जाहिरात
जाहिरात
Home >> Sports >> Other Sports

Other Sports News

 • नवी दिल्ली - मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर की मेजर ध्यानचंद यांच्यापैकी कोणाला देशातील सर्वोत्तम पुरस्कार 'भारतरत्न' मिळावा याविषयी चर्चा सुरु असताना, अभिनेत्री दीपिका पदुकोण हिने माझे वडील प्रकाश पदुकोण यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा अशी मागणी केली आहे. प्रकाश पदुकोण हे दिग्गज बॅडमिंटन खेळाडू आहेत.दीपिकाला सचिन की ध्यानचंद यांच्यापैकी कोणाला भारतरत्न मिळावा, असे विचारले असता तिने मी माझ्या वडिलांवर खूप प्रेम करते त्यामुळे त्यांनाच हा पुरस्कार मिळावा असे म्हटले. मात्र, नंतर तिने...
  July 27, 03:59 PM
 • ब्राझीलिया - ब्राझीलचा महान फुटबॉलपटू पेले यांची २०१४ मध्ये होणाऱ्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेचे ब्रँड ऍम्बेसिडर म्हणून निवड करण्यात आली आहे. ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष दिलमा रोसेफ यांनी पेलेंच्या नावावर शिक्कामोर्तब केले. पेले यांनी आपल्याला हा सन्मान आपल्यासाठी गर्वाची बाब असल्याचे म्हटले आहे. पेले म्हणाले, ब्राझीलसाठी १९५८ साली पहिल्यांदा विश्वकरंडक खेळल्यानंतर कायमच ब्राझीलमध्ये फुटबॉल खेळाचे प्रमोशन करण्यासाठी मी तयार असतो. ही माझ्यावरील मोठी जबाबदारी असून, ही जबाबदारी मी...
  July 27, 02:21 PM
 • जकार्ता - भारताची युवा स्टार खेळाडू पी.व्ही. संधूने इंडोनेशिया आंतरराष्ट्रीय चॅलेंज 2011 बॅडमिंटन स्पध्रेत महिला एकेरीच्या फायनलमध्ये अव्वल मानांकित इंडोनेशियाच्या फ्रान्सिस्का रत्नासारीला पराभूत करून विजेतेपद पटकावले. या विजयासह तिने भारतीय बॅडमिंटनमध्ये नवा इतिहास रचला. स्पध्रेच्या अधिकृत संकेतस्थळानुसार स्पध्रेच्या फायनलमध्ये संधूने जागतिक क्रमवारीत 35 व्या क्रमांकावर असलेल्या रत्नासारीला अवघ्या 40 मिनिटांत 21-16, 21-11 ने पराभूत करून बाजी मारली. या विजयासह तिने सुवर्णपदक आपल्या...
  July 27, 12:29 PM
 • नवी दिल्ली - गेल्या वर्षी नवी दिल्ली येथे पार पडलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पध्रेत महिला भारत्तोलनात सुवर्णपदक जिंकणारी भारताची युवा खेळाडू रेणुबाला चानू क्रीडा मंत्रालयावर जाम नाराज झाली आहे. यंदा जाहीर झालेल्या अर्जुन पुरस्काराच्या यादीत आपले नाव नसल्याने ती नाराज झाली आहे. या नाराजीमुळे तिने आपले पदक क्रीडा मंत्रालयाला परत करण्याची धमकी दिली आहे. चानूने गेल्या वर्षी 58 किलो वजन गटात बाजी मारली होती.
  July 27, 12:26 PM
 • नवी दिल्ली - सोमवारी जाहीर करण्यात आलेल्या एटीपी क्रमवारीत भारताचा एकेरीचा स्टार खेळाडू सोमदेव देववर्मनने सहा स्थानांची प्रगती केली. यासह तो कारकीर्दीतील सर्वश्रेष्ठ 62 व्या स्थानी पोहोचला. याच वेळी भारताची महिला खेळाडू सानिया मिर्झाने क्रमवारीत दोन स्थानांनी प्रगती केली.सोमदेव एकेरीच्या क्रमवारीत आधी 68 व्या स्थानी होता. मात्र, आता तो 62 व्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याच्या कारकीर्दीतील ही आतापर्यंतची सवरेत्तम क्रमवारी ठरली आहे. पुरुष दुहेरीत संघांच्या क्रमवारीत लिएंडर पेस आणि...
  July 26, 12:46 PM
 • नवी दिल्ली - हॉकी इंडिया आणि भारतीय हॉकी महासंघ (आयएचएफ) यांच्यादरम्यान आज आठ तास चाललेल्या मॅरेथॉन बैठकीनंतर दोघांचे विलीनीकरण झाले नाही. मात्र, या दोघांनी हॉकीच्या भल्यासाठी संयुक्तपणे काम करण्याची तयारी दर्शवली आहे.भारतीय हॉकीतील या दोन्ही संघटनांना विलीनीकरणासाठी केंद्रीय क्रीडामंत्री अजय माकन यांनी सोमवारपर्यंत मुदत दिली होती. माकन कामात व्यग्र असल्याने या बैठकीत सहभागी होऊ शकले नाहीत.बैठकीला सकाळी 11 वाजता प्रारंभ झाला. ही बैठक सायंकाळी जवळपास 7 वाजता संपली. हॉकी इंडियाचे...
  July 26, 12:43 PM
 • येथे पार पडलेल्या कोपा अमेरिका फुटबॉल स्पध्रेच्या फायनलमध्ये उरुग्वे संघाने शानदार कामगिरी करून पेराग्वे संघाला नमवित स्पध्रेचे विजेतेपद पटकाविले. लुई सुआरेज आणि डिएगो फॉरलॉन यांच्या शानदार कामगिरीच्या बळावर उरुग्वेने रोमांचक सामन्यात पेराग्वेवर 3-0 ने मात केली.या विजयासह उरुग्वेने विक्रमी 15 व्यांदा या स्पध्रेचे विजेतेपद पटकाविले आहे.लीव्हरपूलचा स्ट्रायकर सुआरेजने सामन्याच्या 12 व्या मिनिटाला पहिला गोल करून संघाला 1-0 ने आघाडी मिळवून दिली.याच्या अवघ्या काही मिनिटानंतर फॉरलॉनने...
  July 26, 06:58 AM
 • अबुधाबी- दुसर्या फेरीच्या वर्ल्ड कप फुटबॉल पात्रता स्पर्धेत 9 खेळाडूंसह खेळणार्या भारताला अमिरातीने 3-0 गुणांनी दारुण पराभवाची धूळ चारली. पहिल्या फेरीत कतारविरुद्धच्या पराभवाचे सावट दुसर्या फेरीच्या पात्रता लढतीतही भारतीय संघावर दिसून आले. अमिरातीला नमविण्याच्या प्रय}ात असतानाच काही मिनिटांत भारतीय संघातील 3 खेळाडूंना रेड कार्ड मिळाले. त्यामुळेच भारतीय संघाला 9 खेळाडूंच्या बळावरच संयुक्त अरब अमिरातीच्या आव्हानाचा सामना करावा लागला. रेड कार्डमुळे संघ दुबळा- महिनाभरापासून...
  July 25, 04:09 AM
 • औरंगाबाद. राज्य ज्युदो संघटनेचे उपाध्यक्ष दत्ता आफळे बँकॉक येथे होणा-या आंतरराष्ट्रीय ज्युदो शिबिर आणि पंच परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत, अशी माहिती एका पत्रकार परिषदेत राज्य ज्युदो संघटनेचे अध्यक्ष धनंजय भोसले यांनी दिली. या वेळी पत्रकार परिषदेला सुरेश छापरवार, विश्वास जोशी, भीमराज रहाणे, प्रा. गणेश शेटकर यांचीही उपस्थिती होती. यासाठी ते सोमवार २५ जुलै रोजी रवाना होणार आहेत. अशा प्रकारच्या आंतरराष्ट्रीय पंच परीक्षेसाठी यापूर्वी मुंबईचे सहा जण आणि पुण्यातील एकाला संधी...
  July 24, 03:50 AM
 • औरंगाबाद - प्रत्येक पुरस्कार हा अतिशय जवळचा आणि प्रेरणादायी ठरत असतो. खेलरत्न पुरस्कार मिळत असल्यामुळे माझा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. या पुरस्काराबद्दल कळताच मला दोन वर्षांतील माझी कामगिरी आठवली. आता सर्व काही सुरळीत सुरू आहे. पुढच्या वर्षी लंडन येथे होणाया ऑलिम्पिक स्पर्धेत भारतासाठी पदक जिंकण्याचे एकमेव लक्ष्य सध्या मी ठरविलेले आहे. होय, आता ऑलिम्पिक पदकावरच निशाणा साधायचा आहे, अशी उत्सफूर्त प्रतिक्रिया दिव्य मराठीशी दूरध्वनीवर बोलताना गगन नारंगने व्यक्त केली. माझ्या...
  July 23, 03:13 AM
 • लंडन - मागील वर्षभरापासून विविध देशांतील आघाडीच्या ५६हून अधिक क्रिकेटपटूंचा सट्टेबाजांशी जवळचा संबंध असल्याचा गौप्यस्फोट ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार स्टीव वॉ यांनी केला आहे. लाय डिटेक्टर टेस्टचा प्रस्ताव खेळाडूंच्या युनियनने फेटाळून लावल्यानंतर स्टीव वॉ यांनी याबाबतचा गौप्यस्फोट केला आहे. सट्टेबाजांच्या संबंधांचे जाळे अधिकच विस्तारलेले असल्याचाही दावा त्यांनी या वेळी केला आहे. त्यामुळे क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे. लाय डिटेक्टर टेस्टचा प्रस्ताव फेटाळला!क्रिकेटमधील...
  July 23, 02:59 AM
 • सिएटल । अमेरिकन क्लब सिएटल साऊंडर्स विरुद्धच्या सामन्यात आक्रमक खेळीच्या बळावर मँचेस्टरच्या स्टार फुटबॉलपटू वायने रुनीने सलग तीन गोल करून नव्या हॅट्ट्रिकची नोंद केली. मैत्रीपूर्ण सामन्यातील रोमहर्षक लढतीत मँचेस्टरने रुनीच्या चमकदार कामगिरीच्या बळावर सिएटलला ७-० ने नमवून शानदार विजय मिळवला. सिएटल साऊंडर्सविरुद्धच्या सामन्यात १५ व्या मिनिटालाच चेंडूवर ताबा मिळवून रुनीने शानदार पहिल्या गोलची नोंद केली. त्यानंतर मँचेस्टर संघाच्या आघाडीला बरोबरीत आणण्यासाठी सिएटलच्या मामे...
  July 23, 02:50 AM
 • अटलांटा - ८ वा मानांकित भारताचा टेनिसपटू सोमदेव देववर्मनने पुरुष एकेरी लढतीत जपानच्या तात्सुमाला नमवून अटलांटा चॅम्पियनशिपच्या उपांत्य फेरीत धडक मारली, तसेच बाकु चॅम्पियनशिपच्या महिला एकेरीत तिसरी मानांकित रशियन टेनिसपटू वेरानेही विजय संपादन करून उपांत्यपूर्व फेरी गाठली. आक्रमक खेळाच्या बळावर सोमदेवने एकेरीत विजयाची मालिका कायम ठेवत आघाडी घेतली आहे. दोन दिवसांपूर्वीच एकेरी व दुहेरीतील विजयाचा डबल धमाका करणाया सोमदेवला दुहेरीत मात्र पराभवाचा अनपेक्षित धक्का बसला. सरळ दोन...
  July 23, 02:43 AM
 • औरंगाबाद । झालानी टूल्स मैदानावर आज झालेल्या सामन्यांत सेंट झेवियर्स संघाने ओएस्टर संघाचा ९ गडी राखून पराभव केला. या विजयासह सेंट झेवियर्स संघाने नरेंद्र स्पोर्ट्स व वॉरियर्स क्रिकेट अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेच्या पुढील फेरीत प्रवेश केला. आजच्या सामन्यांत प्रथम फलंदाजी करताना ओएस्टारने ६४ धावा केल्या. धावांचा पाठलाग करताना सेंट झेवियर्स संघाने १ गडी गमावत विजयी लक्ष्य सहज पार केले. यात श्रेयस दायमाने नाबाद १६, तर नरेश राजपूतने २० धावा...
  July 23, 02:35 AM
 • मुंबई. गेले काही महिने ज्या स्पर्धेविषयी हॉकी शौकिनांमध्ये उत्सुकता होती त्या वर्ल्ड सीरीज हॉकीचे आयोजन १५ डिसेंबरपासून होत आहे. सहा आठवडे चालणा-या या स्पर्धेमध्ये देशातील आठ शहरांतील संघांचा समावेश असून, त्या संघांमध्ये राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय ख्यातीचे १७६ खेळाडू आपले कौशल्य पणाला लावताना दिसतील. भारतातील खेळाडूंचा आर्थिक उत्कर्ष तसेच त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाचा अनुभव मिळावा या हेतूने आखणी केलेल्या या स्पर्धेमध्ये सुमारे पंधरा...
  July 22, 04:32 AM
 • मेनडोझा. अमेरिकन कोपा चषक फुटबॉल स्पर्र्धेच्या अजिंक्यपदासाठी पेराग्वे विरुद्ध उरुग्वे यांच्यात येत्या रविवारला लढत होणार आहे. विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानल्या जाणा-या उरुग्वे संघाची स्पर्धेतील कामगिरी अधिकच उंचावणारी आहे. तशी पेराग्वेचीही कामगिरी सरस ठरलेली आहे. त्यामुळेच विजेतेपदासाठी होणारी अंतिम लढत ही अधिकच रोमांचक होण्याची शक्यता आहे. या सामन्यातील निर्णयाची तमाम फुटबॉलपटूंना भलतीच उत्सुकता लागली आहे.
  July 22, 04:21 AM
 • कोलंबो. येत्या ऑगस्ट महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी, वन-डे व टी-२० मालिकेसाठी श्रीलंकन संघाच्या कर्णधारपदी दिलशानची नियुक्ती करण्यात आली आहे. मागील मे महिन्यातही इंग्लंडविरुद्धच्या वन-डे मालिकेतही दिलशानने संघाचे नेतृत्व केले होते. त्यामुळेच निवड समितीने पुन्हा एकदा संघाच्या नेतृत्वाची धुरा दिलशानकडे सोपवली आहे. श्रीलंकन क्रिकेट बोर्डाच्या निवड समितीने कसोटी, एकदिवसीय व टी-२० सामन्यांसाठी नुकताच संघही जाहीर केला आहे.
  July 22, 04:19 AM
 • दिल्ली. येत्या ५ ऑगस्टपासून इंग्लंडमध्ये खेळवल्या जाणा-या पाकिस्तानविरुद्धच्या तीन फुटबॉल सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाकडून आघाडीचा स्ट्रायकर वायचुंग भुतिया खेळण्याची शक्यता आहे. तीन सामन्यांच्या मालिकेसाठी जाहीर केलेल्या ३२ खेळाडूंमध्ये त्याच्या नावाची नोंद आहे. त्यामुळेच प्रतिस्पर्धी पाकिस्तानचे आव्हान मोडीत काढण्यासाठी भारतीय संघास भुतियाचे मोलाचे सहकार्य मिळणार आहे. दुखापतीतून पूर्णपणे सावरल्यानंतरच याला पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात संधी देण्यात...
  July 22, 04:17 AM
 • सन फ्रॅन्सिस्को - जपानने पहिल्यांदाच महिला विश्वकरंडक जिंकत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. जपानने अंतिम सामन्यात अमेरिकेचा पेनल्टी शूटआउटमध्ये ३-१ असा पराभव केला. जपानच्या या विजयानंतर सोशल नेटवर्किंग साईट ट्विटरवर ट्विट येण्याचाही विक्रम प्रस्थापित झाला आहे.सन फ्रॅन्सिस्को येथील रियल टाइम ब्लॉगिंग कंपनीने प्रसिद्ध केलेल्या आकड्यांनुसार जपान आणि अमेरिका यांच्यातील अंतिम सामन्यादरम्यान क्षणागणिक ट्विटरवर ७, १९६ युजर्सने ट्विट केले. आतापर्यंत ट्विटरवर कधीच एवढ्या ट्विट आल्या...
  July 19, 02:56 PM
 • फ्रेंकफर्ट - महिलांच्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत जपानने दोन वेळा विश्वविजेत्या असलेल्या अमेरिकेचा ३-१ असा पराभव करीत विश्वकरंडक जिंकला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या पत्नी मिशेल ओबामा या सामना पाहण्यासाठी उपस्थित होत्या. जपानने अमेरिकेचा पेनल्टी शूटआउटमध्ये ३-१ असा पराभव केला. मिशेल ओबामा यांची उपस्थिती अमेरिकेसाठी चांगली ठरली नाही. महिला फुटबॉलच्या इतिहासात प्रथमच अमेरिकेला जपानकडून पराभव स्वीकारावा लागला. बराक ओबामा सुद्धा हा सामना पाहण्यासाठी जपानला जाणार...
  July 18, 07:14 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात