जाहिरात
जाहिरात
Home >> Sports >> Other Sports

Other Sports News

 • नाशिक: कविता राऊत हे नाव नाशिककरांइतकेच समस्त मराठीजनांना आता ज्ञात झाले आहे. आशियाई आणि राष्ट्रकुलमध्ये पदकांवर नावे कोरण्यात यशस्वी झालेल्या कविता आणि प्रिजाने दाखवलेली चमक समस्त भारतीयांना ऑलिम्पिक पदकाचे स्वप्न पाहण्यास पुरेशी होती. मात्र, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रशिक्षक नियुक्तीचा घोळ ऑलिम्पिक स्पर्धा दहा महिन्यांवर आलेली असतानाही कायम राहिल्याने अॅथलेटिक्समध्ये ऑलिम्पिक पदकाचे स्वप्न धूसर झाले असल्याचे सत्य सामोरे आले आहे. आशियाई स्पर्धा आणि ऑलिम्पिक स्पर्धेच्या...
  August 29, 07:00 AM
 • औरंगाबाद: मनपांतर्गत होणा-या जिल्ह्यातील विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन हे महानगरपालिकेत एक क्रीडा समिती स्थापन करून करावे, असा राज्य शासनाचा अध्यादेश आहे. मात्र, गेल्या ७ वर्षांपासून औरंगाबाद महानगरपालिकेला याचा विसर पडला असून राज्य शासनाच्या या अध्यादेशाला केराची टोपली दाखविण्यात आली आहे. गेल्या ७ वर्षांपासून मनपाने अद्याप क्रीडा समितीच स्थापन केलेली नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुळात मनपाच्या क्रीडाधिकायापासून ते अनेक विविध पदांवर कार्यरत असलेल्या अनेक दिग्गजांना...
  August 29, 04:15 AM
 • औरंगाबाद: मराठी मातीचा टिळा अटकेपार चमकविणारे खाशाबा जाधव, दादा चौगुले, मारुती माने, हरिश्चंद्र बिराजदार, काका पवार ते सईद चाऊस, राहुल आवारे असे एकापेक्षा एक तोडीचे मल्ल निर्माण करणारा कुस्ती हा खेळ आता औरंगाबाद जिल्ह्यात नावापुरताच उरला आहे. आखाड्यांची दिवसेंदिवस कमी होत चाललेली संख्या, वाढती महागाई, कुस्तीगिरांचे शिक्षण, खेळाडूंत वाढणारी व्यसनाधीनता, प्रशिक्षक, प्रशिक्षण, पालकांचा कुस्ती या खेळाकडे पाहण्याचा बदलेला दृष्टिकोन अशा एक ना अनेक कारणांमुळे हा खेळ आता केवळ शौकापुरता उरला...
  August 29, 04:12 AM
 • औरंगाबाद - प्रचंड मेहनत व आत्मविश्वासाच्या बळावर राष्ट्रीय वेटलिफ्टिंगमध्ये चमकदार कामगिरी करणा-या औरंगाबादच्या शशिकांत परदेशीची सध्या आर्थिक अडचणींमुळेच चांगलीच कसरत सुरू आहे. घरची परिस्थिती बिकट असल्यामुळेच आपल्या खेळामधील कामगिरीचा दर्जा कायम ठेवण्यासाठी धडपडणा-या शशिकांतला अपु-या आहाराला सामोरे जावे लागत आहे. राष्ट्रीय खेळाडू असून शशिकांत आर्थिक अडचणीमुळे हा खेळ सोडण्याच्या तयारीत आहे, हे विशेष.आहाराचा भार पेलवेना! - राष्ट्रीय पातळीवरच्या स्पर्धेत मोठ्या यशाला पेलणा-या...
  August 28, 06:19 AM
 • हैदराबाद - वर्षअखेरपर्यंत जागतिक बॅडमिंटन दुहेरीच्या क्रमवारीत टॉप टेनमध्ये प्रवेश करण्याचा विश्वास भारताची आघाडीची महिला बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टाने व्यक्त केला आहे. ज्वाला सध्या महिला दुहेरीत भारताची खेळाडू अश्विनी पोनप्पा हिच्यासोबत जोडीने खेळत आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत दुहेरीच्या टॉप टेनमध्ये प्रवेश मिळविण्याचे मी लक्ष्य ठेवले आहे. सध्या मी वर्ल्ड चॅम्पियनशिपवर लक्ष केंद्रित करीत आहे. एका वेळेस एकाच स्पर्धेवर लक्ष केंद्रित करण्याचे माझे प्रयत्न असतात. आॅलिम्पिकपूर्वी...
  August 28, 06:15 AM
 • न्यू हेवन - फ्रेंच ओपन व विम्बल्डन स्पर्धेतील अपयशातून सावरलेली अव्वल टेनिसपटू कॅरोलिन वोझानिस्की सध्या अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर वेगळ्याच खेळात रमली आहे. गत आठवड्यात अमेरिकन ओपन गोल्फ चॅम्पियनशिप विजेत्या उत्तर आयर्लंडच्या रॉरी मैकिलरायसोबत प्रेमात पडलेली वोझानिस्की भावी आयुष्याचा खेळ रंगवत आहे. त्यामुळे टेनिस कोर्टवर पुन्हा एकदा नव्या अफेयरच्या चर्चेला ऊत आला आहे. तीन महिन्यांपूर्वीच गोेल्फर रॉरीचा मोठा प्रेमभंग झाला. त्याचे चार वर्षांपासून होली...
  August 28, 06:13 AM
 • दिल्ली - दोन दिवसांपूर्वीच बंगळुरूमध्ये सुरू असलेल्या राष्ट्रीय संघाच्या शिबिराला अर्ध्यावर सोडणा-या माजी कर्णधार संदीप सिंह व मिडफिल्डर सरदार सिंहवर भारतीय हॉकी महासंघाने कडक कारवाईचा बडगा उगारला. आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवून महासंघाने या दोन्ही हॉकीपटूंवर दोन वर्षांच्या बंदीची कडक कारवाई केली आहे. ऐन स्पर्धेच्या तोंडावरच अशा प्रकारच्या कारवाईमुळेच सध्या हॉकीमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. येत्या महिन्यात होत असलेल्या आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर...
  August 28, 06:10 AM
 • नवी दिल्ली - स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर गेल्या एक वर्षात सर्वाधिक कमाई करणारा जगातला आघाडीचा टेनिसपटू ठरला आहे. स्पेनचा राफेल नदाल दुस-या, तर रशियाची महिला खेळाडू मारिया शारापोवा तिस-या क्रमांकावर आहे. प्रतिष्ठेच्या फोर्ब्स मॅगजीनने सर्वाधिक कमाई करणा-या दहा टेनिसपटूंची यादी जाहीर केली आहे. यानुसार यापूर्वीचा नंबर वनचा खेळाडू फेडररने गेल्या १२ महिन्यांत ४.७ कोटी डॉलर (जवळपास २.१६ अब्ज रुपये) कमविले. ही कमाई बक्षीस रक्कम, जाहिराती आणि एखाद्या कार्यक्रमात हजर राहिल्यामुळे मिळालेल्या...
  August 28, 06:07 AM
 • वॉशिंग्टन - येत्या 29 ऑगस्टपासून न्यूयॉर्कमध्ये सुरू होत असलेल्या अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत भारताचे सोमदेव देववर्मन व सानिया मिर्झा यांची वाट अधिकच खडतर आहे. पुरुष एकेरीत सोमदेव देववर्मनला इंग्लंडच्या अँडी मुरेशी सामना करावा लागणार आहे, तर सानिया मिर्झासमोर महिलांच्या एकेरीत शहर पीरचे आव्हान आहे. 29 ऑगस्ट ते 11 सप्टेंबरपर्यंत खेळवल्या जाणा-या या स्पर्धेत अनेक अव्वल मानांकित टेनिसपटू सहभागी होणार आहेत. त्यामुळे भारताच्या टेनिसपटूंना अधिकच मेहनत घ्यावी लागणार आहे.सानियाविरुद्ध शहर...
  August 27, 02:36 AM
 • डल्लास - महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत आक्रमक खेळी करून 23 वी मानांकित जर्मन टेनिसपटू साबिने लिसिका व फ्रान्सच्या अरवाने रेजाई या जोडीने टेक्सास ओपनची उपांत्य फेरी गाठली. टेक्सास ओपन टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत साबिने लिसिका विरुद्ध युक्रेनच्या काटेरयाना बोजरेंको यांच्यात अटीतटीची लढत झाली. महिला एकेरीच्या विजेतेपदावरचे आव्हान राखून ठेवण्यासाठी काटेरयानाने आक्रमक खेळीचे प्रदर्शन केले. मात्र, पहिल्याच सेटवर ताबा मिळवणा-या लिसिकाने शानदार खेळी करून...
  August 27, 02:34 AM
 • दाएगू । वर्षभरापासून तमाम अॅथलेटिकांसाठी दीर्घ प्रतीक्षा लागलेली 13 वी वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धा शनिवारपासून दक्षिण कोरियातील दाएगूमध्ये सुरू होणार आहे. वर्ल्ड चॅम्पियन जमैकाचा उसैन बोल्ट हा या स्पर्धेचे मुख्य वैशिष्ट्य ठरणार आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये या स्पर्धेविषयीची कमालीची उत्सुकता लागलेली आहे. उसैनच्या आव्हानाचा पाठलाग करणा-या जमैकाच्या आसाफा पॉवेलने या स्पर्धेतून नुकतीच माघार घेतली आहे. त्यामुळे बोल्टसमोर आता कुणाचेही आव्हान राहणार नाही.
  August 27, 02:33 AM
 • दिल्ली - येत्या महिन्यात इंग्लंडमध्ये आयोजित करण्यात आलेली भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील दोन फुटबॉल सामन्यांची मालिका रद्द करण्यात आल्याची माहिती पाकिस्तान फुटबॉल फेडरेशनचे सरदार नावेज यांनी दिली. ऐनवेळी पीएफएफने घेतलेल्या मालिका रद्दच्या निर्णयाचा भारतीय संघाला मोठा फटका बसला. सामन्यात आर्थिक सहकार्य करत असलेल्या टचस्काय स्पोटर््स क्लबच्या आग्रहामुळेच ही मालिका रद्द केली आहे.
  August 27, 02:24 AM
 • मोनाको - फुटबॉलमध्ये शानदार कामगिरी केल्याबद्दल देण्यात येणा-या 2010-11 यूएफाच्या पुरस्कारासाठी अर्जेंटिनाच्या लियोनल मेसीची यंदा निवड झाली आहे. युरोपमधला फुटबॉलमध्ये देण्यात येणारा हा सर्वश्रेष्ठ असा यूएफाचा पुरस्कार मानला जातो. अर्जेंटिना संघाकडून वर्षभरात 63 गोलची भरीव कामगिरी केल्याबद्दल मेसीची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. अर्जेंटिनाचा स्टार स्ट्रायकर मेसीने वर्षभरापासून चमकदार कामगिरी केली आहे.
  August 27, 02:23 AM
 • पॅरिस - जगातील सर्वाधिक वेगवान पुरुष युसेन बोल्टला सध्या आपल्या दुखापती आणि या दुखापतीमुळे कामगिरीवर होणा-या प्रभावाची चिंता भेडसावतेय. बोल्टने १०० मी. शर्यतीत ९.५८ सेकंदासह विश्वविक्रम रचलेला आहे. मात्र, आता वर्षभरापासून पायाच्या गंभीर दुखापतीमुळे आपण या विक्रमापर्यंत सुद्धा पोहोचू की नाही, अशी भिती त्याला वाटतेय. त्यामुळे येत्या २७ ऑगस्टपासून दक्षिण आफ्रिकेतील दिगूमध्ये होत असलेल्या विश्व अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेतील नव्या विक्रमाची नोंद करण्याचे बोल्टचे स्वप्न...
  August 26, 06:45 AM
 • न्यू हेवन - दोन महिन्यांपूर्वीच पहिल्यांदाच आशिया खंडाला फ्रेंच ओपनचा किताब मिळवून देणारी चीनची अव्वल मानांकित टेनिसपटू ली ना व फ्रान्सची चौथी मानांकित मारियन बार्टोलीने विजयी मोहीम कायम ठेवली. डब्ल्यूटीएच्या न्यू हेवन ओपन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीच्या दुस-या फेरीत ली ना हिने आक्रमक खेळी करून रशियाच्या मारिया किरीलेंकोला सरळ दोन सेटवर पराभवाची धूळ चारली. ली ना हिने ६-४, ७-६ (४) गुणांची शानदार खेळी करून विजय संपादन केला. फ्रान्सच्या मारियन बार्टोली हिने चेकच्या कार्ला झकोपलोवाला ६-२,...
  August 26, 06:44 AM
 • नवी दिल्ली: भारतीय फुटबॉल संघाचा माजी कर्णधार आणि गेल्या काही वर्षांपासून आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय फुटबॉलचा चेहरा म्हणून ओळख असलेला स्टार स्ट्रायकर बायचुंग भुतियाने आज आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीची घोषणा केली. या घोषणेसह त्याच्या १६ वर्षांच्या अनेक चढ-उताराच्या कारकीर्दीची अखेर झाली. फुटबॉलमध्ये त्याच्या खेळण्याच्या खास शैलीमुळे त्याला नेहमी सिक्कीमचा हिरो म्हणून संबोधले जायचे. अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनसोबत झालेल्या बैठकीनंतर आज त्याने पत्रकार परिषदेत याबाबत...
  August 25, 03:43 AM
 • औरंगाबाद - जिल्ह्यात खेळ वाढविणे, खेळाचा प्रचार आणि प्रसार करणे, ग्रामीण भागातून गुणवत्ता शोधणे, मैदानावर खेळाडूंना घडविणे, तालुक्यातही खेळाचा विकास साधणे...ही कामे जिल्हा क्रीडा कार्यालयाची नव्हे तर जिल्ह्यातील विविध खेळांच्या संघटनांची आहे म्हणे. दस्तुरखुद जिल्हा क्रीडाधिकारी संजीव कुलकर्णी यांनाच असे वाटते.दिव्य मराठीशी बोलताना संजीव कुलकर्णी, म्हणाले, औरंगाबादेत ग्रामीण भागात अनेक खेळ पोहोचलेले नाहीत. मुळात ग्रामीण भागत खेळाचा विकासाच झालेला नाही. ही सर्व कामे संघटनांची आहे....
  August 24, 03:00 AM
 • डल्लास - मागील दोन महिन्यांपासून पराभवाच्या गर्तेत सापडलेल्या ६३ व्या मानांकित भारतीय स्टार सानिया मिर्झाला टोरँटो, सिनसिनाटी ओपनपाठोपाठच टेक्सॉस ओपन टेनिस स्पर्धेतही पराभवाचा सामना करावा लागला. टेक्सॉस ओपन टेनिसमध्ये महिला एकेरीच्या २२ व्या मानांकित जर्मनीच्या सबिना लुसिकाने ६-३, ६-० च्या आघाडीने सानियाचे आव्हान संपुष्टात आणले. त्यामुळेच भारतीय संघाचे स्पर्धेतील विजेतेपदाचे स्वप्न धुळीस मिळाले आहे. दोन स्पर्धेतील अपयशामुळेच सानिया मिर्झाने टेक्सॉस टेनिस स्पर्धेत आव्हान...
  August 24, 02:59 AM
 • मुंबई - एशियन चॅम्पियनशिप हॉकी स्पर्धा ऐन तोंडावर आली असताना बंगळुरू येथील भारतीय हॉकी संघाच्या सराव शिबिरात बंडाळी झाल्यामुळे भारतीय हॉकीच्या पुनरुज्जीवन प्रक्रियेला पुन्हा एकदा धक्का बसला आहे. मायकल नॉब्ज या ऑस्ट्रेलियन प्रशिक्षकाच्या अपमानास्पद वागणुकीला कंटाळून संदीप सिंग आणि सरदारा सिंग हे दोन प्रमुख खेळाडू सोमवारी रात्री हॉकी शिबिरातून बाहेर पडले. अन्य काही खेळाडूही तशीच कृती करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हॉकी इंडियाचे प्रमुख नरेंद्र बात्रा यांना दोन खेळाडूंनी आपण...
  August 24, 02:57 AM
 • लंडन । स्टार स्ट्रॉयकर डेनी वेलबेक, अँडरसन व वायने रुनीच्या आक्रमक खेळीच्या बळावर इंग्लंडच्या प्रतिष्ठित मँचेस्टर युनायटेड क्लबने दुस-यांदा बाजी मारत विजयी आघाडी कायम ठेवली. इंग्लिश प्रीमियर लीग स्पर्धेच्या दुस-या फेरीत टोटॅहम हॉटसपरविरुद्धच्या लढतीत मँचेस्टरने ३-० गुणांनी एकतर्फी विजय नोंदवत आघाडी घेतली. मँचेस्टरच्या आक्रमक खेळीमुळे दमछाक झालेल्या टोटॅहमला एकही गोल करता न आल्याने दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. सलग दोन शानदार विजयी खेळीच्या बळावर मँचेस्टरने ६ गुणांची कमाई...
  August 24, 02:56 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात