आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Zverev, Who Played On Clay Court For The First Time After The Last French Open, Won In Consecutive Sets

टेनिस:गत फ्रेंच ओपननंतर प्रथमच क्ले कोर्टवर खेळणाऱ्या ज्वेरेवची सलग सेटमध्ये बाजी

माँटे कार्लो2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जर्मन टेनिसपटू अलेक्झांडर ज्वेरेवने माँटे कार्लो मास्टर्स स्पर्धेत सलग सामने जिंकून आत्मविश्वास परत मिळवण्याच्या तयारीत आहे. स्पर्धेतील १३ व्या मानांकित ज्वेरेवने दुसऱ्या फेरीत स्पेनच्या रॉबर्टो बतिस्ता अगुटचा ६-४, ६-४ असा सरळ सेटमध्ये पराभव करत तिसरी फेरी गाठली. गेल्या वर्षीच्या फ्रेंच ओपननंतरची ही त्याची पहिली क्ले कोर्ट स्पर्धा आहे. ज्वेरेवने पहिल्या सेटमध्येच अगुटची सर्व्हिस मोडली आणि ३-२ अशी आघाडी घेतली होती. तिसऱ्या फेरीत त्याचा सामना डॅनियल मेदवेदेव आणि लोरेंझो सोनेगो यांच्यातील विजेत्याशी होणार आहे. दरम्यान, चौथ्या मानांकित नॉर्वेच्या कॅस्पर रूडने नेदरलँड्सच्या बोटिच व्हॅन डी गेंडस्कल्पला ७-५, ७-६ ने हरवले. रूडचा सामना आता जर्मनीच्या जॅन लेनार्ड स्ट्रफशी होणार आहे.