आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारतीय टीमचा माजी ऑलराउंडर युवराज सिंगने 2019 वर्ल्ड कपमध्ये त्याच्या न निवडल्या जाण्यावर मोठा खुलासा केला आहे. युवराजने सांगितले की, 2019 विश्वचषकात त्याची निवड होणार नाही, हे महेंद्र सिंग धोनीने आधीच त्याला सांगितले होते. युवराजने आपला अखेरचा वनडे 2017 मध्ये वेस्टइंडीज दौऱ्यावर खेळला होता. 2019 मध्ये युवराजने निवृत्ती घेतली.
आपल्या खुलाशाबाबत युवराज म्हणाला की, ‘‘मी वापसी केल्यावर विराट कोहलीने समर्थन केले. त्याच्या पाठिंब्याशिवाय मी परत येऊ शकलो नसतो. परंतू, धोनीने 2019 वर्ल्ड कपबाबत स्पष्टपणे सांगितले होते. धोनीने सांगितले होते की, त्याकडून होईल तितका प्रयत्न झाला, पण सलेक्टर माझ्या नावाचा विचारच करत नाहीत.’’
‘2011 वर्ल्ड कपपर्यंत धोनीला माझ्यावर खूप विश्वास होता’
युवीने पुढे म्हटले की, ‘‘2011 वर्ल्ड कपपर्यंत धोनीला माझ्यावर पूर्ण विश्वास होता आणि मला तो मुख्य खेळाडून आहेस, असे सांगायचा. पण, यादरम्यान मला आजारान ग्रासले आणि परत वापसी केल्यावर खेळ खूप बदलला होता. ’’
चॅम्पियंस ट्रॉफीमध्येही युवीची कामगिरी चांगली नव्हती
युवराजने आपला शेवटचा वनडे 2017 मध्ये वेस्टइंडीज दौऱ्यावर खेळला होता. यापूर्वी जानेवारीमध्ये इंग्लँडविरुद्ध वनडेमध्ये 150 धावांची खेळी केली होती. तो युवराजच्या करिअरमधला सर्वात चांगला स्कोअर होता. युवराज 2017 चॅम्पियंस ट्रॉफीदेखील खेळला होता, पण त्यात त्याची कामगिरी चांगली नव्हती.
युवराजच्या नावे 17 आंतरराष्ट्रीय शतक
युवराजने 40 टेस्टमध्ये 33.92 च्या सरासरीने 1900 धावा केल्या आहेत. यात 3 शतक आणि 11 अर्धशतके आहेत. तसेच, 304 वनडेमध्ये 36.55 च्या सरासरीने 8701 धावा केल्या आहेत. यादरम्यान वनडे इंटरनेशनलमध्ये 14 शतक आणि 52 अर्धशतके लगावले आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.