आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • England New Zealand Test Fun: Grandhome Bowls Stokes Clean, Umpire Returns To The Pavilion, No Ball, Fans Cheer At Lord's

इंग्लंड-न्यूझीलंड कसोटीतील मजेशीर घटना:ग्रॅंडहोमने स्टोक्सला केले क्लिन बोल्ड, पॅव्हेलियनमध्ये परतताना अंपायरने दिला नो बॉल, संपूर्ण लॉर्ड्सवर चाहत्यांचा जल्लोष

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

इंग्लंड-न्यूझीलंड कसोटीतील मजेशीर घटना: ग्रॅंडहोमने स्टोक्सला केले क्लिन बोल्ड, पॅव्हेलियनमध्ये परतताना अंपायरने दिला नो बॉल, संपूर्ण लॉर्ड्सवर चाहत्यांचा जल्लोष

लॉर्ड्सवर सुरू असलेल्या न्यूझीलंड-इंग्लंड कसोटी सामन्यात शनिवारी एक मजेदार घटना घडली. क्रिझवर इंग्लिश फलंदाज बेन स्टोक्स होता, विशेष म्हणजे त्याचा शनिवारी वाढदिवस होता. डी ग्रँडहोम गोलंदाजी करत होता. त्यावेळी ग्रँडहोमने स्टोक्सला क्लिन बोल्ड केले. त्याला केवळ 1 धाव काढता आल्याने स्टोक्स निराश होऊन पॅव्हेलियनकडे निघाला होता, त्याच वेळी सीमेजीवळ पोहोचण्यापूर्वीच अंपायरने नो बॉल दिला आणि मैदानावर एकच जल्लोष झाला.

स्टोक्स बाद झाल्यामुळे न्यूझीलंडचा संघ थोडासा निराश झाला होता, पण परत मैदानावर परतताना स्टोक्स खूपच आनंदी दिसत होता. त्याच्यासोबत असलेल्या जो रूटनेही त्याचे हसत हसत स्वागत केले. अंपायरच्या निर्णयाने हैराण झालेल्या इंग्लिश क्रिकेट चाहत्यांना सर्वाधिक आनंद झाला. स्टोक्सनेही कसोटीच्या निर्णायक वळणावर मिळालेल्या जीवदानाचा पुरेपूर फायदा घेतला आणि 54 धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली. त्याने कसोटीत 5000 धावाही पूर्ण केल्या.

इंग्लंडने गमावल्या होत्या 4 विकेट

इंग्लंडच्या डावातील 27व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर ग्रँड होमने एक शानदार इनस्विंग चेंडू टाकला, ज्यावर स्टोक्स क्लीन बोल्ड झाला. न्यूझीलंडच्या खेळाडूंनी आनंदाने उड्या मारल्या. कारण 277 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लिश संघाची सुरुवात चांगली झाली नाही आणि 69 धावांवर त्यांच्या चार विकेट पडल्या होत्या.

अशा स्थितीत प्रथमच कसोटीत कर्णधारपद भूषवणारा स्टोक्स 1 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला होता. फील्ड अंपायर मायकेल गफ यांनी त्याला नो बॉल म्हटले. ग्रँडहोमने ओव्हरस्टेप केले. ग्रँडहोमने स्टोक्सला वाढदिवसाची भेट म्हणून जीवदान दिले आणि स्टोक्स हसत हसत क्रीजवर परतला.

54 धावा करण्यासोबतच स्टोक्सने केले अनेक विक्रम आपल्या नावावर

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या डावात स्टोक्स 110 चेंडूत 54 धावा करून बाद झाला. या खेळीत त्याने 5 चौकार आणि 3 षटकारही मारले. त्याचबरोबर कसोटी क्रिकेटमध्ये 5000 हून अधिक धावा आणि 150 हून अधिक बळी घेणारा स्टोक्स हा पाचवा खेळाडू ठरला आहे. तो महान सर गॅरी सोबर्स, इयान बोथम, कपिल देव, जॅक कॅलिस यांसारख्या दिग्गज खेळाडूंच्या यादीत सामील झाला.

इंग्लंडला विजयासाठी 61 धावांची गरज

लॉर्ड्स कसोटीत नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने 132 धावा केल्या. त्याचवेळी इंग्लंडचा पहिला डाव 141 धावांवर आटोपला. इंग्लंडने पहिल्या डावात नऊ धावांची आघाडी घेतली होती. दुसऱ्या डावात न्यूझीलंडने 285 धावा केल्या आणि 277 धावांचे लक्ष्य ठेवले. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडने दुसऱ्या डावात 5 बाद 216 धावा केल्या आहेत. आता त्यांना विजयासाठी 61 धावांची गरज आहे.

बातम्या आणखी आहेत...