जाहिरात
जाहिरात
Home >> Sports >> Other Sports

Other Sports News

 • लंडन-लंडनमध्ये सुरू असलेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिप बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीच्या अटीतटीच्या लढतीत 6 व्या मानांकित भारताच्या सायना नेहवालला पराभवाचा धक्का बसला. चीनच्या वांगने शर्थीच्या लढतीत अवघ्या 30 मिनिटांत कलाटणी देणारी खेळी करत 21-15, 21-10 गुणांच्या आघाडीने सायनाला पराभवाची धूळ चारली. या पराभवामुळे महिला एकेरीतील विजेतेपदाचे सायनाचे स्वप्न भंगले. वल्र्ड चॅम्पियनशिप बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीत सायनाची तिसर्या मानांकित वांग हिच्याशी लढत झाली. आव्हान राखून...
  August 13, 03:50 AM
 • पुणे- वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये कोल्हापूरच्या अव्वल नेमबाजपटू तेजस्विनी सावंतने महिला गटाच्या २५ मीटर पिस्तूल व ५० मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये चमकदार कामगिरी करून सुवर्णपदकाचा वेध घेतला. पुण्यात खेळवल्या गेलेल्या ११ व्या कुमार सुरेंद्रसिंग मेमोरियल शूटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत सोनिया रॉयनेही किताबाचा बहुमान पटकावला. गतवर्षी सानियाने महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूलच्या आशियाई स्पर्धेत कांस्यपदक पटकावले होते. महिलांच्या २५ मीटर पिस्तूल व ५० मीटर रायफल थ्री पोझिशनच्या गटात...
  August 12, 04:55 AM
 • माँट्रियल - मागील महिनाभरापासून विजयी पताका फडकवण्याची चमकदार कामगिरी करत असलेल्या इंडो-पाक एक्स्प्रेस रोहन बोपन्ना-कुरेशी या जोडीने एटीपी रॉजर्स चषकच्या तिस-या फेरीत धडक मारली आहे. पाचव्या मानांकित बोपन्ना-कुरेशी जोडीने आॅस्ट्रेलियन पाऊल हॅली-ब्रुनोला सरळ दोन सेटवर ६-४, ७-६(६) ने पराभवाची धूळ चारून दुसया फेरीत विजय संपादन केला. पहिल्या फेरीत या जोडीला पुढ चाल मिळाली होती. त्यानंतर झालेल्या दुसया फेरीच्या लढतीत या जोडीने शानदार विजय मिळवला.आता बॉब-माइकशी सामनाबोपन्ना-कुरेशी या जोडीची...
  August 12, 04:50 AM
 • लंडन - येथे सुरू असलेल्या विश्व बॅडमिंटन स्पर्धेत भारताची स्टार खेळाडू सायना नेहवालने शानदार खेळ करताना महिला एकेरीच्या तिसया फेरीत धडक दिली आहे. याच वेळी ज्वाला गुट्टा आणि दीजूच्या जोडीने मिश्र दुहेरीत दुस-या फेरीत विजय मिळविला. सहावी मानांकित सायनाने आयर्लंडच्या सी. मेगी हिला २१-१०, २१-७ ने पराभूत केले. भारताच्या स्टार खेळाडूने अवघ्या २६ मिनिटांत विजय मिळविला. २१ वर्षीय सायनाला आता तिसया फेरीत हाँगकाँगच्या पुई येन येप हिच्याशी लढायचे आहे. दीजूचे पुनरागमन : दुखापतीतून सावरल्यानंतर वी....
  August 11, 02:40 AM
 • नाशिक - क्रीडा क्षेत्रात राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर नैपुण्य दाखवणारे क्रीडापटू अनेकदा शिक्षणात मागे पडतात किंवा त्यांचे शिक्षण अर्धवटच राहते. नोकरी मिळूनही पदवी नसल्याने अनेकदा त्यांना वरिष्ठ स्तरावरील नोक-यांपासून वंचित राहावे लागत असल्याने नाशिकच्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या वतीने क्रीडापटूंसाठी पदवी आणि पदविका हे अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. महाराष्ट्राने विविध खेळामंध्ये आतापर्यंत अनेक आंतरराष्ट्रीय स्तरावरचे खेळाडू निर्माण केले आहेत. अनेकदा त्यांना...
  August 10, 01:56 AM
 • लंडन - टेनिसच्या विश्वात आपल्या आक्रमक खेळीच्या बळावर एकेरी व दुहेरीच्या १६ ग्रॅण्डस्लॅमचा बहुमान पटकावणा-या स्वीसच्या अव्वल मानांकित फेडररने अद्याप तरी निवृत्तीचा विचार नसल्याची कबुली आपल्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात दिली. वयाची ३० वर्षे गाठणाया फेडररने मोठ्या उत्साहात आपला वाढदिवस साजरा केला. अनेक चाहत्यांसह आपल्या मित्रपरिवाराच्या उपस्थितीत साजरा करण्यात आलेल्या बर्थ डे पार्टीला अनेक दिग्ग्जाची विशेष उपस्थिती होती. ८ आॅगस्ट १९८१ मध्ये जन्मलेला फेडरर मागील १५...
  August 10, 01:52 AM
 • मुंबई- क्रिकेटपाठोपाठ भारतात फॉर्म्युला वन मोटार शर्यती तसेच वर्ल्ड सीरीज बॉक्सिंग, व्यावसायिक गोल्फ, प्रोफेशनल टेनिस टूर अशा श्रीमंत खेळांचेदेखील वारे वाहायला लागले आहे. या खेळांपैकी एक असलेल्या बॉक्सिंग खेळातील प्रतिष्ठेच्या वर्ल्ड सीरिज बॉक्सिंगचे आयोजन भारतात करण्यात येणार आहे. मुंबईच्या ट्रान्स स्टॅडिया या कंपनीने या मालिकेत सहभागी होणाया भारतीय संघाच्या मालकीचे हक्क मिळविले असून, वर्ल्ड बॉक्सिंग फेडरेशनच्या अॅथलेटिक्स आणि यूथ कमिशनचे सचिव जय कवळी यांनी ही माहिती दिली. या...
  August 10, 01:45 AM
 • सॅन दिएगो- जागतिक क्रमवारीत तिस-या स्थानावर असलेल्या पोलंडच्या अॅगानिस्का रेडवास्काने आक्रमक व गतिमान खेळीच्या बळावर जोनारेवाला नमवून सॅन दिएगो ओपन टेनिसचा किताब पटकावला. आघाडीच्या अव्वल मानांकित जोनारेवाने विजेतेपदासाठी महिला एकेरीत शर्थीची झुंज दिली. मात्र वेळीच हार्ड कोर्टवर ताबा मिळवणाया रेडवास्काने ६-३, ६-४ गुणांच्या आघाडीने सरळ दोन सेटवर विजय संपादन केला.७९ मिनिटांत विजय२ गॅ्रण्ड स्लॅम व ४ वेळा डब्ल्यूटीएचा किताब पटकावणाया पोलंडच्या रेडवास्काने जोनारेवाचे आव्हान मोडीत...
  August 9, 01:44 AM
 • जालना- राज्यस्तरीय थ्रो बॉल स्पर्धा आता चांगल्याच वादात सापडलेल्या आहेत. दोन संघटनांच्या मतभेदामुळेच असलेल्या वादामध्येच स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडू विद्यार्थ्यांचाच गेम होत आहे. जालना येथे सुरू असलेली राज्यस्तरीय स्पर्धा घेणारी संघटनाच बनावट असल्याचा दावा राज्य थ्रो बॉल संघटनेचे सरचिटणीस फिरोज खान यांनी केला आहे.ज्यूनिअर थ्रो बॉल स्पर्धेमध्ये मैदानावर किती खेळाडू खेळवावे याबाबतच्या वादाला तोंड फुटले आहे. या स्पर्धेत राज्य संघटनेने नियमानुसार 9 खेळाडू मैदानावर उतरवले...
  August 8, 02:26 AM
 • कराची - मागील चार वर्षांपासूनच्या हाताच्या गंभीर दुखापतीतून नुकत्याच सावरलेल्या सानिया मिर्झाने या वर्षी आपल्या चमकदार खेळीने मानांकनाच्या ट्रॅकवर चांगलाच वेग घेतला आहे. त्यामुळेच डब्ल्यूटीए किताबाचा बहुमान पटकावून कामगिरी उंचावणारी सानिया सध्या महिला एकेरीत 166व्या तर दुहेरीत 64व्या क्रमांकावर विराजमान आहे. आगामी काळातही कामगिरी उंचावणारी लय कायम ठेवणार असल्याचा विश्वासही तिने या वेळी बोलून दाखवला.180 दिवस; 161 लढतीफ्रेंच ओपनपाठोपाठ विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीपर्यंत...
  August 7, 08:38 AM
 • चीनच्या तोडीचे ऑलिम्पिक आम्ही भरवू शकणार नाही. चीनप्रमाणे अफाट आणि अचाट अशी स्पर्धा आम्ही आखू शकणार नाही... हे उद्गार होते लंडनच्या महापौरांचे, जेव्हा त्यांनी तीन वर्षांपूर्वी बीजिंगमध्ये लंडन ऑलिम्पिकच्या यजमानपदाचा ध्वज स्वीकारला होता. पण आज स्पर्धांना प्रत्यक्ष सुरुवात होण्यास एका वर्षाचा अवधी असतानाचे लंडन शहर, ऑलिम्पिक स्टेडियम्स आणि अन्य सुविधांची त्यांची सज्जता पाहिली तर लंडनच्या महापौरांचे ते विधान पटत नाही. कारण आज लंडन शहर एका महिन्याने आॅलिम्पिक स्पर्धा घ्यायच्या...
  August 7, 03:26 AM
 • वॉशिंग्टन - अमेरिकेत सुरू असलेल्या वॉशिंग्टन टेनिस टुर्नामेंटमध्ये दुस-याच दिवशी भारतीय संघाचे पुरुष गटातील आव्हान संपुष्टात आले. दोन दिवसांपूर्वीच एटीपीच्या उपविजेतेपदाचा बहुमान पटकावणा-या सोमदेव देववर्मनला सातव्या मानांकित मार्कोसकडून पराभवाची धूळ चाखावी लागली, तर पुरुष दुहेरीत भारताच्या रोहन बोपन्ना-कुरेशी या जोडीला अनपेक्षित पराभवाला सामोरे जावे लागले. या जोडीच्या पराभवामुळे भारताचे जेतेपदाचे स्वप्न भगले.एकेरीत सोमदेवचा पराभव- वॉशिंग्टन टेनिस टुर्नामेंटमध्ये सायप्रसचा...
  August 6, 06:46 AM
 • न्यूयॉर्क - स्पेनचा राफेल नदाल आणि सर्बियाचा नोवाक डोकोविच हे गेल्या काही दिवसांपासून चांगले खेळत आहेत. या दोघांविरुद्ध खेळताना चांगलाच कस लागतो. राफेल नदालविरुद्धचे माझे सामने नेहमीच रोमांचक होतात. या दोघांना टक्कर देण्याचा दम माझ्याकडे अजूनही आहे. माझा खेळ काही संपलेला नाही, असे सोमवारी वयाची ३० वर्षे पूर्ण करणारा स्वित्झर्लंडचा टेनिसपटू रॉजर फेडररने म्हटले.
  August 5, 05:27 AM
 • कार्ल्सबड - भारताची स्टार खेळाडू सानिया मिर्झा आणि तिची जोडीदार रशियाच्या एलेना वेस्निना या चौथ्या मानांकित जोडीला डब्ल्यूटीए मर्करी इन्शुरन्स ओपन स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत निवृत्त होऊन बाहेर व्हावे लागले. रशियाची एलिना बोविना आणि चीनची जिए झेंग या बिगर मानांकित जोडीविरुद्ध खेळताना वेस्निनाच्या हाताला दुखापत झाली होती. तिने सानियासोबत थोडा वेळ खेळ केला. मात्र, बोविना-झेंग यांनी ५-२ अशी आघाडी घेतली, त्या वेळी सानिया-वेस्निना यांनी माघार घेण्याचा निर्णय घेतला.
  August 5, 05:25 AM
 • मॉस्को - फ्रेंच ओपनपाठोपाठ विम्बल्डन टेनिस स्पर्धेत अपयशी ठरल्यानंतर टेनिस कोर्टपासून दूर असलेल्या पाचव्या मानांकित मारिया शारापोवाची प्रसिद्धी किंचितही कमी झालेली नाही. एकदाच विम्बल्डंनाचा किताब पटकावणा-या मारियाने कमाईच्या बाबतीत अव्वल मानांकित कारोलीन वोझानिस्कीला पिछाडीवर टाकले आहे. मारियाची वार्षिक कमाई २.५ कोटी डॉलर (१ अब्ज १० कोटींहून अधिक) असल्याचे दिसून आले आहे. तसेच गत महिन्यातच शारापोवाने एका कंपनीसोबत ८ वर्षांसाठी चक्क ७ कोटी डॉलरचा करार केला आहे. किताबाच्या लढतीत...
  August 4, 05:04 AM
 • दिल्ली - गतवर्षी तीन अजिंक्यपदाचा बहुमान पटकावण्याची चमकदार कामगिरी करणारी भारताची बॅडमिंटनपटू सायना नेहवाल येत्या आठवड्यापासून लंडनमध्ये होत असलेल्या बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या अजिंक्यपदासाठी सज्ज झाली आहे. आगामी ऑलिम्पिकसाठीची ही लंडनमधील रंगीत तालीमच राहणार आहे. स्पर्धेत विजयाची पताका फडकावण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सायनाने स्पष्ट केले. ८ ते १४ ऑगस्टमध्ये वर्ल्ड चॅम्पियन्सशिप बॅडमिंटन खेळली जाणार आहे. या स्पर्धेच्या महिला एकेरीच्या पहिल्या फेरीत सायनाला पुढे चाल...
  August 4, 05:02 AM
 • कॅलिफोर्निया । दोन दिवसांपूर्वीच डब्ल्यूटीएच्या अजिंक्यपदाचा किताब पटकावणा-या भारताच्या टेनिसस्टार सानिया मिर्झाला मिरॅकल हार्ड कोर्ट टेनिस स्पर्धेत पराभवाचा जबर फटका बसला आहे. नुकत्याच सुरू झालेल्या डब्ल्यूटीएच्या सलामीच्या लढतीतच आघाडीच्या सानिया मिर्झाला महिला एकेरीत १५ व्या मानांकित इटलीच्या सारा इराणीने पराभवाची धूळ चारली. तर एटीपी लेग मेसन टुर्नामेंटच्या पुरुष एकेरीत भारताच्या सोमदेवने जर्मनीच्या डेनिसला नमवून विजयी सलामी दिली.सोमदेव देववर्मन दुस-या फेरीत - एटीपी...
  August 4, 04:58 AM
 • कराची- भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये होणा-या मैत्रीपूर्ण फुटबॉल मालिकेचे स्वरूप आता संक्षिप्त करण्यात आले आहे. रमजान चालू झाल्यामुळे दोन्ही संघांमध्ये फक्त एकच सामना खेळवला जाणार आहे.दोन्ही देशांमधील संबंध दृढ होण्यासाठी इंग्लंडमध्ये फुटबॉल मालिका घोषित करण्यात आली होती. त्यामध्ये तीन सामने खेळवण्यात येणार होते. ३ सप्टेंबर रोजी फिफा दिवस साजरा करण्यात येणार आहे, त्याचदिवशी आता एक सामना खेळवण्यात येणार आहे.पाकिस्तान फुटबॉल फेडरेशचे संचाालक सरदार नवीद हैदर खान यांनी...
  August 3, 05:19 PM
 • कॉलेज पार्क - महिला दुहेरीच्या लढतीत आक्रमक खेळीच्या बळावर भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा व कजाकिस्तानच्या यारोस्लावा श्वेदोवाने तिस-या मानांकित जोडीवर बाजी मारून डब्ल्यूटीए हार्ड कोर्ट सिटी ओपन टेनिस टुर्नामेंटच्या अंजिक्यपदकाचा बहुमान पटकवला. स्पर्धेतील विजयी आघाडीने जबरदस्त फॉर्मात असलेल्या सानिया-श्वेदोवाने बेलारूसच्या ओल्गा गोवारत्सोवा व आला कुर्दियावत्सोवाला ६-३, ६-३ गुणांनी पराभवाची धूळ चारत अजिंक्यपदक पटकावले. एटीपीच्या फॉर्मस क्लासिक टेनिस टुर्नामेंटमध्ये...
  August 2, 01:47 AM
 • लाहोर - येत्या २५ ऑगस्टपासून इंग्लंडमध्ये सुरू होणार असलेली भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील फुटबॉल सामन्यांची मालिका पुढे ढकलण्यात आली आहे. दहशतवादी घटनांमुळे ही मालिका पाकिस्तानऐवजी इंग्लंडमध्ये खेळवण्याची योजना आखण्यात आली होती. पाकिस्तान फुटबॉल फेडरेशनने याबाबतची माहिती दिली. याच महिन्यात ही मालिका होणार होती.
  August 2, 01:42 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात