जाहिरात
जाहिरात
Home >> Sports >> Other Sports

Other Sports News

 • कॉलेज पार्क - महिला दुहेरीच्या लढतीत आक्रमक खेळीच्या बळावर भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा व कजाकिस्तानच्या यारोस्लावा श्वेदोवाने तिस-या मानांकित जोडीवर बाजी मारून डब्ल्यूटीए हार्ड कोर्ट सिटी ओपन टेनिस टुर्नामेंटच्या अंजिक्यपदकाचा बहुमान पटकवला. स्पर्धेतील विजयी आघाडीने जबरदस्त फॉर्मात असलेल्या सानिया-श्वेदोवाने बेलारूसच्या ओल्गा गोवारत्सोवा व आला कुर्दियावत्सोवाला ६-३, ६-३ गुणांनी पराभवाची धूळ चारत अजिंक्यपदक पटकावले. एटीपीच्या फॉर्मस क्लासिक टेनिस टुर्नामेंटमध्ये...
  August 2, 01:47 AM
 • लाहोर - येत्या २५ ऑगस्टपासून इंग्लंडमध्ये सुरू होणार असलेली भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील फुटबॉल सामन्यांची मालिका पुढे ढकलण्यात आली आहे. दहशतवादी घटनांमुळे ही मालिका पाकिस्तानऐवजी इंग्लंडमध्ये खेळवण्याची योजना आखण्यात आली होती. पाकिस्तान फुटबॉल फेडरेशनने याबाबतची माहिती दिली. याच महिन्यात ही मालिका होणार होती.
  August 2, 01:42 AM
 • शांघाय - अमेरिकेचा युवा जलतरणपटू रेयान लोशेटेने येथे सुरू असलेल्या जागतिक जलतरण स्पर्धेत शानदार कामगिरी करताना पाचवे सुवर्णपदक जिंकले. यासह त्याने आपल्याच देशाचा खेळाडू मायकेल फेल्पसने दोन वर्षांपूर्वी केलेल्या कामगिरीची बरोबरी केली. चॅम्पियनशिपचा हिरो ठरलेल्या लोशेटेने क्राऊन स्टेडियमवर सुरू असलेल्या या स्पर्धेत आघाडी कायम ठेवली. त्याने ४०० मीटर वैयक्तिक मेडलेत सुवर्ण जिंकले. आपल्याच देशाच्या टायलर क्लेरीपेक्षा तो चार सेकंदांनी पुढे राहिला. जपानचा युया होरिहालाने कांस्यपदक...
  August 2, 01:37 AM
 • दिल्ली - आशियाई स्पर्धेत सुवर्णपदकाचा बहुमान पटकावणा-या भारतीय नेमबाज रंजन सोढीने नुकत्याच जाहीर झालेल्या आयएसएसएफच्या मानांकनात बाजी मारली आहे. १६०० गुणांची शानदार कमाई करत सोढीने दुहेरीच्या मानांकनात अमेरिकेच्या जोसुआला पिछाडीवर टाकून पहिल्या क्रमांकावर धडक मारली. गत दोन महिन्यांपासून कामगिरी उंचावणारी खेळी करत रंजनने अव्वल स्थान पटकावले आहे. मागील एप्रिल महिन्यातील बीजिंग येथील स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई करणा-या रंजनने ऑलिम्पिक स्पर्धेचे तिकीट मिळवले आहे.
  August 2, 01:34 AM
 • कॉलेज पार्क - फ्रेंच ओपनसह विम्बल्डन टेनिस स्पर्धेतील आघाडीच्या खेळीने आत्मविश्वास दुणावलेल्या भारताच्या सानिया मिर्झा व सोमदेव देववर्मन या जोडीने वेगवेगळ्या स्पर्धेची दुहेरीतील अंतिम फेरी गाठली आहे. डब्ल्यूटीए हार्ड कोर्टच्या स्पर्धेत सानिया मिर्झाने आपल्या श्वेदोवासोबत महिला दुहेरीत सरळ दोन सेटवर विजय मिळवून फायनलमध्ये धडक मारली. तसेच एटीपी फॉर्र्मस क्लासिक टेनिस स्पर्धेतील आपला दबदबा कायम ठेवत पुरुष दुहेरीच्या उपांत्य फेरीत सोमदेव-ट्रीट ह्युई जोडीने अटीतटीच्या लढतीत...
  August 1, 07:09 AM
 • नवी दिल्ली - भारताचा युवा बॉक्सिंगपटू नवीनकुमारने एआयबीए वर्ल्ड ज्युनियर चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदक पटकावले. या स्पध्रेत सुवर्णपदक जिंकण्याचे त्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. त्याला रौप्य पदकावरच समाधान मानावे लागले. कझाकिस्तानातील अस्ताना येथे सुरू असलेल्या या स्पध्रेत नवीनकुमारला फ्लायवेट गटात 50 किलो वजन प्रकारात फायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला.अझरबैजान येथे झालेल्या प्रेसिडेंट चषक स्पध्रेत सुवर्णपदक जिंकणार्या नवीनला युरोपियन ज्युनियर चॅम्पियन इंग्लंडच्या पॅट...
  August 1, 07:07 AM
 • औरंगाबाद- खेळ हाच माझा जीव की प्राण आहे. मी कुटुंबासाठी काही दिवस नेमबाजीपासून दूर झाले होते. आता पुन्हा मी नेमबाजीच्या रेंजवर सज्ज झाले आहे, असे खेलरत्न पुरस्कार विजेती, महाराष्ट्राची आघाडीची महिला नेमबाज अंजली भागवत दूरध्वनीवर दिव्य मराठीशी बोलत होती.आता मी आगामी आशियाई नेमबाजी चॅम्पियनशिपवर लक्ष केंद्रित केले आहे. आगामी लंडन आॅलिम्पिकसाठी पात्रता मिळविण्याची ही शेवटची संधी असेल. ही आशियाई स्पर्धा कझाकिस्तान येथे होणार आहे. मला लंडन आॅलिम्पिकसाठी पात्रता मिळवून पदक जिंकायचे आहे....
  July 31, 05:47 AM
 • पुणे- विश्वविजेता बुद्धिबळपटु विश्वनाथन आनंदशी त्या चौकोनी पटावर प्रत्यक्ष खेळण्याची संधी २ आॅगस्ट रोजी पन्नास बुद्धिबळपटूंना मिळणार आहे. मुख्य म्हणजे सर्व बुद्धिबळपटूंशी आनंद एकाच वेळी दोन हात करणार आहे. ग्लोबल माइंड स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने गोल्डन फ्युचर इंटरनॅशनल रेटिंग अखिल भारतीय खुल्या बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन १ ते ९ आॅगस्टदरम्यान करण्यात आले आहे. खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी जगज्जेता आनंद २ आॅगस्टला पुण्यात येणार आहे. याच दिवशी त्याला भेटण्याची, त्याच्यासोबत...
  July 30, 06:05 AM
 • हंगेरी- आंतरराष्टीय आयएएएफ चॅम्पियन्सशिप स्पर्धेत 20.04 मीटर गोळाफेक करून भारताच्या ओमप्रकाश करहानने सुवर्णपदकाचा बहुमान पटकावत आॅलिम्पिक स्पर्धेसाठीची पात्रताही पूर्ण केली आहे. ओमप्रकाशने डबल गोल्डन धमाक्याच्या कामगिरीसह येत्या आॅगस्ट महिन्यात होत असलेल्या कोरिया विश्व चॅम्पियन्सशिप स्पर्धेसाठीही आपले स्थान निश्चित केले आहे. आॅलिम्पिक स्पर्धेसाठी तिकिट मिळवण्याच्या कामगिरीला कायम ठेवत सुवर्णपदक पटकावण्याचा विश्वास ओमप्रकाशने यावेळी व्यक्त केला. हंगेरीत पटकावले सुवर्णपदक...
  July 30, 06:02 AM
 • नाशिक- प्रत्येक जिल्ह्यात एक जिल्हा क्रीडा अधिकारी नियुक्त करण्याचा निर्णय चौदा वर्षांपूर्वी होऊनदेखील गत चार वर्षांपासून राज्यात केवळ 14 जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यरत आहेत. राज्यातील तब्बल 21 जिल्ह्यांमध्ये आजही जिल्हा क्रीडा अधिकार्याची नियुक्ती झालेली नसल्याने खेळांप्रती आणि खेळाडूंप्रती शासन किती सजग आहे, त्याचाच प्रत्यय या धोरणामधून दिसून येत आहे.शासनाच्या धोरणात्मक निर्णयानुसार प्रत्येक जिल्ह्यात एक क्रीडा अधिकारी त्वरित नेमणे तर प्रत्येक तालुक्यात टप्प्याटप्प्याने...
  July 29, 06:21 AM
 • सिडनी-ब्राझीलमध्ये होत असलेल्या 2014 वर्ल्ड कप फुटबॉल स्पर्धेला दिमाखदारपणे 12 जूनपासून सुरू होणार असल्याची माहिती फिफाचे महासचिव जेरोम वाल्के यांनी दिली. तसेच 13 जुलैला या स्पर्धेतील विजेतेपदासाठीचा अतिंम सामना खेळवल्या जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.आगामी वर्ल्ड कप फुटबॉल स्पर्धेविषयी जेरोम म्हणाले की, येत्या 2014 मध्ये होत असलेल्या विश्व चषक फुटबॉल स्पर्धेचे दुसर्यांदा ब्राझील संघाने यजमान पदाचा बहुमान पटकावला आहे. या स्पर्धा 12 जुन ते 13 जुलैदरम्यान खेळली जाणार आहे. या...
  July 29, 06:02 AM
 • ब्राझील- फुटबॉल मैदानावर हमरीतुमरी ही नित्याचीच बाब आहे. पण ब्राझीलमध्ये झालेल्या एका सामन्यात खेळाडूंनी सीमाच ओलांडली. स्पोर्ट रिसिफ आणि वॉस्को द गामा या दोन संघांमधील स्पर्धेचे रूपांतर दंगलीत झाले. या सामन्यात एका खेळाडूने कुंग फू स्टाईलने एका खेळाडूला हवेत उडून लाथ मारली. त्याच्या या कृतीमुळे त्याच्यावर आजीवन बंदी तर घालण्यात आली आहे. शिवाय त्याच्यावर हत्या करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल गुन्हा ही दाखल करण्यात आला आहे. गुस्तावो असे या खेळाडूचे नाव आहे.आपला पराभव सहन न झाल्याने...
  July 28, 03:22 PM
 • शांघाय- आघाडीचा भारतीय जलतरणपटू संदीप शेजवळपाठोपाठ वीरधवल खाडेनेही फिना विश्व चॅम्पियनशिप जलतरण स्पर्धेत चमकदार कामगिरी करत आगामी लंडन ऑलिम्पिक स्पर्धेचे तिकीट मिळवले आहे. पुरुषगटाच्या 100 मीटर फ्रीस्टाइल स्पर्धा वीरधवलने 50.34 सेकंदात गाठून ऑलिम्पिक स्पर्धेचा कोटा पूर्ण केला. चीनमध्ये सुरू असलेल्या फिना विश्व चॅम्पियनशिप जलतरण स्पर्धेच्या 100 मीटर फ्रीस्टाइलमध्ये वीरधवल खाडेने शानदार कामगिरीचे प्रदर्शन केले. 50.34 सेकंदात ही स्पर्धा पूर्ण करून वीरधवल ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरला...
  July 28, 04:52 AM
 • कॉलेज पार्क- महिला एकेरीतील पराभवाची मरगळ दूर सारून आघाडीची भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झाने महिला दुहेरीत श्वेदोवासोबत आक्रमक खेळी करत शानदार विजयी सलामी दिली. यजमान अमेरिकन टेनिसपटू बी. कोपेरा - एम. मोहम्मद या जोडीचा 1-6, 3-6 गुणांनी दारुण पराभव करून सानिया मिर्झा - श्वेदोवाने डब्ल्यूटीए हार्ड कोर्ट टेनिस स्पर्धेच्या दुसर्या फेरीत धडक मारली. या स्पर्धेत सानिया मिर्झाला महिला एकेरीच्या सलामीच्या लढतीतच पराभवाचा सामना करावा लागला.श्वेदोवासोबत सानियाची आक्रमक खेळीमहिला दुहेरीच्या...
  July 28, 04:32 AM
 • नवी दिल्ली - मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर की मेजर ध्यानचंद यांच्यापैकी कोणाला देशातील सर्वोत्तम पुरस्कार 'भारतरत्न' मिळावा याविषयी चर्चा सुरु असताना, अभिनेत्री दीपिका पदुकोण हिने माझे वडील प्रकाश पदुकोण यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा अशी मागणी केली आहे. प्रकाश पदुकोण हे दिग्गज बॅडमिंटन खेळाडू आहेत.दीपिकाला सचिन की ध्यानचंद यांच्यापैकी कोणाला भारतरत्न मिळावा, असे विचारले असता तिने मी माझ्या वडिलांवर खूप प्रेम करते त्यामुळे त्यांनाच हा पुरस्कार मिळावा असे म्हटले. मात्र, नंतर तिने...
  July 27, 03:59 PM
 • ब्राझीलिया - ब्राझीलचा महान फुटबॉलपटू पेले यांची २०१४ मध्ये होणाऱ्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेचे ब्रँड ऍम्बेसिडर म्हणून निवड करण्यात आली आहे. ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष दिलमा रोसेफ यांनी पेलेंच्या नावावर शिक्कामोर्तब केले. पेले यांनी आपल्याला हा सन्मान आपल्यासाठी गर्वाची बाब असल्याचे म्हटले आहे. पेले म्हणाले, ब्राझीलसाठी १९५८ साली पहिल्यांदा विश्वकरंडक खेळल्यानंतर कायमच ब्राझीलमध्ये फुटबॉल खेळाचे प्रमोशन करण्यासाठी मी तयार असतो. ही माझ्यावरील मोठी जबाबदारी असून, ही जबाबदारी मी...
  July 27, 02:21 PM
 • जकार्ता - भारताची युवा स्टार खेळाडू पी.व्ही. संधूने इंडोनेशिया आंतरराष्ट्रीय चॅलेंज 2011 बॅडमिंटन स्पध्रेत महिला एकेरीच्या फायनलमध्ये अव्वल मानांकित इंडोनेशियाच्या फ्रान्सिस्का रत्नासारीला पराभूत करून विजेतेपद पटकावले. या विजयासह तिने भारतीय बॅडमिंटनमध्ये नवा इतिहास रचला. स्पध्रेच्या अधिकृत संकेतस्थळानुसार स्पध्रेच्या फायनलमध्ये संधूने जागतिक क्रमवारीत 35 व्या क्रमांकावर असलेल्या रत्नासारीला अवघ्या 40 मिनिटांत 21-16, 21-11 ने पराभूत करून बाजी मारली. या विजयासह तिने सुवर्णपदक आपल्या...
  July 27, 12:29 PM
 • नवी दिल्ली - गेल्या वर्षी नवी दिल्ली येथे पार पडलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पध्रेत महिला भारत्तोलनात सुवर्णपदक जिंकणारी भारताची युवा खेळाडू रेणुबाला चानू क्रीडा मंत्रालयावर जाम नाराज झाली आहे. यंदा जाहीर झालेल्या अर्जुन पुरस्काराच्या यादीत आपले नाव नसल्याने ती नाराज झाली आहे. या नाराजीमुळे तिने आपले पदक क्रीडा मंत्रालयाला परत करण्याची धमकी दिली आहे. चानूने गेल्या वर्षी 58 किलो वजन गटात बाजी मारली होती.
  July 27, 12:26 PM
 • नवी दिल्ली - सोमवारी जाहीर करण्यात आलेल्या एटीपी क्रमवारीत भारताचा एकेरीचा स्टार खेळाडू सोमदेव देववर्मनने सहा स्थानांची प्रगती केली. यासह तो कारकीर्दीतील सर्वश्रेष्ठ 62 व्या स्थानी पोहोचला. याच वेळी भारताची महिला खेळाडू सानिया मिर्झाने क्रमवारीत दोन स्थानांनी प्रगती केली.सोमदेव एकेरीच्या क्रमवारीत आधी 68 व्या स्थानी होता. मात्र, आता तो 62 व्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याच्या कारकीर्दीतील ही आतापर्यंतची सवरेत्तम क्रमवारी ठरली आहे. पुरुष दुहेरीत संघांच्या क्रमवारीत लिएंडर पेस आणि...
  July 26, 12:46 PM
 • नवी दिल्ली - हॉकी इंडिया आणि भारतीय हॉकी महासंघ (आयएचएफ) यांच्यादरम्यान आज आठ तास चाललेल्या मॅरेथॉन बैठकीनंतर दोघांचे विलीनीकरण झाले नाही. मात्र, या दोघांनी हॉकीच्या भल्यासाठी संयुक्तपणे काम करण्याची तयारी दर्शवली आहे.भारतीय हॉकीतील या दोन्ही संघटनांना विलीनीकरणासाठी केंद्रीय क्रीडामंत्री अजय माकन यांनी सोमवारपर्यंत मुदत दिली होती. माकन कामात व्यग्र असल्याने या बैठकीत सहभागी होऊ शकले नाहीत.बैठकीला सकाळी 11 वाजता प्रारंभ झाला. ही बैठक सायंकाळी जवळपास 7 वाजता संपली. हॉकी इंडियाचे...
  July 26, 12:43 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात