जाहिरात
जाहिरात
Home >> Sports >> Other Sports

Other Sports News

 • औरंगाबाद-साईच्या अॅस्ट्रोटर्फ मैदानावर सुरू असलेल्या राष्ट्रीय ज्युनियर हॉकी स्पर्धेत गत विजेत्या हरियाणा संघाने शानदार प्रदर्शन करत बाद फेरीत प्रवेश केला. या स्पर्धेच्या बाद फेरीत स्थान मिळवणारा हरियाणा पहिला संघ ठरला. दुसरीकडे यजमान महाराष्ट्र संघाला सलग तिसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला. यजमान संघाचे आता जवळपास आव्हान संपुष्टात आले आहे. तगड्या पंजाब संघाला चंदिगड संघाने बरोबरीत रोखले. बुधवारी झालेल्या सामन्यात दिल्ली हॉकी संघाने महाराष्ट्रावर १-० गोलने मात केली. सामन्यात...
  February 21, 07:48 AM
 • वॉशिंग्टन- माजी नंबर वन सेरेना विल्यम्सने दमदार पुनरागमन करताना जागतिक क्रमवारीमध्ये मोठी प्रगती साधली. तिने महिला एकेरीच्या क्रमवारीच्या टॉप-१० मध्ये धडक मारली. अमेरिकेच्या सेरेनाने ३४०६ गुणांसह दहावे स्थान गाठले. दुसरीकडे ऑस्ट्रेलियन ओपन चॅम्पियन नाओमी ओसाकाने अव्वल स्थान कायम ठेवले. तसेच रोमानियाची सिमोना हालेप ही दुसऱ्या स्थानावर आली. पुरुष गटात सर्बियाच्या नोवाक योकोविकने आपले अव्वल स्थान कायम ठेवले. स्विसकिंग रॉजर फेडररने सातव्या स्थानावर धडक मारली. तसेच स्पेनचा राफेल नदाल...
  February 20, 08:40 AM
 • औरंगाबाद- यजमान महाराष्ट्र युवा संघाला आपल्या घरच्या मैदानावरील ९ व्या राष्ट्रीय ज्युनियर हॉकी चॅम्पियनशिपमध्ये सलग दुसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला. यजमान टीमचा सोमवारी विजयी ट्रॅकवर येण्याचा प्रयत्न अपयशी ठरला. पाहुण्या गंगपूर-ओडिशा टीमने सोमवारी स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात यजमान महाराष्ट्राचा पराभव केला. ओडिशा टीमने २-१ अशा फरकाने सामना जिंकला. अमरदीप लाक्रा (३६ वा मि.) आणि ग्रेगोरी झेसने (५१ वा मि.) गोल करून आपल्या टीमचा विजय निश्चित केला. महाराष्ट्राकडून व्यंकटेश केचेने (२८ वा...
  February 19, 06:54 AM
 • दोहा- बेल्जियमची एलाइज मर्टेन्स कर ओपन चॅम्पियन बनली. मर्टेन्सने अव्वल मानांकित सिमोना हालेपला ३-६, ६-४, ६-३ ने पराभूत केले. हा मर्टेन्सच्या करिअरमधील सर्वात मोठा विजय ठरला. २३ वर्षीय मर्टेन्सने जगातील तिसऱ्या क्रमांकाची खेळाडू हालेपला जवळपास दोन तासांत हरवले. रोमानियाच्या २७ वर्षीय हालेपने पहिला सेट सहज ६-३ ने जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये मर्टेन्सला ८ मिनिटांचा वैद्यकीय वेळ घ्यावा लागला. तिने सलग १८ गुण गमावले. त्यानंतर सामन्यात पुनरागमन करत किताब आपल्या नावे केला. मर्टेन्सने एका आठवड्यात...
  February 18, 09:43 AM
 • मुंबई- महाराष्ट्र आणि भारतीय मल्लखांब संघटनेतर्फे मुंबई आयोजित पहिल्या जागतिक मल्लखांब स्पर्धेवर यजमान भारतीय खेळाडूंनी वर्चस्व राखले. स्पर्धेत १५ देशांच्या १५० पेक्षा अधिक खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. महिला गटात भारतीय संघाने २४४.७३ गुणांसह सर्वसाधारण विजेतेपद मिळवले. सिंगापूर संघ ४४.४५ गुणांसह दुसऱ्या आणि ३०.२२ गुणांसह मलेशिया संघाने तृतीय क्रमांक राखला. यात दोरी आणि खांबावर खेळाडूंनी चित्तथरारक कौशल्य दाखवले. विदेशी खेळाडूंनी शानदार कामगिरी केली. विजेत्या खेळाडूंना...
  February 18, 09:40 AM
 • गुवाहाटी- जगातील माजी नंबर वन सायना नेहवालने अवघ्या ४४ मिनिटांत सीनियर राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत चॅम्पियन होण्याचा बहुमान पटकावला. तिने शनिवारी महिला एकेरीच्या फायनलमध्ये ऑलिम्पिक पदक विजेत्या पी.व्ही. सिंधूचा पराभव केला. यासह तिने आपल्या करिअरमध्ये चौथ्यांदा या स्पर्धेचे विजेतेपद आपल्या नावे केले. दुसरीकडे पुरुष गटात सौरभ वर्मा हा किताबाचा मानकरी ठरला. माजी किताब विजेत्या पी.कश्यपचा पराभव करून लक्ष्य सेनने पुरुष एकेरीची अंतिम फेरी गाठली होती. मात्र, त्याला आपली ही विजयी...
  February 17, 09:41 AM
 • ब्रिटिश किक बॉक्सर टायसन फ्युरी यांनी एका सामन्यातून मिळालेले सात कोटी रुपयांचे बक्षीस दान केले आहे. रस्त्यावर भटकणाऱ्या नशेबाजांना या व्यसनापासून सोडवण्यासाठी तसेच त्यांना राहण्यासाठी घर मिळावे या हेतूने त्यांनी ही रक्कम या क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना दान केली. टायसन फ्युरी स्वत: अनेक वर्षे अमली पदार्थांच्या व्यसनाला बळी पडले होते. यामुळे त्यांना मानसिक आजारही जडले होते. पण यातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी बॉक्सिंगमध्ये कमालीचे यश मिळवले. मैदानात उतरल्यावर...
  February 15, 12:04 AM
 • औरंगाबाद- इच्छाशक्ती आणि प्रचंड मेहनत करण्याची जिद्द असली की निश्चित केलेल्या ध्येयाला गाठता येते. यासाठी येणाऱ्या संकटावर मात करण्याचे बळ सहज मिळते, याचाच प्रत्यय प्रतिभावंत युवा फुटबॉलपटू राहुल कडलगने आणून दिला. पुण्यातील क्रीडा प्रबोधिनीत फुटबॉलचे धडे गिरवलेल्या या गुणवंत खेळाडूची प्रतिष्ठेच्या संतोष ट्रॉफीसाठी पात्र ठरलेल्या महाराष्ट्र संघात निवड झालेली आहे. त्याने पात्रता फेरीतच आपली चुणूक दाखवताना संघाला या स्पर्धेच्या मुख्य फेरीचे तिकीट मिळवून दिला. अशा प्रकारे...
  February 13, 08:49 AM
 • सोलापूर- जबरदस्त फॉर्मात असलेल्या यजमान महाराष्ट्र संघाने आपल्या घरच्या मैदानावर सरस खेळी करताना मंगळवारी संताेष ट्रॉफी फुटबॉल स्पर्धेच्या पात्रता फेरीत विजयाची हॅट्ट्रिक साजरी केली. महाराष्ट्राने स्पर्धेतील आपल्या तिसऱ्या सामन्यात राजस्थानचा पराभव केला. महाराष्ट्राने १-० अशा फरकाने सामना जिंकला. यजमान महाराष्ट्र संघाचा स्पर्धेतील हा सलग तिसरा विजय ठरला. दुर्वेश निजपने (६२ वा मि.) निर्णायक गाेल करून महाराष्ट्राला राेमहर्षक विजय मिळवून दिला. सलग तिसऱ्या विजयासह महाराष्ट्राने...
  February 13, 08:45 AM
 • दुबई- यजमान न्यूझीलंड संघाने पाहुण्या टीम इंडियाविरुद्धची तीन टी-२० सामन्यांची मालिका नुकतीच जिंकली. या मालिकेत भारतीय संघातील युवांनी उल्लेखनीय कामगिरी केली. मात्र, टीमला आपला मालिका पराभव टाळता आला नाही. याच खेळीमुळे या युवांना आयसीसीच्या टी-२० क्रमवारीमध्ये मोठी प्रगती साधता आली. यामध्ये टीम इंडियाचा चायनामॅन स्पिनर कुलदीप यादव चमकला. त्याने शेवटच्या टी-२० सामन्यात अव्वल गोलंदाजी केली. त्यामुळे त्याला क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर धडक मारता आली. त्याने करिअरमध्ये पहिल्यांदा दुसरे...
  February 12, 11:51 AM
 • सोलापूर- यजमान महाराष्ट्र फुटबॉल संघाने आपली लय कायम ठेवताना संतोष ट्रॉफीची मुख्य फेरी गाठली. यंदाच्या पात्रता फेरीत महाराष्ट्र संघाची कामगिरी काैतुकास्पद ठरली. युवांच्या अव्वल खेळीमुळे आता महाराष्ट्राच्या दोन दशकांनंतर चॅम्पियन होण्याच्या आशा पल्लवित झाल्या. दुसरीकडे गतविजेता केरळ व उपविजेता पश्चिम बंगालचे संघ पात्रता फेरीतच गारद झाले आहेत. त्यामुळेच महाराष्ट्राचा यंदा किताब जिंकण्याचा दावा मजबूत आहे. यासाठी युवा शिलेदार उत्सुक आहेत. १९९९ नंतर महाराष्ट्राला विजेतेपद मिळू...
  February 12, 09:12 AM
 • औरंगाबाद- उराशी बाळगलेल्या सोनेरी यशासाठी मुलगा विक्रमची धडपड व मेहनतीला आई लता यांचे सातत्याने पाठबळ लाभत होते, मात्र प्रचंड मेहनत करणाऱ्या मुलाला आवश्यक असणारा खुराक कमी पडत होता. घरातील सारे काही विकूनही हा पुरेसा असा डायट पुरवला जात नव्हता. वाढत्या महागाईमुळे महिन्याकाठी हा खर्च पन्नास हजारांच्या घरात. त्यामुळे आपण कमी पडल्याची खंत या माउलीच्या मनाला सारखी बोचत होती. अखेर तिने मुलाच्या स्वप्नपूर्तीसाठी थेट आपले सौभाग्याचे लेणे असलेले मंगळसूत्रच विकायला काढले. यातून मिळालेल्या...
  February 11, 09:31 AM
 • कोलकाता- डेव्हिस कपला टेनिसचा वर्ल्डकप मानले जातो. या स्पर्धेत जगभरातील अव्वल दर्जाचे पुरुष खेळाडू सहभागी होतात. हे खेळाडू सातत्याने आपले काैशल्य पणास लावतात. या जागतिक स्तरावरील स्पर्धेला ११९ वर्षांपूर्वी सुरुवात झाली. सुरुवातीला या पहिल्या स्पर्धेत अमेरिका आणि इंग्लंड हे दोनच संघ सहभागी झाले होते. आता या स्पर्धेला जागतिक स्तरावर मोठी लोकप्रियता लाभली. त्यामुळेच आजच्या घडीला या स्पर्धेत १३३ संघ सहभागी होतात. शुक्रवारपासून या स्पर्धेच्या पात्रता फेरीतील सामन्यांना सुरुवात झाली....
  February 2, 11:44 AM
 • औरंगाबाद- प्रतिभावंत खेळाडूंच्या उल्लेखनीय खेळीच्या बळावर यजमान महाराष्ट्राने खेलो इंडिया यूथ गेम्समध्ये प्रथमच पदकांचे द्विशतक साजरे केले. प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनात या खेळाडूंनी हा पदकाचा पल्ला गाठला. मात्र, महाराष्ट्राला पदक तालिकेत अव्वल स्थान मिळवून देण्याचे मोलाचे कार्य करणाऱ्या खेळाडूंच्या प्रशिक्षकांकडेच दुर्लक्ष करण्यात आले. क्रीडा मंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी या प्रशिक्षकांकडे पाठ फिरवली. इतर राज्यांत प्रशिक्षकांना मोठ्या रकमेचे पारितोषिक जाहीर झाले. मात्र,...
  February 1, 08:23 AM
 • जकार्ता- भारतीय महिला फुटबॉल टीमने इंडोनेशिया संघावर सलग दुसरा विजय मिळवला. भारताने दुसऱ्या मैत्रीपूर्ण सामन्यात इंडोनेशियाला २-० ने हरवले. भारताने दोन्ही गोल हाफमध्ये केले. रत्नबालाच्या पासवर संजूने २० व्या मिनिटाला पहिला गोल केला. डांगमेई ग्रेसने दुसऱ्या हाफमध्ये अतिरिक्त वेळेत ९२ व्या मिनिटाला संघासाठी दुसरा गोल करत २-० ने आघाडी घेतली. भारतीय टीमने रविवारी रत्नबाला देवीच्या हॅट्ट्रिकच्या जोरावर इंडोनेशियाला ३-० ने हरवले होते.
  January 31, 09:09 AM
 • व्हिएन्ना- हे छायाचित्र ऑस्ट्रियाच्या वेसेन्से तलावावर होणाऱ्या अल्टरनेटिव्ह इलेव्हन सिटी टूर शर्यतीचे आहे. चार दिवस चालणाऱ्या शर्यतीतील गुरुवारी अखेरचा क्रीडा प्रकार होती. बर्फाच्छादित तलावावर होणारी ही जगातील सर्वात मोठी क्रीडा स्पर्धा आहे. पहिल्या दिवशी ग्रांप्री नॅच्युरल आइस स्केटिंग प्रकार होतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मॅरेथॉन होते. पुरुष मॅरेथॉन १५०० किमी आणि महिला गटात १०० किमी शर्यत असते. तिसऱ्या दिवशी ६० किमी पुरुष ग्रांप्री व ४० किमी महिला ग्रांपी होते. अखेरच्या दिवशी...
  January 31, 08:41 AM
 • मार्सिया- सलामीच्या पराभवातून सावरलेल्या भारतीय महिला संघाने उल्लेखनीय खेळीच्या बळावर सोमवारी यजमान स्पेनच्या टीमला दुसऱ्या सामन्यात रोखले. त्यामुळे या दोन्ही संघांमधील दुसरा सामना १-१ ने बरोबरीत राहिला. भारत आणि स्पेन यांच्यात हॉकी मालिकेतील दुसरा सामना मार्सियाच्या मैदानावर झाला. भारताकडून गुरजित कौरने एकमेव गोल केला. तिचा या मालिकेतील दुसरा गोल ठरला. तसेच यजमानांसाठी मारियाने गोल केला. तिलाही आपली लय कायम ठेवताना मालिकेत दुसरा गोल नोंदवता आला. आता मालिकेतील तिसरा सामना आज...
  January 29, 08:45 AM
 • जकार्ता- भारताची २८ वर्षीय बॅडमिंटनपटू सायना नेहवाल ही इंडोनेशिया मास्टर्स किताबाची मानकरी ठरली. तिने रविवारी या स्पर्धेत महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले. तीन वेळच्या वर्ल्ड चॅम्पियन कॅरोलिना मरीनला महिला एकेरीच्या अंतिम सामन्यादरम्यान गंभीर दुखापत झाली. त्यामुळे तिला पुढे खेळता आले नाही. भारताच्या सायनाला विजयी घोषित करण्यात आले. अशा प्रकारे या स्पर्धेच्या अंजिक्यपदाचा बहुमान मिळवणारी सायना ही पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली. याशिवाय तिने करिअरमध्ये दुसऱ्यांदा बीडब्ल्यूएफचा...
  January 28, 08:38 AM
 • मेलबर्न- जगातील नंबर वन टेनिसपटू नोवाक योकोविक हा रविवारी सत्रातील पहिल्या ग्रँडस्लॅम ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये चॅम्पियन ठरला. या अव्वल मानांकित टेनिसपटूने स्पर्धेत पुरुष एकेरीचा किताब पटकावला. यासह त्याच्या नावे विक्रमी सातव्या ऑस्ट्रेलियन किताबाची नोंद झाली. यादरम्यान त्याने स्विस किंग रॉजर फेडरर आणि ऑस्ट्रेलियाच्या रॉय एमर्सनला मागे टाकले. या दोघांच्या नावे प्रत्येकी सहा किताबांची नोंद आहे. तसेच दुसरीकडे जपानची ओसाका ही महिला एकेरीच्या किताबाची मानकरी ठरली. तिने फायनलमध्ये चेक...
  January 28, 08:14 AM
 • मेलबर्न- जगातील नंबर वन नोवाक योकोविकची नजर आता सलग तिसऱ्यांदा ग्रँडस्लॅम किताब जिंकण्यावर लागली आहे. त्याने शुक्रवारी सत्रातील पहिल्या ग्रँडस्लॅम ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेची फायनल गाठली. आता त्याचा किताबासाठीचा अंतिम सामना माजी नंबर वन आणि क्ले कोर्ट किंग राफेल नदालशी होईल. हे दोघेही रविवारी पुरुष एकेरीच्या फायनलमध्ये समोरासमोर असतील. सर्बियाच्या योकोविकने सातव्यांदा या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. त्याला आता सलग तिसऱ्या ग्रँडस्लॅम किताबावर नाव कोरण्याची संधी आहे. त्याने...
  January 26, 10:50 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात