जाहिरात
जाहिरात
Home >> Sports >> Other Sports

Other Sports News

 • टोकियो : २०२० मध्ये होत असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी सध्या जपानमध्ये जय्यत तयारी सुरू आहे. जुलैमध्ये टोकियोत हवेतील आर्द्रता ८० टक्क्यांपर्यंत असते. तापमान ३० अंशापेक्षा अधिक नसते. तरीही प्रेक्षकांना उकाड्याचा त्रास होऊ नये म्हणून या प्रेक्षकांवर कृत्रिम बर्फवृष्टी केली जाणार आहे. याची चाचणी शुक्रवारी घेण्यात आली. सुमारे ३०० किलो बर्फाचा कृत्रिम बर्फवृष्टीसाठी वापर करण्यात आला. ही चाचणी यशस्वी झाली. कृत्रिम बर्फवृष्टीची चाचणी यशस्वी खास ऑलिम्पिकसाठी ८ नवे स्टेडियम बांधले....
  September 14, 08:04 AM
 • न्यूयॉर्क - कॅनडाच्या 19 वर्षीय बियांसा आंद्रेस्कूने अमेरिकेच्या सेरेना विलियम्सचा पराभव करत आपला पहिला US Opne चा खिताब पटकावला. शनिवारी झालेल्या अंतिम सामन्यातआंद्रेस्कूने सेरेनाचा 6-3, 7-5 अशा सरळ सेटने पराभव केला. हा सामना एक तास 40 मिनिटेचालला होता. सेरेनाच्या या पराभवासोबत तिचे 24 वे ग्रँडस्लॅम जिंकण्याचे स्वप्न मोडले. सेरेनेला सलग दुसऱ्यांदा अमेरिकी ओपनमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. गेल्या वर्षी जपानच्या नाओमी ओसाकाने सेरेनाचा पराभव केला होता. बियांसा यूस ओपन स्पर्धेत पदार्पणात...
  September 8, 01:22 PM
 • न्यूयॉर्क - यूएस ओपनमध्ये पुरुष एकेरीत फायनलमध्ये स्पेनचा राफेल नदाल आणि रशियाचा डेनियल मेदवेदेव भिडतील. जगातील नंबर २ टेनिसपटू नदाल पाचव्यांदा यूएस ओपनच्या फायनलमध्ये पोहोचला. तो चारही टेनिस ग्रँडस्लॅमच्या फायनलमध्ये ५ किंवा त्यापेक्षा अधिक वेळा पोहोचणारा जगातील दुसरा खेळाडू ठरला. यापूर्वी अशी कामगिरी स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररने केली आहे. पाचव्या मानांकित मेदवेदेवचा पहिला ग्रँडस्लॅम फायनल आहे. गेल्या महिन्यात रॉजर्स कपच्या फायनलमध्ये नदालने मेदवेदेवला सरळ सेटमध्ये हरवले...
  September 8, 08:55 AM
 • न्यूयॉर्क -वर्षातील अखेरच्या ग्रँडस्लॅम यूएस ओपनमध्ये महिला एकेरीच्या फायनलमध्ये ३७ वर्षीय सेरेना विलियम्स आणि १९ वर्षीय बियांका आंद्रेस्कू यांच्यात होईल. ६ वेळेची माजी चॅम्पियन सेरेना दहाव्यांदा या स्पर्धेच्या फायनलमध्ये पोहाचेली, दुसरीकडे आंद्रेस्कू पहिल्या काेणत्या ग्रँडस्लॅमची फायनल खेळेल. ती पहिल्यांदा यूएस ओपनच्या मुख्य फेरीत खेळत आहे. सेरेना सर्वाधिक वेळा फायनलमध्ये पोहोचलेली जगातील पहिली खेळाडू बनली. अमेरिकन सेरेना १९९९ मध्ये पहिल्या चॅम्पियन बनली. त्या वेळी...
  September 7, 09:34 AM
 • लाँगव्हिले : मैदानावरील खेळाडूंच्या वर्तनाबरोबर स्टेडियममधील प्रेक्षकांचे वर्तनदेखील खेळासाठी महत्त्वाचे आहे. याचाच भाग म्हणून फ्रेंच लीगने प्रेक्षकांच्या वर्तनावर झीरो टॉलरन्स पॉलिसी तयार केली. शुक्रवारी रात्री पीएसजीविरुद्ध मेट्स सामना दहा दिवसांत दुसऱ्यांदा प्रेक्षकांच्या गैरवर्तनामुळे थांबवण्यात आला. यापूर्वी नॅन्सी आणि ली मेन्स यांच्यातील सामनादेखील रोखण्यात आला होता. तो सामना पुन्हा सुरूच करता आला नाही. पीएसजी व मेट्स सामना जवळपास १५ मिनिटांनी पुन्हा सुरू केला....
  September 1, 10:59 AM
 • अमरावती-देशातील पारंपरिक खेळांच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद केली.तसेच मल्लखांबासारख्या डोळ्याचे पारणे फेडणाऱ्या खेळाच्या देशात आॅलिम्पिकच्या धर्तीवर स्पर्धा घेतल्या जातील, अशी केंद्रीय क्रीडा मंत्री किरेन रिजिजू यांनी माहिती दिली. मल्लखांब हा खेळ देशभरातच लोकप्रिय आहे. खो-खो, आट्यापाट्या, लाठीकाठी, लेझीम अशा खेळांनाही पुन्हा मानाचे स्थान िमळावे म्हणून क्रीडा मंत्रालयाचे प्रयत्न सुरू आहेत. या क्रीडा प्रकारांसाठी आर्थिक मदत, साहित्य देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत,...
  August 29, 08:59 AM
 • न्यूयॉर्क - यूएस ओपनच्या मैदानात उतरलेल्या २२ वर्षीय सुमीत नागलने आपला पहिला सामना खेळला. तोही २० ग्रँडस्लॅम विजेत्या रॉजर फेडररविरुद्ध. सुमीतने अपेक्षेपेक्षा उत्तम कामगिरी करत पहिला सेट जिंकला. फेडरर विरुद्ध ग्रँडस्लॅममध्ये पहिला सेट जिंकणारा तो पहिला भारतीय ठरला. नंतर मात्र फेडरर सरस ठरला आणि २ तास २९ मिनिटे चाललेल्या या सामन्यात सुमीतला हार पत्करावी लागली. सुमीत यूएस ओपन खेळणारा सर्वात तरुण भारतीय खेळाडू आहे. - सुमीतने पहिल्या सेटमध्ये फक्त ९ चुका केल्या, फेडररने १९. शेवटच्या...
  August 28, 09:12 AM
 • स्पोर्ट डेस्क- स्टार बॅडमिंटन खेळाडू पीव्ही सिंधू वर्ल्ड चँपियनशिप जिंकून मायदेशी परतली आहे. वर्ल्ड चँपियनशिप्समध्ये गोल्ड मेडल आपल्या नावावर करणारी सिंधून पहिली भारतीय खेळाडू आहे. हा ऐतिहासीक विजय मिळवून परतलेल्या सिंधुने आज(मंगळवार) पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि क्रिडा मंत्री किरण रिजिजू यांची भेट घेतली. नरेंद्र मोदींनी सिंधुच्या गळ्यात सुवर्ण पदक घातले सिंधू वर्ल्ड बॅडमिंटन चँपियनशिपमध्ये सुवर्ण जिंकणारी पहिली भारतीय आहे. या प्रसंगी सिंधुसोबत तिचे कोच पुलेला गोपीचंद आणि...
  August 27, 04:30 PM
 • स्पोर्ट डेस्क- वर्ल्ड चँपियनशिपमध्ये भारतासाठी पहिले गोल्ड जिंकणारी भारताची स्टार शटलर पीव्ही सिंधू आता गोल्डन गर्ल नावाने ओळखली जाऊ लागली आहे. सध्या सिंधू सगळ्यात जास्त ट्रेंडिंगमध्ये आहे. वर्ल्ड चँपियनशिपच्या फायनलमध्ये तिने जापानच्या नोजोमी ओकुहाराला 21-7, 21-7 या फरकाने पराभूत करुन टूर्नामेंटमध्ये विजय मिळवला. ही पहलीच वेळ आहे, जेव्हा एखाद्या भारतीयाने वर्ल्ड चँपियनशिपमध्ये विजय मिळवला आहे. सिंधू फक्त खेळाच्या मैदानावरच गोल्डन गर्ल नाहीये, तर कामाईच्या बाबतीत ती अवल्ल स्थानावर...
  August 26, 05:19 PM
 • बासेल -जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानावर असलेल्या बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू रविवारी एेतिहासिक यशाचा पल्ला गाठला. तिने वर्ल्ड चॅम्पियनशिप पटकावली. तिने अवघ्या ३८ मिनिटांमध्ये वर्ल्ड चॅम्पियन हाेण्याचा इतिहास रचला. जागतिक बॅडमिंटन स्पर्धेचा किताब जिंकणारी सिंधू ही पहिली भारतीय खेळाडू ठरली. यासह तिने विक्रमी यश संपादन केले. भारताच्या २४ वर्षीय सिंधूने महिला एकेरीच्या फायनलमध्ये २०१७ च्या किताब व विजेत्या नाओमी ओकुहारावर मात केली. तिने २१-७, २१-७ अशा फरकाने सरळ दाेन गेममध्ये अंतिम...
