Home >> Sports >> Other Sports

Other Sports News

 • जिनिव्हा - टेनिसमध्ये जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेला आणि 16 ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकणारा स्वित्झर्लंडचा टेनिसपटू रॉजर फेडरर अमेरिकेन खेळाडू वगळता सर्वात श्रीमंत खेळाडूंच्या यादीत अव्व्ल स्थानावर आहे. श्रीमंतांमध्ये जगातील सर्व खेळाडूंच्या यादीत फेडरर तिसऱ्या स्थानी आहे.एका मॅगझीनने केलेल्या सर्वेनुसार पुरस्कारांची रक्कम आणि जाहिरातीमधून फेडररने आतापर्यंत 6.17 कोटी डॉलरची रक्कम मिळविली आहे. फेडररचा प्रतिस्पर्धी रॅफेल नदाल या यादीत नवव्या स्थानावर आहे. फेडररनंतर...
  June 18, 03:35 PM
 • दिल्ली: मागील वर्षापासून बॅडमिंटन व टेनिसमध्ये चमकदार कामगिरी करून आघाडीच्या सायना नेहवाल व सानिया मिर्झाने आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. गत सिंगापूर ओपन सिरीजच्या विजेतेपदाचा बहुमान पटकावणार्या भारताच्या सायना नेहवालकडून यंदाही चमकदार कामगिरीची आशा होती;मात्र गत दोन दिवसांपूर्वीच सायनाला पराभवाचा जबर धक्का बसला. त्याआधीच एगॉन व ईस्टबोर्न टेनिस स्पर्धेतील सानिया मिर्झाचेही आव्हान संपुष्टात आले होते.वर्षांच्या पहिल्याच सत्रात या जोडीला अपयशाचा सामना करावा लागला.
  June 18, 05:30 AM
 • औरंगाबाद: आयपीएल क्रिकेटची वाढती क्रेझ लक्षात घेऊन लवकरच महाराष्ट्र कबड्डी लीग स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. आयपीएलच्या धर्तीवर होत असलेल्या महाराष्ट्र कबड्डी लीग स्पर्धांच्या आयोजनासाठी महाराष्ट्र कबड्डी असोसिएशने पुढाकार घेतला आहे. पहिल्यांदाच होत असलेल्या लीगच्या होणार्या कबड्डी स्पर्धेमध्ये 8 संघाचा सहभाग असणार आहे. प्रत्येक संघामध्ये 12 खेळाडूंचा समावेश असणारअ आहे.त्यामुळचे 8 संघामध्ये एकुण 96 खेळाडू खेळणार आहेत.महाराष्ट्रामध्ये कबड्डी खेळाचा मोठय़ा प्रमाणात प्रसार व...
  June 18, 05:03 AM
 • सिंगापूर: गत चॅम्पियन सायना नेहवालचा बिगरमानांकित तैपेईच्या (चीन) शाओ चिह चेंगकडून पराभव होताच सिंगापूर ओपन सुपर सिरिज बॅडमिंटन स्पर्धेतील भारताचे आव्हान संपुष्टात आले. सायना नेहवालला २१-८, १०-२१, १०-२१ ने पराभवाचा सामना करावा लागला. चौथी मानांकित आणि गतविजेती सायनाच्या रूपाने भारताचे एकमेव आव्हान जिवंत होते. मात्र, तिचे आव्हान उपउपांत्यपूर्व फेरीच्या पुढे जाऊ शकले नाही. सायनाने तसा पहिला गेम अतिशय सहजपणे २१-८ ने जिंकला. मात्र, नंतर चेंगने पुनरागमन करताना दुसरा गेम २१-१० ने जिंकला....
  June 17, 02:32 AM
 • दिल्ली: गॅरी वेबर टेनिस स्पर्धेचा किताब विजेत्या इंडो-पाक एक्स्प्रेस रोहन बोपन्ना-कुरेशी या जोडीने एटीपी पुरुष दुहेरीच्या मानांकनात टॉप टेनमध्ये धडक मारली. फ्रेंच ओपनच्या उपांत्य फेरीपर्यंत इंडो-पाक एक्स्प्रेसने मजल मारली होती. याच चमकदार कामगिरीने २१५० गुणांवर खेळत असलेल्या बोपन्ना-कुरेशीने मानांकनामध्ये आघाडी घेतली आहे. वर्षभर रोहन बोपन्ना-कुरेशी जोडीने शानदार कामगिरी साधत आघाडीची खेळी केली. फ्रेंच ओपनच्या पुरुष दुहेरीत या जोडीने उपांत्य फेरीत मजल मारली होती. मात्र, या फेरीत या...
  June 16, 07:28 AM
 • लढाऊ वृत्तीच्या ली ना हिने एक धाडसी निर्णय घेतला. सहकारी व आताचा पती जिआंग शॅन सोडून मायकलला प्रशिक्षक नेमले. चीनच्या टेनिस संघटनेने याच गोष्टीला आक्षेप घेतला होता. मात्र, ली ना डगमगली नाही. तिने सरावावर भर दिला. जिद्दीने स्पर्धेत उतरली आणि ऐतिहासिक विजय मिळविला...!पॅरिसच्या रोलँ गॅरो कोर्टमध्ये आणि चीनच्या मातीत एक साम्य आहे. दोन्ही तांबड्या रंगाने ओळखले जातात. पॅरिसच्या कोर्टचा रंग किंचित करडा असू शकेल; पण त्या रंगाला शनिवारी लालसर झाक दिसत होती. साम्यवादी चीनच्या लाल क्रांतीचा,...
  June 16, 05:47 AM
 • जकार्ता । इंडोनेशियाच्या जकार्तामध्ये खेळल्या गेलेल्या ज्युनिअर आशियाई कुस्ती चॅम्पियन्सशिपमध्ये अमित कुमार (५५ किलो), अरुण कुमार (६६ किलो) व सुमित सहारावत (७४ किलो) या त्रिकुटाने चमकदार कामगिरी करून भारताला तीन सुवर्णपदकांचा बहुमान मिळवून दिला. याच सुवर्ण कामगिरीला कायम ठेवत दीपक व कृष्णाने रौप्य, तर पवन कुमार व हितेंदर जोडीने कांस्यपदके पटकावली. अंतिम फेरीच्या लढतीत भारतीय संघाच्या कुस्तीपटूंनी दबदबा निर्माण करून विजयाची पदके पटकावली. जकार्तामध्ये पार पडलेल्या ज्युनिअर आशियाई...
  June 15, 01:45 AM
 • नवी दिल्ली । वर्षाच्या सुरुवातीच्या दोन ग्रॅण्डस्लॅम स्पर्धांत दमदार कामगिरी केल्यानंतर भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झाला आता आपण पुन्हा आपल्या बेस्ट फॉर्मात आल्याचे वाटत आहे. सध्याच्या फिटनेस आणि खेळावर सानिया मिर्झा समाधानी आहे. चार वर्षांपूर्वी सानिया मिर्झा भन्नाट फॉर्मात होती. त्या वेळेस तिने कारकीर्दीतील सर्वोत्तम २७ वे मानांकन मिळविले होते. मात्र यानंतर सततच्या दुखापतीमुळे तिची कारकीर्द प्रभावित झाली. पुढे चालून तिची क्रमवारीत १६६ व्या क्रमांकापर्यंत घसरण झाली. सानिया...
  June 15, 01:35 AM
 • तब्बल एका वर्षानंतर टेनिसपासून दूर असलेल्या व्हिनस व सेरेना या विल्यमस भगिनींनी एंगान टेनिस स्पर्धेत शानदार विजयी सलामी दिली. दुखापतीतून नुकत्याच सावरलेल्या माजी अव्वल अमेरिकन टेनिसपटू व्हिनस विल्यम्सने पुनरागमनानंतर महिला एकेरीत शानदार विजयी सलामी दिली. डब्ल्यूटीए एगॉन टेनिस स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत व्हिनसने आठव्या मानांकित आंद्रिया पेरकोविकला ७-५, ५-७, ६-३ अशा सेटमध्ये पराभवाचा धक्का देऊन विजय संपादन केला. मागील विम्बल्डनच्या विजेतेपदानंतर दुखापतीमुळे त्रस्त असलेल्या...
  June 15, 01:26 AM
 • हिरोशिमा - २०२० मध्ये होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धेच्या यजमान पदाच्या शर्यतीतून हिरोशिमाने बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.जपानमधील हिरोशिमा आणि नागासाकी ही दोन्ही शहरे ऑलिंपिकच्या यजमानपदासाठी तयार झाली होती. हिरोशिमाने १९९४ मध्ये केलेल्या आशियाई खेळांच्या आयोजनामुळे ते कर्जात बुडाले आहेत. ते कर्ज न फेडल्याने हिरोशिमाने यजमानपदाच्या शर्यतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. हिरोशिमाचे महापौर काजूमी मतसुई यांनी कर्ज असल्याने हा निर्णय घेतल्याचे सांगितले. हिरोशिमाच्या माघारीनंतर...
  June 14, 07:06 PM
 • फ्रेंच ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीतील पराभवातून नुकत्याच सावरलेल्या सानिया मिर्झाने डब्ल्यूटीए एगॉन टुर्नामेंटच्या अंतिम फेरीत धडक मारली. चेक गणराज्याच्या रेनाटा वोराकोवावर ४-६, ६-३, ६-४ गुणांनी सानियाने शानदार विजय संपादन केला. एगॉनच्या उपांत्य फेरीत सानिया विरुद्ध रेनाटा यांच्यात लढत झाली. लढतीच्या पहिल्या सेटवर रेनाटाने शानदार खेळी करून ६-४ गुणांनी आघाडी घेतली; मात्र दुसया सेटच्या कोर्टवर वेळीच ताबा मिळवून सानियाने ६-३ गुणांनी बाजी मारून आव्हान बरोबरीत आणले. त्यानंतर तिसया...
  June 14, 06:23 AM
 • वाराणसी - उत्तरप्रदेशातील वाराणसी आणि भदोही येथील रिंकू आणि दिनेश यांनी भाला फेकमध्ये चॅम्पियन बनविण्याचे ठरविले होते. पण, त्यांना अमेरिकेत जाण्याची संधी मिळाली आणि ते अमेरिकेच्या बेसबॉल संघाचे सदस्य बनले. भदोही रिंकू सिंह हा आता अमेरिकेच्या राष्ट्रीय संघाचा सदस्य असून, त्याची कमाई कोट्यावधी रुपयांत आहे. रिंकूवर हॉलीवूडमध्ये चित्रपटही बनविण्यात येत आहेत. एका ट्रक ड्रायव्हरचा मुलगा असलेल्या रिंकूने भाला फेकची आवडीसाठी लखनऊ येथील गुरु गोविंद सिंह स्पोर्टस कॉलेजमध्ये प्रवेश घेतला....
  June 13, 07:03 PM
 • लंडन: जगातला सर्वाधिक वेगवान पुरुष कोण, याचे उत्तर शोधण्यासाठी आतापासूनच जगभर खलबते, चर्चा सुरू झाली आहे. लंडन आॅलिम्पिक २०१२ च्या पुरुष १०० मीटर शर्यतीचा दावेदार आतापासून जमैका एक्स्प्रेस युसेन बोल्ट असल्याचे मानले जात आहे. मात्र बोल्टच्या थराराला केवळ टायसन गेच मागे टाकू शकतो, असे मत इंग्लंडचा माजी धावपटू आणि आॅलिम्पिक पदक विजेता खेळाडू डॅरेन कॅम्पबेल याने व्यक्त केले आहे. बोल्टने बीजिंग आॅलिम्पिकमध्ये १०० मी. आणि २०० मी. शर्यतीत सुवर्णपदक पटकावले होते. याशिवाय त्याने विश्व...
  June 13, 05:47 AM
 • दिल्ली: फ्रेंच ओपनच्या पुरुष दुहेरीच्या उपांत्य फेरीतून बाहेर पडलेल्या इंडो-पाक एक्स्प्रेस रोहन बोपन्ना-कुरेशी या जोडीने र्जमनीच्या गेरी वेबरच्या अंतिम फेरीत धडक मारली. उपांत्य फेरीत बोपन्ना-कुरेशी जोडीने ख्रिस्टोफर-फिलीप या जोडीला 5-7, 6-3, 11-9 गुणांच्या आघाडीने पराभवाचा जबर धक्का दिला. वर्षाच्या सुरुवातीलाच चमकदार कामगिरीने आघाडी घेणार्या बोपन्ना-कुरेशी जोडीचा हा एटीपीचा नववा टूर आहे. दुहेरीत या जोडीने विजयी मोहीम कायम ठेवत मानांकनातही आघाडी घेतली आहे.
  June 13, 05:42 AM
 • लंडन: भारताच्या आघाडीच्या लिएंडर पेस-महेश भूपती जोडीने क्वीन्स क्लबच्या एगॉन क्लासिक टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. बेलारूसच्या मॅक्स मिर्नी-डॅनियल चेस्टर जोडीवर पेस-भूपतीने 6-7 (7),7-6 (7), 10-8 गुणांनी विजय संपादन करून अंतिम फेरीत दिमाखदारपणे प्रवेश मिळवला.फ्रेंच ओपनमधील यशाने आत्मविश्वास दुणावलेल्या भारतीय टेनिसपटू पेस-भूपती जोडीने एगॉनमध्ये चांगली कामगिरी साधली. पुरुष दुहेरीत या जोडीला मिर्नी-डॅनियल चेस्टरच्या आव्हानाचा सामना करावा लागला. उपांत्य फेरीपर्यंत शानदार आघाडी...
  June 13, 05:39 AM
 • दिल्ली- 1995 च्या बिलियडर्स चॅम्पियन्सचे उपविजेते असलेल्या भारतीय आघाडीचे बिलियर्ड्सपटू मुकेश रेहानी यांचे राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. रेहानी यांच्या निधनामुळे बिलियर्ड्स खेळाडूंवर शोककळा पसरली आहे. निधनाचे वृत्त समजताच पंकज अडवाणी, गीत सेठी, प्रशिक्षक मनोज कोठारी यांनी रेहानी यांच्या घरी भेट दिली. भारतीय संघामध्ये चांगली कामगिरी करून रेहानी यांनी क्रमवारीत दुसया स्थानावर धडक मारली होती.
  June 12, 06:05 AM
 • लंडन- गत वर्षभरापासून इंग्लिश प्रीमियर लीगसाठी सॅदरलँड संघाकडून खेळत असलेल्या मिडफिल्डर जॉर्डेन हेंडरसनला लिवरपूलकडूनही आॅफर आहे. त्यामुळेच हेंडरसन लवकरच लिवरपूल संघाकडून खेळण्याची शक्यता आहे. वर्षभरात हेंडरसनची इंग्लिश प्रीमियर लीगमधील कामगिरी महत्त्वपूर्ण ठरली आहे. त्यामुळेच लिवरपूलने आगामी वर्षासाठी हेंडरसनला संघात खेळवण्यासाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. गत दोन दशकांपासून मँचेस्टरसह बार्सिलोना संघाकडून खेळलेल्या हेंडरसनने चमकदार कामगिरीचे प्रदर्शन केलेले आहे
  June 12, 05:52 AM
 • लंडन- ४ थ्या मानांकीत स्लोव्हेकियाची टेनिसपटू डॉनियेला हंचुकोवाने माजी अव्वल सर्बियन टेनिसपटू अॅना इव्हानोविकला महिला ऐकरीत ६-७ (७), ६-३, ६-२ गुणांनी पराभवाची धूळ चारली. या विजयासह हंचुकोवाने एगोन टेनिस स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे.पेस-भूपती विजयीपेस-भूपती या भारताच्या जोडीने दुहेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. पेस-भूपती जोडीने फिलीप पोलसॅक आणि इगोर झेल्ने जोडीला ६-४, ६-४ ने पराभूत केले. आजच्या लढतीत पेस-भुपतीने सुरुवातीपासून आक्रमक खेळ केला.फ्रेंच विजेता नदाल बाहेरगत...
  June 12, 05:50 AM
 • बहरीन- अंतर्गत राजकारणामुळेच ऑक्टोबरमध्ये होत असलेल्या बहरिनमधील ग्राप्रिक्स फॉम्युला-1 रेसिंग कार स्पर्धा अडचणीत सापडली आहे.अंतर्गत वाद विकोपाला गेल्यामुळेच बहरिनमधील स्पर्धा रद्द करण्याचा मानसही अध्यक्षांनी व्यक्त केला आहे.त्यामुळेच वर्षाच्या शेवटची डिसेंबरमध्ये भारतात होत असलेल्या स्पर्धा आता लवकर ऑक्टोबर महिन्यात होण्याची दाट शक्यता आहे.त्यासाठीच्या हालचालींनाही चांगलाच वेग आला आहे. ऑक्टोबरमध्ये होत असल्यानेच भारतीय आयोजन समितीही अधिकच उत्सुक आहे.
  June 11, 01:12 AM
 • बँकॉक- सलामीच्या शानदार विजयाने उपांत्यपूर्व फेरीत आघाडीवर असलेल्या भारतीय बॅडमिंटनपटू सायना नेहवालचे थायलंड ओपन स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. महिला एकेरीत जपानच्या 7 व्या मानांकित जपानच्या ज्वेरुई लीने सायनावर 21-13, 21-12 असा सहज विजय संपादन करून उपांत्य फेरीत धडक मारली.थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्थान मिळवण्यासाठी सायना विरुद्ध ली यांच्यात लढत झाली. पहिल्या सेटवर सायनाने चुरशीची खेळी करून आघाडीचा प्रयत्न केला. मात्र लीने आक्रमक खेळी करून पहिल्या सेटमध्ये 21-13...
  June 11, 12:33 AM
 
जाहिरात

RECOMMENDED