आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Yashasvi Jaiswal Who Is Currently In Form Standard Of His Performance At The Cricket Academy In Wardha Maharashtra 

IPLमध्ये वेगवान अर्धशतकाचा विक्रम:वर्ध्यातील अकादमीमध्ये यशस्वीने उंचावला आपल्या कामगिरीचा दर्जा

वृत्तसंस्था | काेलकाता19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राजस्थान राॅयल्स संघाच्या युवा सलामीवीर यशस्वी जायस्वालने गुरुवारी अायपीएलमध्ये सर्वात वेगवान अर्धशतकाचा विक्रम केला. त्याने १३ चेंडूंमध्ये अर्धशतक साजरे केले. हे अायपीएलच्या इतिहासामध्ये सर्वात वेगवान अर्धशतक ठरले. यादरम्यान यशस्वीने लाेकेश राहुलचा १४ चेंडूंमध्ये अर्धशतकाचा विक्रम ब्रेक केला. यशस्वीच्या (नाबाद ९८) झंझावाती खेळीच्या बळावर राजस्थान संघाने ईडन गार्डन मैदानावर यजमान काेलकाता संघावर ९ गड्यांनी मात केली.

सध्या फाॅर्मात असलेल्या यशस्वी जायस्वालने महाराष्ट्राच्या वर्धा येथील क्रिकेट अकादमीमध्ये अापल्या कामगिरीचा दर्जा उंचावला अाहे. राजस्थान संघाचे डायरेक्टर अाॅफ क्रिकेट जुबिन भरूचा यांच्या मार्गदर्शनाखाली ही अकादमी सुरू अाहे. भरूचा यांनी दिलेल्या खास मार्गदर्शनातून यशस्वीने अापल्या कामगिरीचा दर्जा उंचावला अाहे. यामुळे त्याला यंदाच्या अायपीएलमध्ये अापली वेगळी छाप पाडता अाली. त्याच्या नावे तीन अर्धशतकांसह एका शतकाचीही नाेंद अाहे. यामुळे त्याच्या नावे अाता ५००+ धावांची नाेंद झाली अाहे. ‘क्रिकेट हा शरीरापेक्षा बुद्धीने खेळवला जाणारा खेळ अाहे, असे मी मानताे. यामुळे चेंडूचा याेग्य ताे अभ्यास करूनच मी फटकेबाजी करताे. यामुळे मला गाेलंदाज अाणि चेंडूंचा सखाेल पद्धतीने अभ्यास करण्याची शैली अात्मसात करता अाली. यादरम्यान मला काेच भरूचा यांच्याकडून मार्गदर्शन मिळते. मी त्यांच्यासाेबत वेळाेवेळी दर्जेदार फलंदाजीबाबत चर्चा करताे. याशिवाय मी धाेनी, काेहली अाणि राेहित शर्मा यांच्याशी चर्चा करताे, अशा शब्दात यशस्वीने यशाचे गमक सांगितले.