Home >> Sports >> Other Sports

Other Sports News

 • नवी दिल्ली- भारताच्या प्रतिभावंत २१ वर्षीय मनीषा माेनने महिलांच्या जागतिक बाॅक्सिंग चॅम्पियनशिपमधील अापल्या माेहिमेला दमदार सुरुवात केली. तिने अापल्या वजन गटाच्या सलामी सामन्यातच धडाकेबाज विजयाची नाेंद केली. तिने पहिल्या फेरीत दाेन वेळच्या कांस्यपदक विजेत्या क्रिस्टीना क्रुजला पराभूत केले. तिने ५-० अशा फरकाने सलामीला एकतर्फी विजयाची नाेंद केली. यामुळे तिला अागेकूच करता अाली. पहिल्यांदाच जागतिक स्पर्धेच्या रिंगमध्ये उतरलेल्या या युवा बाॅक्सरने ३६ वर्षीय अनुभवी क्रिस्टिनाला...
  November 17, 11:15 AM
 • जर जेमिमा राॅड्रिग्जला एका शब्दात व्यक्त करायचे असल्यास पाॅझिटिव्ही हा शब्दच महत्त्वाचा ठरेल. कारण, तिच्यामध्ये प्रचंड सकारात्मक विचार अाहेत. ती देवाला सर्वात माेठी शक्ती मानते. देवाकडूनच अापल्याला सकारात्मक विचाराची सर्वात माेठी ऊर्जा मिळते, असे तिचे मत अाहे. दाैऱ्यावर नसताना ती नित्यनेमाने चर्चमध्ये जाते. भारतीय संघातील प्रतिभावंत खेळाडू म्हणून तिच्याकडे पाहिले जाते. तिने क्रिकेटमधील पदार्पणापूर्वी वयाच्या १७ व्या वर्षी राज्यस्तरीय हाॅकी स्पर्धेत मुंबई संघाचे...
  November 11, 10:05 AM
 • फुझाेऊ- जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या पी.व्ही. सिंधूने मंगळवारी किताबाच्या अापल्या माेहिमेला दमदार सुरुवात केली. तिने चायना अाेपन बॅडमिंटन स्पर्धेत अवघ्या २९ मिनिटांत एकतर्फी विजयाची नाेंद केली. दुसरीकडे भारताच्या अश्विनी पाेनप्पाला अापली सहकारी एन.सिक्की रेड्डीसाेबत महिला दुहेरीच्या सलामीला पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे या जाेडीचे स्पर्धेतील अाव्हान संपुष्टात अाले. त्यांचा विजयाचा प्रयत्न अपुरा ठरला. त्यापाठाेपाठ मनु अत्री अाणि बी.सुमीत रेड्डीलाही...
  November 7, 07:50 AM
 • अाैरंगाबाद- पहिल्यांदाच यजमानपदाची संधी मिळाल्यानंतर महिलांच्या अखिल भारतीय अांतरविद्यापीठ कुस्ती स्पर्धेला माेठी प्रसिद्धी मिळावी, यासाठी चक्क क्रीडा संचालक डाॅ. दयानंद कांबळे यांनी खाेटी आवई ठाेकली. या स्पर्धेच्या उद््घाटन साेहळ्यासाठी चक्क अाॅलिम्पिक पदक विजेती साक्षी मलिक अाणि विनेश फाेगट येणार असल्याचीही घाेषणा करण्यात अाली. मात्र, प्रसिद्धीसाठी क्रीडा विभागाने रचलेला हा कुटिल डाव समाेर अाला. प्रत्यक्षात साक्षी मलिक अाणि तिचे प्रशिक्षक कुलदीप यांच्याशी काेणत्याही...
  November 4, 10:02 AM
 • एडिनबर्ग- स्कॉटलंडची फुटबॉल लीग स्कॉटिश प्रीमियरशिप बुधवारी युद्धाचे मैदान बनले. हार्ट ऑफ मिडलोथियन आणि हिबेरनियन टीम यांच्यातील सामन्यादरम्यान चाहत्यांनी मैदानावर चिल्लर पैसे फेकले. खेळाडूंना मैदानात खाली पाडले. दोन्ही संघांचे खेळाडूदेखील आपापसात भिडले. हा सामना ०-० ने बरोबरी सुटला. सामन्याच्या ६५ व्या मिनिटाला हिबेरनियन टीमचा कामबेरी आणि हार्ट टीमच्या ओली बोजानिच यांच्यात बाचाबाची झाली. रेफ्रीने त्यांना रेड कार्ड दाखवत बाहेर केले. त्यानंतर हिबेरनियनच्या चाहत्यांचा संताप...
  November 4, 08:30 AM
 • न्यू हॅम्पशायर - जलतरणपटू आणि टीव्ही होस्ट व्हिक्टोरिया अर्लेन हिची ही कथा आहे. इंग्लंडमध्ये राहणाऱ्या व्हिक्टोरियाला 11 वर्षाची असताना फ्लूसारखी लक्षणे दिसु लागली आणि बऱ्याचदा बेशुद्ध होत होती. कालांतराने तिच्या मेंदू-शरीराला पॅरालिसीस झाला आणि ती कोमात गेली. कुटुंबाने तिला ब्रेन डेड समजून फीडिंग ट्यूबच्या आधारे जिवंत ठेवले. पण 4 वर्षांनंतर, व्हिक्टोरियाने कोमातून बाहेर पडल्यानंतर डॉक्टर आणि कुटुंबियांना धक्काच दिला. कोमात असताना 4 वर्षांत घडलेल्या प्रत्येक गोष्टीची तिला माहिती...
  October 31, 06:24 PM
 • व्हेनेझुएला -गोल करणे हा कोणत्याही फुटबॉलपटूसाठी आनंददायी क्षण आहे. परंतु, व्हेनेझुएलाच्या स्ट्रायकरने वेगळ्या पद्धतीने हा गोल साजरी केला. त्याने प्रेक्षकांमध्ये बसलेल्या गर्लफ्रेंडच्या दिशेने धाव घेतली आणि सर्वांसमोर तिला प्रपोज केले. एड्वार्ड बेलो सी.डी. साठी खेळतो. चिलीच्या एव्हर्टन विरुद्ध झालेल्या गेमच्या दुसऱ्या मिनिटात त्याने गोल केला आणि खास शैलीत आपला गोल साजरा केला. प्रसारमाध्यमांच्या अहवालानुसार, कोचिंग स्टाफच्या सदस्याकडून रिंग घेउन, स्टॅन्डमध्ये धावला आणि नंतर...
  October 31, 03:15 PM
 • सिन्नर-येथील मैदानावर अाज बुधवारपासून मराठमाेळ्या कबड्डी स्पर्धेच्या चित्तथरारक सामन्यांचा थरार रंगणार अाहे. येथे ६६व्या वरिष्ठ गट पुरुष व महिला राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत राज्यातील एकूण ४७ संघ सहभागी झाले अाहेत. यात २५ पुरुष अाणि महिलांच्या २२ संघांचा समावेश अाहे. या स्पर्धेचा फायनल मुकाबला ४ नाेव्हेंबर राेजी हाेईल. महाराष्ट्र राज्य कबड्डी असो.च्या मान्यतेने नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशन जिल्हा परिषद नाशिक व सह्याद्री युवा...
  October 31, 08:59 AM
 • भिवानी (हरियाणा) - एकेकाळी बॉक्सिंगमध्ये देशाचे नाव उंचावणारा राष्ट्रीय स्तरावरील बॉक्सर दिनेश कुमार सध्या भिवानी शहरातील रस्त्यांवर कुल्फी विकतांना दिसत आहे. त्याचे काही फोटोज सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत. त्याच्या करियरमध्ये त्याने 17 सुवर्ण, 1 रौप्य आणि 5 कास्य पदक जिंकल्याचा दावा बॉक्सर दिनेश कुमारने केला आहे. पण आज, दोन वेळचे अन्न मिळविण्यासाठी आणि वडिलांच्या डोक्यावरील कर्जाचा भार कमी करण्यासाठी भिवानीमध्ये कुल्फी विकत आहे. वृत्तसंस्था ANIच्या अहवालानुसार, मी आंतरराष्ट्रीय...
  October 29, 07:27 PM
 • पॅरिस- अाॅलिम्पिक पदक विजेत्या सिंधू, सायना नेहवाल अाणि के. श्रीकांतला अापली विजयी माेहीम कायम ठेवता अाली नाही. त्यामुळे या तिघांचेही फ्रेंच अाेपन बॅडमिंटन स्पर्धेतील अाव्हान संपुष्टात अाले. त्यांना अापापल्या गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. भारताच्या पदकाची मदार ही स्वस्तिकराज अाणि चिराग शेट्टीवर हाेती. मात्र, या जाेडीला पुरुष दुहेरीच्या अंतिम चारमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. यासह या स्पर्धेतील भारतीय खेळाडूंचे अाव्हान संपुष्टात अाले. सायना ३६...
  October 28, 07:15 AM
 • पुणे- सहाव्या सत्राच्या प्राे कबड्डी लीगला अाता चांगलाच रंग चढला अाहे. चुरशीच्या चढाया अाणि सरस पकडीच्या अाधारे सामन्यागणिक थरार वाढत अाहे. यातच अाता तेलगू टायटन्सचा कर्णधार राहुल चौधरीने विक्रमाला गवसणी घातली. अापल्यातल्या प्रतिभेच्या बळावर त्याने त प्रो कबड्डीमध्ये ७०० रेड पॉइंट्सची कमाई केली. त्याने लीगच्या अातापर्यंतच्या ८४ सामन्यातून हा पल्ला यशस्वीपणे गाठला अाहे. अशी कामगिरी करणारा ताे एकमेव कबड्डीपटू ठरला आहे. त्याने हा पल्ला मंुम्बाविरुद्ध सामन्यातून गाठला. यामुळे...
  October 27, 07:38 AM
 • नवी दिल्ली- व्यावसायिक बॅडमिंटनपटूंना करिअरमध्ये बक्षिसांची रक्कम अाणि जाहिरातींच्या माध्यमातून सर्वाधिक कमाई करण्याची संधी असते. नुकतीच या खेळाच्या सर्वात माेठ्या बीडब्ल्यूएफनेही याच्या अांतरराष्ट्रीय स्पर्धेतील बक्षिसांच्या रकमेत वाढ केली. त्यामुळे पदक विजेत्या खेळाडूंवर काेट्यवधी रुपयांच्या बक्षिसांचा वर्षाव हाेताेे. एका अहवालानुसार सायना नेहवाल ही याच सर्वाधिक कमाईच्या टाॅप-५ च्या यादीमध्ये झळकली. तिने या यादीत पाचव्या स्थानी धडक मारली. तिची वर्षाकाठची कमाई साडेपाच...
  October 26, 09:13 AM
 • मस्कत - जबरदस्त फाॅर्मात असलेल्या चॅम्पियन भारतीय संघाला अाता एशियन चॅम्पियन्स ट्राॅफी हाॅकी स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा उपांत्य फेरीत प्रवेश करण्याची संधी अाहे. भारताचा चाैथा सामना अाज मंगळवारी मलेशियाशी हाेईल. भारताने नुकतीच स्पर्धेत विजयाची हॅट््ट्रिक साजरी केली. भारताने स्पर्धेतील अापल्या तिसऱ्या सामन्यात जपानला धूळ चारली. जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानावर असलेल्या भारताने ९-० ने सामना जिंकला. मनदीप सिंगने (४,४९,५७ वा मि.) गाेलची हॅट््ट्रिक नाेंदवून संघाच्या विजयात माेलाचे...
  October 23, 09:50 AM
 • अाॅस्टिन - फेरारीच्या रेसर किमी रायकाेनेने नुकतीच अमेरिकन अाेपन फाॅर्म्युला वनची ट्रॉफी पटकावली. त्याने हा किताब तब्बल ११३ रेसनंतर जिंकला. यानंतरचे त्याचे हे पहिले विजेतेपद ठरले. यामुळे त्याच्या नावे एफ वनच्या इतिहासामध्ये सर्वाधिक रेसच्या अंतरानंतर किताब जिंकण्याचा विक्रमही नाेंद झाला.याशिवाय त्याने विक्रमात इटलीच्या रिकार्डाेला मागे टाकले. रिकार्डाेच्या नावे ९९ रेसनंतर ट्राॅफी जिंकण्याचा विक्रम नाेंद हाेता. अाता यामध्ये रायकाेनेने बाजी मारली. त्याने १९८३ मध्ये अाफ्रिकन...
  October 23, 09:49 AM
 • जगातील तिसऱ्या सर्वाधिक कमाई करून देणाऱ्या लाेकप्रिय अमेरिकन बास्केटबाॅल लीगला अाज बुधवारपासून सुरुवात हाेत अाहे. या स्पर्धेत यंदा ३० संघ सहभागी झाले अाहेत. या लीगच्या माध्यमातून तब्बल ५० हजार काेटींची कमाई केली जाते. त्यामुळे ही लीग अधिक लाेकप्रिय अाहे. या लीगच्या किताबासाठी पुढच्या वर्षी ८ जून २०१९ राेजी फायनल मुकाबला रंगणार अाहे. यातून नवा चॅम्पियन संघ मिळेल. या लीगचे हे यंदाचे ७३ वे सत्र अाहे. या लीगमध्ये सलामीचा सामना १७ वेळच्या चॅम्पियन बाेस्टन सेल्टिक्स अाणि फिलाडेल्फिया-७...
  October 17, 09:22 AM
 • स्पोर्ट्स डेस्क - लैंगिक अत्याचार विरोधात आवाज उठवण्यासाठी सुरू झालेल्या #MeeToo मोहिमेने जगभरातील सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. यात महिला प्रामुख्याने कामाच्या ठिकाणी होणाऱ्या किंवा भूतकाळात झालेल्या आपल्या मानसिक आणि शारीरिक छळांचा खुलासा करत आहेत. या मोहिमेची भारतात सध्या तनुश्री दत्तामुळे चर्चा असतानाच आता प्रसिद्ध माजी बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टाने आपल्या भावना व्यक्त केल्या. परंतु, ट्विटरवर त्या घडामोडी शेअर करताना तिने कुणाचेही नाव घेणे टाळले आहे. Maybe I should talk about the mental harassment I had to go...
  October 10, 11:40 AM
 • चेन्नई - सहाव्या सत्राच्या प्राे कबड्डी लीगला अाज रविवारपासून सुरुवात हाेत अाहे. या स्पर्धेच्या ट्राॅफीचे शनिवारी चेन्नईमध्ये माेठ्या उत्साहात अनावरण करण्यात अाले. या साेहळ्याला स्पर्धेत सहभागी १२ संघांचे कर्णधार उपस्थित हाेते. यंदाच्या या स्पर्धेतील सामन्यांचा थरार तब्बल ९१ दिवस रंगणार अाहे. ५ जानेवारीला फायनल हाेईल. सलामी सामना तामिळ अाणि पाटणा पायरेट्स यांच्यामध्ये हाेणार अाहे. अनावरण सोहळ्यासाठी सुनील कुमार, सुरजित सिंग, जोगिंदरसिंग, सुरेंद्र नाडा, अनुप कुमार, परदीप नरवाल,...
  October 7, 11:00 AM
 • बिशम (इंग्लंड)- इंग्लंडच्या टीमची हाॅकी वर्ल्डकपसाठीची तयारी अाता शेवटच्या टप्यात अाहे.भारतातील भुवनेश्वर येथे २८ नाेव्हेंबरपासून हाॅकीच्या विश्वचषक स्पर्धेला सुरुवात हाेईल. या स्पर्धेसाठी इंग्लंडचा संघ कसून मेहनत घेत अाहे. यासाठी बिशमच्या एबे नॅशनल स्पाेर्ट्स सेंटरवर खास प्रशिक्षण अाणि सराव शिबिराचे अायाेजन करण्यात अाले. याठिकाणी इंग्लंड संघातील खेळाडू हे ३५ ते ४० डिग्री तापमानामध्ये सराव करताना दिसतात. याच्या अाधारे हे खेळाडू भारतामधील वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी...
  October 1, 08:13 AM
 • नवी दिल्ली - राष्ट्रपती भवनात मंगळवारी राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. राष्ट्रपती रामनाथ कोवींद यांनी भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहली आणि वेटलिफ्टर मीराबाई चानू यांचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने गौरव करण्यात आला. तर अॅथलिट हिमा दास हिला अर्जुन पुरस्काराने गौरवण्यात आले. #WATCH: Indian skipper Virat Kohli receives Rajiv Gandhi Khel Ratna Award from President Ram Nath Kovind at Rashtrapati Bhavan in Delhi. pic.twitter.com/wqBKArEOJ3 ANI (@ANI) September 25, 2018 एशियाडमुळे सप्टेंबरमध्ये केले पुरस्कार वितरण दरवर्षी हे पुरस्कार मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनी...
  September 25, 06:31 PM
 • न्यूयाॅर्क- जपानच्या २० वर्षीय नाअाेमी अाेसाकाने रविवारी एेतिहासिक कामगिरी नाेंदवली. तिने सत्रातील शेवटच्या अमेरिकन अाेपन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीचा किताब पटकावला. यासह तिने करिअरमध्ये पहिला ग्रँडस्लॅम किताब पटकावला. तसेच ग्रँडस्लॅम चॅम्पियन ठरलेली अाेसाका ही जपानची पहिली महिला टेनिसस्टार ठरली. जपानच्या युवा टेनिसपटू अाेसाकाने फायनलमध्ये सहा वेळच्या चॅम्पियन सेरेना विल्यम्सवर मात केली. तिने सरस खेळी करताना सरळ दाेन सेटमध्ये अंतिम सामना जिंकला. तिने ६-२, ६-४ अशा फरकाने...
  September 10, 08:32 AM
 
जाहिरात

RECOMMENDED