जाहिरात
जाहिरात
Home >> Sports >> Other Sports

Other Sports News

 • न्यूयॉर्क: गेल्या दोन दिवसांपासून धक्कादायक निकालांमुळेच अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेतील लढती अधिकच रंगतदार होत आहेत. एकेरीत पराभवाचा धक्का बसलेल्या भारताच्या सोमदेवने पुरुष दुहेरीत आघाडी घेतली असून मिश्र दुहेरीत भारताला पराभवाचा जबर धक्का बसला. भारताची सानिया-भूपती ही जोडी दारुण पराभवाला सामोरी गेली तसेच महिला एकेरीत सेरेना विल्यम तर पुरुष एकेरीत नोवाक जोकोविच, फेडरर या अव्वल मानांकित टेनिसपटूंनी तिसया फेरीत दिमाखदारपणे धडक मारली. अमेरिकन ओपन स्पर्धेच्या सहाव्या दिवशी...
  September 3, 04:23 AM
 • कोलकाता: साल्क लेक मैदानावर खेळल्या गेलेल्या अटीतटीच्या लढतीत स्टार स्ट्रायकर लियोनल मेस्सीच्या अर्जेटिना संघाने 1-0 गोलने वेनेझुएलाचा पराभव करत शानदार विजयाची नोंद केली. कोलकाताच्या मैदानावर झालेल्या मैत्रीपूर्ण सामन्यात मेस्सीच्या नेतृत्वाखाली खेळणा-या अर्जेटिना संघाने शानदार खेळीचे प्रदर्शन केले. तसेच वेनेझुएला संघानेही वेळोवेळी सावध खेळी करत अर्जेटिनाला चोख प्रत्युत्तर देणारी कामगिरी केली.त्यामुळेच 66 व्या मिनिटांपर्यंत दोन्ही तुल्यबळ संघ 0-0 गोलवर खेळत होते. अखेर, वेळीच...
  September 3, 04:21 AM
 • न्यूयॉर्क - सहाव्या मानांकित सानिया मिर्झा आणि महेश भूपती जोडी अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या मिश्र दुहेरीत पहिल्या फेरीतच बाहेर पडली आहे. तर भारतीय टेनिसपटू सोमदेव देववर्मन याने पुरुष दुहेरीत पहिल्या फेरीत विजय मिळविला. सानिया-भूपतीचा चेक रिपब्लिकच्या लुसी हार्डेका आणि फ्रान्टिसेक सरमॅक या जोडीने ६-३, ७-६ (५) असा सरळ सेटमध्ये पराभव केला. तर सोमदेव देववर्मनने दुहेरीत पहिल्या फेरीत सफाईदार विजय मिळविला. सोमदेवने फिलीपाईन्सच्या ट्रेंट कोनराड ह्युई याच्या साथीने लगोर अँड्रीव्ह आणि...
  September 2, 05:56 PM
 • कोलकाता: माजी विश्वचषक विजेता अर्जेंटिना आणि व्हेनेझुएला यांच्यादरम्यान मैत्रीपूर्ण सामना खेळला जात आहे. जगातला सर्वश्रेष्ठ फुटबॉलपटू लियोनेल मेस्सी या सामन्यात अर्जेंटिनाचे नेतृत्व करीत. कोलकात्याच्या सॉल्ट लेक स्टेडियमवर हा सामना रंगला आहे. या सामन्यासाठी आणि मेस्सीची जादू पाहण्यासाठी स्टेडियमवर एक लाखापेक्षा जास्त चाहते धडकले आहेत. दोन्ही बाजूने खेळाडू अतिशय जिद्दीने खेळताना दिसत आहेत. मेस्सीच नव्हे, तर अर्जेंटिनाचे प्रशिक्षक अलेक्झांड्रो साबेला यांचा प्रशिक्षक म्हणून...
  September 2, 04:08 AM
 • न्यूयॉर्क: माजी चॅम्पियन रशियाची मारिया शारापोवा आणि दुसरी मानांकित वेरा जोनारेवा यांनी अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या तिस-या फेरीत प्रवेश केला. सोमदेवला नमवून इंग्लंडच्या अँडी मुरेनेसुद्धा विजयी प्रारंभ केला. तिसरी मानांकित शारापोवाने बेलारूसच्या अॅनास्ताशिया याकिमोवाला ६-१, ६-१ ने नमवले. याच वेळी जोनारेवाने युक्रेनच्या कॅटरिना बोंदारेंकाला ७-५, ३-६, ६-३ ने नमवले. महिला गटात आठवी मानांकित फ्रान्सची मरियन बार्तोली, पोलंडची एग्निस्जका रांदावस्का, स्लोवाकियाची डॉमिनिका सिबुलकोवा...
  September 2, 04:05 AM
 • दाएगू : दक्षिण कोरियात सुरू असलेल्या 13 व्या वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत अमेरिका व केनिया, युक्रेनियाने सुवर्ण कामगिरी करून आपला दबदबा निर्माण केला. स्पर्धेच्या 6 व्या दिवशी झालेल्या 400 मीटर हर्डलसह उंच उडी व 1500 मीटरच्या महिला गटातील स्पर्धेत अमेरिकेने ३ सुवर्ण पदके मिळवून गुणतालिकेत अव्वल स्थानावर धडक मारली. याच कामगिरीचा कित्ता गिरवत 3000 मीटर स्टीपलचेसमध्ये केनियाने 1 सुवर्ण व 1 रौप्यपदक पटकावले. तसेच युक्रेनियाने तिहेरी उडीच्या महिला गटात सुवर्ण पदक पटकावले.
  September 2, 04:00 AM
 • न्यूयॉर्क: येथे सुरू असलेल्या अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत आज झालेल्या सामन्यांत स्टार खेळाडू सर्बियाचा नोवाक जोकोविच, स्पेनचा राफेल नदाल यांनी, तर महिला गटात फ्रेंच ओपनची चॅम्पियन चीनची ली ना हिला धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले. जोकोविच आणि आयर्लंडचा पात्रता फेरीचा खेळाडू कोनोर नीलँड हे दोघे आमने-सामने होते. या लढतीत प्रकृती बरी नसल्यामुळे कोनोर सामना अर्धवट सोडून बाहेर पडला. कोनोर ज्या वेळी रिटायर्ड हर्ट झाला त्या वेळी जोकोविचने ६-० ने पहिला सेंट जिंकून आघाडी घेतली होती. याच...
  September 1, 03:38 AM
 • कोलकाता : अर्जेंटिनाचा सुपरस्टार खेळाडू लियोनेल मेस्सी आज भारतात पोहोचला. या वेळी त्याला पाहण्यासाठी विमानतळावर १५०० हून अधिक चाहत्यांनी गर्दी केली होती. मात्र, सुरक्षेच्या कारणामुळे सुरक्षा रक्षकांनी त्याला व्हीआयपी गेटमधून बाहेर दिले. यामुळे चाहते चांगलेच निराश झाले. तीन वर्षांपूर्वी महान खेळाडू दिएगो मॅरेडोना आला त्या वेळीसुद्धा चाहत्यांना अशाच निराशेला सामोरे जावे लागले होते. त्या वेळीही चाहत्यांनी त्याला पाहण्यासाठी रांगा लावल्या होत्या. मात्र पोलिसांनी त्याला दुस-या...
  September 1, 03:20 AM
 • एक महान फुटबॉलपटू बनण्याचे स्वप्न त्याने नेहमीच आपल्या उराशी बाळगले. तसे त्यात गैर ते काय? मात्र, ते साकार होण्यासाठी स्वत:जवळ असलेल्या प्रतिभेला मेहनतीची जोड द्यावयास हवी. त्यात तो कोठेही कमी पडला नाही. त्याशिवाय जर आणखी कशाची साथ हवी असे म्हणाल तर ती नशिबाची. दौयाचा हात हा पाठीशी असावा लागतो. म्हणजेच योग्य वेळी संधी मिळणे आवश्यक ठरते. तशा अनेक संधी मिळाल्या. काही अवेळी मिळाल्या तर काही हुकल्याच. त्याचा जन्म सिक्कीमसारख्या दुर्गम प्रदेशात झालेला. त्या राज्यामध्ये कोणाला आदर्श मानावे...
  September 1, 02:52 AM
 • टेनिक्वाइट हा ब्रिटिश खेळ अतिशय जुना म्हणजे सुमारे चारशे वर्षे जुना आहे. पूर्वी समुद्री मार्गातून जहाजाने दीर्घकाळ प्रवास करणा-या जहाजावरील लोक व सेलर यांना मनोरंजनासाठी बैठ्या खेळांशिवाय शारीरिक हालचालीसाठी खेळ नव्हता. त्यामुळे वातावरणाचा प्रभाव न होणा-या खेळाची आवश्यकता असल्याने एकमेकांकडे रिंग फेकण्याच्या टेनिक्वाइट या खेळाची निर्मिती झाली. या खेळाची अधिकृत निर्मिती १९२९ मध्ये इंग्लंड येथे झाली. या खेळात विविध सुधारणा करून आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळासाठी नियोजनबद्ध...
