आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो:महाराष्ट्राचे युवा संघ उपांत्य फेरीत

अजितकुमार संगवे / विजय मांडके | फलटणएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

धनश्री कंक आणि राज जाधवच्या नेतृत्वाखाली यजमान महाराष्ट्राच्या संघांनी मंगळवारी किशोर व किशोरी गटाच्या ३२व्या राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. महाराष्ट्र किशाेरी संघाने अंतिम आठच्या लढतीत गुजरातवर मात केली. महाराष्ट्र संघाने १४-३ असा डावाने दणदणीत विजय साजरा करत उपांत्य फेरी गाठली.

महाराष्ट्राच्या मुलींनी गुजरातवर १४-३ असा डावाने दणदणीत विजय मिळवला. यात प्राजक्ता बनसोडेने ४ गडी टिपले. धनश्री तामखडे (४.१० मिनिटे), विद्या तामखडे( २.४० मिनिटे नाबाद), स्वप्नाली तामखडे (२.०० मिनिटे), मैथली पवार (२.२० मिनिटे) व धनश्री कंक (२.५० मिनिटे) यांनी संरक्षणाची भक्कम बाजू सांभाळली. स्वप्नालीने ३ तर धनश्रीने २ गुणही संघास मिळवून दिले. मुलांच्या गटात सकाळी झालेल्या उपउपांत्यपूर्व सामन्यात महाराष्ट्राने आंध्र प्रदेशवर २३-५ असा शानदार विजय नोंदवला. यात आशिष गौतम याने आपल्या धारदार आक्रमणात ७ गडी टिपले.

बातम्या आणखी आहेत...