  August 26, 12:03 PM
 • औरंगाबाद -प्रचंड लवचिक शरीरयष्टी, चुरशीची चपळता आणि तल्लख बुद्धिमत्तेच्या बळावर याेगपटू श्रेया कंधारेला जागतिक स्तरावर आपला ठसा उमटवता आला. कबड्डीच्या प्रशिक्षणासाठी मैदानावर उतरलेल्या या प्रतिभावंत खेळाडूमधील ही शैली प्रशिक्षक चंद्रकांत पांगारे यांनी हेरली. त्यांनी तिला याेगामध्ये करिअरचा सल्ला दिला. श्रेयाने अल्पावधीत आपल्या तल्लखतेतून या खेळात उल्लेखनिय कामगिरी केली. यातूनच तिला आता आशियाई स्पोर्ट्स योगा स्पर्धेसाठी भारतीय संघातील आपला प्रवेश निश्चित करता आला. ही आशियाई...
  August 25, 09:36 AM
 • बासेल-ऑलिम्पिक पदक विजेती बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू आता एेतिहासिक सुवर्णपदकापासून अवघ्या एका पावलावर आहे. तिने शनिवारी जागतिक बॅडमिंटन स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. तिने महिला एकेरीच्या उपांत्य सामन्यामध्ये जागतिक क्रमवारीमध्ये तिसऱ्या स्थानावर असलेल्या युफेईला पराभूत केले. तिने २१-७, २१-१४ अशा फरकाने सामना जिंकला. यासह तिने आव्हान कायम ठेवताना अवघ्या ४० मिनिटांत पुढच्या फेरीत प्रवेश केला. भारतीय संघाच्या खेळाडूंनी दाेन वर्षांनंतर या स्पर्धेत दाेन पदके निश्चित केली आहेत. यात महिला...
  August 25, 09:31 AM
 • एकनाथ पाठक | आैरंगाबाद राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता मल्ल राहुल आवारे याने जागतिक कुस्ती स्पर्धेत तिसऱ्यांदा पात्रता मिळवत आपल्या शिरपेचात मानाचा नवीन तुरा खोवला आहे. मूळ पाटोदा (जि. बीड) येथील राहुल सप्टेंबरमध्ये कझाकिस्तानमध्ये होत असलेल्या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करेल. यापूर्वी,२०११ आणि २०१४ मध्येही जागतिक स्पर्धेत त्याने सहभाग नाेंदवला हाेता. आता कझाकिस्तानमध्ये १४ ते २२ सप्टेंबरदरम्यान ही स्पर्धा होत आहे. आहे. दिल्ली येथे निवड चाचणीत सर्वाेत्तम कामगिरी करत...
  August 22, 07:34 AM
 • नवी दिल्ली -जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिपला साेमवारपासून बासेल (स्विझर्लंड) येथे सुरुवात होत आहे. हे चॅम्पियनशिपचे २५ वे सत्र आहे. १९९५ नंतर पहिल्यांदा चॅम्पियनशिप स्वित्झर्लंडला होईल. यात ४५ देशांचे ३५७ खेळाडू सहभागी होतील. भारताचा १९ सदस्यीय संघ स्पर्धेत सहभागी होत आहे. एकेरीत भारताचे ६ खेळाडू आणि दुहेरीमध्ये ८ जोड्या प्रतिनिधित्व करतील. नुकत्याच झालेल्या थायलंड ओपनचा दुहेरीचा किताब जिंकणाऱ्या भारताच्या सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी व चिराग शेट्टीने दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार...
  August 19, 09:17 AM
 • स्पोर्ट डेस्क- भारतीय स्टार कुस्तीपटू बजरंग पूनियाला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार खेळातील सर्वोच्च पुरस्कार आहे. बजरंगला कुस्तीत चांगले प्रदर्शन केल्याबद्दल हा पुरस्कार मिळत आहे. भारतीय कुस्ती महासंघ(डब्ल्यूएफआय) ने या प्रतिष्ठीत अवॉर्डसाठी बजरंग पूनिया सोबत महिला कुस्तीपटू विनेश फोगाटच्या नावाची शिफारस केली होती. पूनियाने काही दिवसांपूर्वी तबिलिसी ग्रां प्रीमध्ये सुवर्ण पदक जिंकले होते. त्याने ईरानच्या पेइमान बिबयानीला पराभूत करुन 65 किलोग्राम...