  September 1, 02:39 AM
 • सर्बियाचा स्टायलिश खेळाडू नोव्हाक जोकोविच हा टेनिस जगतातील नंबर एकचा खेळाडू आहे. नोव्हाकने राफेल नदालला पराभूत करून २०११ चा विंबल्डन चषक जिंकला आहे. परंतु त्याचे आणखी एक रूप आहे जे कमी लोकांना माहित आहे. जोकोविच हा आपल्या मजेशीर स्वभावासाठी प्रसिध्द आहे. त्याने एकदा युएस ओपन र्स्पेधेत रशियाच्या मारिया शारापोव्हा, राफेल नदाल आणि रॉजर फेडररची नक्कल केली. जोकोविचची ही अदा पाहिल्यानंतर तुम्हाला मजाच येईल. पाहा व्हिडिओ...
  August 31, 08:15 PM
 • कोलकाता- फुटबॉलचा जादूगार आणि अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनेल मेस्सी आज (बुधवारी) कोलकातामध्ये दाखल झाला. कोलकातामधील नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावर मेस्सीचे स्वागत करण्यासाठी त्याच्या शेकडो चाहत्यांनी गर्दी केली होती. शुक्रवारी होणा-या अर्जेंटिना आणि व्हेनेझुएला यांच्यातील प्रदर्शनीय सामना खेळण्यासाठी तो येथे आला आहे.कोलकातामध्ये मेस्सीच्या चाहत्यांची संख्या मोठया प्रमाणात आहे. आपल्या आवडत्या स्टार खेळाडूस पाहण्यासाठी हजारो चाहत्यांनी विमानतळावर गर्दी केली...
  August 31, 03:28 PM
 • न्युयॉर्क- अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या एकेरीत भारताची टेनिसस्टार सानिया मिर्झाचे आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आले आहे. तर पेस-भूपतीची 'इंडियन एक्स्प्रेस' दुस-या फेरीत पोहोचली आहे. 'इंडो-पाक' एक्स्प्रेसनेही चाहत्यांना खुषखबर दिली आहे. इस्रायलच्या शाहर पीरने हिने सानियाचा ६ - ७ ( ५ ), ६ - ३ , ६ - १ असा पराभव केला. हा सामना चांगलाच रंगण्याची चाहत्यांना अपेक्षा होती. पहिल्या सेटमध्ये ३-१ ने पिछाडीवर पडलेल्या सानियाने चिवट झुंज देऊन कमबॅक केले. हा सेट तिने टायब्रेकरमध्ये आक्रमक खेळ करून...
  August 31, 01:19 PM
 • न्यूयॉर्क : येथे सुरू असलेल्या अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत स्वीत्झर्लंडचा स्टार खेळाडू रॉजर फेडरर आणि रशियन सुंदरी मारिया शारापोवा, अमेरिकेची स्टार खेळाडू व्हिनस विल्यम्स यांनी दुस-या फेरीत प्रवेश केला आहे. याच वेळी विम्बल्डनची चॅम्पियन पेट्रा क्विटोवा हिला धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले. सोमवारी झालेल्या सामन्यात दोन वेळेसची चॅम्पियन व्हिनसने सरळ सेटमध्ये वेसना डोलोन्ट्स हिला नमविले. याच वेळी तिसरी मानांकित रशियाच्या मारिया शारापोवाला दुसया फेरीत पोहोचण्यासाठी चांगलाच...
  August 31, 04:38 AM
 • दाएगु: दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या 13 व्या विश्व अॅथलेटिक चॅम्पियंनच्या 100 मीटर शर्यतीतील धक्कादायक निकालामुळेच या स्पर्धेला चांगलीच रंगत चढली आहे. त्यामुळेच दोन दिवसापुर्वीच दुखापतीमुळेच ऐनवेळी माघार घेणाया जमैकाच्या डायमंड लीग चॅम्पियन असाफा पॉवेल याने स्पर्धेत खेळण्यासाठीच्या हालचाली सुरू केल्या आहेत. 4-400 मीटर रिलेच्या स्पर्धेत सहभागी होण्यास उत्सुक असलेला पॉवेल आता गुरुवारला आपला निर्णय कळवणार आहे.यातुन दुखापतग्रस्त पावेल सुवर्णपदकासाठी धावणार असल्याचे चित्र आहे. 400 मीटर...
  August 31, 04:30 AM
 • दिल्ली: मागील आठवड्यापासून डब्ल्यूटीए टेनिस स्पर्धेत शानदार खेळी करत कामगिरीचा दर्जा उंचावणाया भारताच्या स्टार टेनिसपटू सानियाने आपल्या मानाकंनात एका पायरीने आघाडी घेतली. नुकत्याच डब्ल्यूटीएच्या महिला एकेरीच्या मानांकनात सर्वच आघाडीच्या टेनिसपटू आपल्याच स्थानावर कायम असताना सानियाने 63व्या स्थानावर धडक मारली तर पुरुष एकेरीत सोमदेव 64व्या स्थानावर कायम आहे.
  August 30, 04:15 AM
 • दाएगू: दक्षिण कोरियात सुरू असलेल्या 13 व्या वर्ल्ड अॅथलेटिक स्पर्धेच्या तिस-या दिवशी भारताच्या राष्टकुल गोल्ड विजेत्या विकास गौडाने 63.99 मीटरपर्यंत थाळीफेक करून अतिंम फेरी गाठली. मात्र आपल्याच वैयक्तिक 64.96 मीटरच्या रेकॉर्डपासून विकास दूर राहिला.विकासच्या रूपाने आता थाळीफेक प्रकारात भारताच्या पदकाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. या वेळी इराणचा एहसान व पोलंडचा मालाचोवास्की ही जोडी स्पर्धेतून बाहेर पाडली आहे. आता अंतिम फेरीत 12 जणांनी धडक मारली आहे. विकासची आतापर्यंतची कामगिरी उल्लेखनीय आहे....
  August 30, 03:59 AM
 • दाएगू: अमेरिकेची स्टार अॅथलेटिक कॅर्मेलिटा जेटर हिने 13 व्या वर्ल्ड अॅथलेटिक स्पर्धेच्या महिला गटातील 100 मीटरची शर्यत 10.90 सेकंदात पूर्ण करून सुवर्णपदक पटकावले. वा-याच्या वेगाने धावणा-या जेटरने 100 मीटरमध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिपचा बहुमान पटकावत नव्याने आपले वर्चस्व निर्माण केले आहे. वर्ल्ड अॅथलेटिक चॅम्पियनशिपमध्ये 100 मीटरमध्ये जेटरच्या स्पर्धेत असलेल्या जमैकाच्या वेरोनिकाने 10.97 सेकंदांची धाव करत रौप्यपदक पटकावले. अवघ्या 1 सेकंदाने पिछाडीवर असलेली त्रिनिदादची अॅथलिटिक केली ही...
  August 30, 03:55 AM
 • औरंगाबाद: जिल्हा ऑलिंपिक संघटनेतर्फे राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त चालू शैक्षणिक वर्षातील राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणा-या राष्ट्रीय खेळाडूंचा जिल्हाधिकारी कुणालकुमार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या प्रसंगी, क्रीडा उपसंचालक चंद्रकांत कांबळे, समीर मेहता, सचिव मकरंद जोशी यांची उपस्थिती होती. शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त तारक दास, राष्ट्रकुल स्पर्धेतील पंच डॉ. दयानंद कांबळे, राहुल देशमुखसह जिल्ह्यातील राष्ट्रीय खेळाडू तेजस्विनी बाहेती, विजय इंगळे, डिंपल...
  August 30, 03:44 AM
 • लंडन: आक्रमक स्ट्रायकर वायने रुनी याने केलेल्या शानदार विक्रमी खेळीच्या बळावर मँचेस्टर युनायटेड संघाने इंग्लिश प्रीमियर लीग फुटबॉल स्पर्धेत विजयाची हॅट्ट्रिक साधली. दुस-या फेरीत मँचेस्टर युनायटेडने आर्सेनलवर 8-2 गुणांनी एकतर्फी शानदार विजयाची नोंद करत विजयी आघाडी घेतली तसेच त्यानंतर झालेल्या सलग दुस-या सामन्यातही आपल्या विजयांचा उत्साह कायम ठेवत मँचेस्टरने दुबळ्या टॉटेनहॅमवर विजय नोंदवत क्रमवारीत अव्वल स्थान गाठले. विजयाची एकतर्फी खेळीइपीएल फुटबॉल स्पर्धेत सलामीच्या शानदार...
  August 30, 03:41 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात