाविरुद्ध फायनलसाठी संघात निवड झाली. त्याने अापल्या फिरकीच्या जादूने नुकत्याच झालेल्या कसाेटी मालिकेत यजमान इंग्लंडच्या अव्वल फलंदाजांना बाद केले. त्याने या दुसऱ्या कसाेटी सामन्यात चार विकेट घेतल्या.