  August 16, 06:15 PM
 • मेलबर्न -महिलांच्या टी-२० क्रिकेटचा आता राष्ट्रकुल स्पर्धेत समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे आगामी तीन वर्षांनंतर बर्मिंगहॅम येथे हाेणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेत महिलांच्या क्रिकेट सामन्यांचेही आयाेजन केले जाईल. त्यामुळे आता २०२२ बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेत महिलांच्या टी-२० क्रिकेटचा समावेश आहे. आठ संघांचा या स्पर्धेत सहभाग असेल. एकूण आठ सामने हाेतील. या स्पर्धेत एकूण १९ खेळ प्रकारांचा समावेश करण्यात आला आहे. १९९८ मध्ये मलेशियातील राष्ट्रकुल स्पर्धेत पहिल्यांदा क्रिकेटचा...
  August 14, 09:53 AM
 • न्यूयॉर्क -अमेरिकन टेनिसपटू सेरेना विलियम्स सलग चौथ्या वर्षी जागतील सर्वाधिक कमाई करणारी महिला खेळाडू बनली. दुसऱ्या स्थानावर नाओमी ओसाका आहे. ३७ वर्षीय सेरेनाने २०७ कोटी रुपये आणि २१ वर्षीय ओसाकाने १७२ कोटी रुपयांची कमाई केली. फोर्ब्जने जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या अव्वल १५ महिला खेळाडूंची यादी जाहीर केली. अव्वल १० मध्ये सर्व टेनिसपटू आहेत. भारताच्या पी.व्ही. सिंधू १३ व्या स्थानी घसरण झाली. ती गेल्या वर्षी सातव्या स्थानावर होती. २४ वर्षीय सिंधूची कमाई गेल्या वर्षीच्या तुलनेत २१ कोटी...
  August 8, 09:22 AM
 • नवी दिल्ली -सहा वेळेची विश्व चॅम्पियन बॉक्सर एम. सी. मेरी कोमला विना निवड चाचणी विश्व चॅम्पियनशिपसाठी भारतीय संघात स्थान मिळाले. राज्यसभा खासदार मेरी कोमने बॉक्सिंग फेडरेशन आॅफ इंडियाला पत्र लिहून निवड चाचणी घेऊ नये, असे म्हटले. चाचणीत सहभागी होणाऱ्या दोन खेळाडूंना तिने मेमध्ये झालेल्या इंडिया ओपनमध्ये हरवले आहे. तिचे मागील प्रदर्शन चांगले राहिले. अशात निवड चाचणी घेणे योग्य नाही, असे मेरी कोमने म्हटले. फेडरेशनने मेरी कोमचे म्हणणे योग्य ठरवत तिच्या गटात निवड चाचणी न घेण्याचा निर्णय...
  August 8, 09:15 AM
 • स्पोर्ट डेस्क- बॉक्सर एमसी मॅरीकॉमने 23 व्या प्रेसिडेंट्स कपच्या 51 किलो ग्राम स्पर्धेत सुवर्ण पदकाची कामगिरी केली आहे. आज(रविवार) इंडोनेशियाच्या लाबुआन बाजोमध्ये झालेल्या फायनलमध्ये तिने ऑस्ट्रेलियाच्या एप्रिल फ्रँक्सला 5-0 ने मात दिली. सहा वेळेसची वर्ल्ड चॅम्पियन मॅरीकॉमने या वर्षी मे महिन्यात इंडिया ओपन बॉक्सिंग टूर्नामेंटमध्येही सुवर्ण जिंकले होते. त्यानंतर झालेल्या एशियन गेम्समध्ये तिने भाग घेतला नव्हता. पण प्रेसिंडेट कपमध्ये ऑलिंपिकच्या तयारीसाठी तिने भाग घेतला. वुमन्स...
  July 28, 07:46 PM
 • न्यूयाॅर्क- जगातील सर्वात माेठ्या ई-स्पोर्ट्स इव्हेंटला आज शनिवारपासून न्यूयाॅर्क येथे सुरुवात हाेत आहे. फाेर्टनाइट वर्ल्डकप नावाने या स्पर्धेचे आयाेजन करण्यात आले. या स्पर्धेतील सहभागासाठी जगभरातील तब्बल चार काेटी चाहत्यांनी सहभाग नाेंदवला हाेता. मात्र, या क्वालिफायर्समधून अव्वल १०० गेमरची निवड करण्यात आली. यामध्ये १२ ते ४० वर्षांखालील खेळाडूंचा समावेश आहे. फाेर्टनाइट वर्ल्डकप हा जगात सर्वाधिक बक्षीस रक्कम असलेला ई-स्पोर्ट्स इव्हेंट आहे. यातील विजेत्यावर जवळपास २०० काेटी...
  July 27, 10:20 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात