Home >> Sports >> Other Sports

Other Sports News

 • बँकॉक - थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय खेळाडूंचे आव्हान संपुष्टात आले आहे. भारताची अव्वल खेळाडू साईना नेहवाल, पुरुपल्ली कश्यप आणि सौरव वर्मा यांना पराभव स्वीकारावा लागला.साईना नेहवालचा उपांत्य फेरीत चीनच्या ज्वेरुई ली हिने २१-१३, २१-१२ असा सरळ गेममध्ये पराभव केला. ली ने साईनाकडून सिंगापूर ओपनमध्ये स्वीकाराव्या लागलेल्या पराभवाची परतफेड केली. साईनाच्या पराभवानंतर राष्ट्रकुल स्पर्धेत ब्राँझपदक जिंकणाऱ्या कश्यपला चेन लाँग ने २१-१८, २१-५ असे हरविले. तर सौरव वर्माला कोरियाच्या सुंग...
  June 10, 07:26 PM
 • ब्राझील- मागील दोनहून अधिक दशकांपासून फुटबॉलविश्वात आपल्या आक्रमक खेळीच्या बळावर मैदान गाजवणारा ब्राझीलचा फुटबॉलपटू रोनाल्डोने निवृत्तीची घोषणा केली. 34 वर्षीय रोनाल्डोची ब्राझील संघातील कामगिरी अधिकच महत्त्वपूर्ण ठरलेली आहे. दोन दशकांच्या कारकीर्दीत विविध संघाकडून ३४३ सामने खेळणा-या रोनाल्डोच्या नावावर २२५ गोलची नोंद आहे. युरोपियन चषक पात्रता फेरीच्या स्पर्धेत रोमानियाविरुद्धच्या लढतीनंतर ब्राझील फुटबॉलपटू रोनाल्डोने निवृत्ती जाहीर केली. रोनाल्डोने नावाजलेल्या...
  June 10, 02:48 AM
 • बँकॉक- थायलंड ओपनमध्ये शानदार विजयी सलामी देणा-या भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवालने जपानच्या मितानी मिनात्सुवर विजय संपादन करून उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. सायनाने २१-१3, 15-२१, २१-07 गुणांनी बाजी मारून विजयी आघाडी कायम ठेवली. महिला एकेरीच्या सलामीत विश्व चॅम्पियन्सला नमवून आत्मविश्वास दुणावलेल्या 4 थ्या मानांकित सायनाची लढत जपानच्या मितानीशी झाली. स्पर्धेतील आव्हान राखून ठेवण्यासाठी आघाडीच्या सायनाशी सामना करताना मितानीची चांगलीच दमछाक झाली. पहिल्या सेटवर आक्रमक खेळीचे...
  June 10, 02:33 AM
 • क्रमवारीत 58 व्या मानांकित भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झाचे क्लासिक टेनिस टूर्नामेंट स्पर्धेतील आव्हान सलामीच्या पराभवाने संपुष्टात आले. सानिया मिर्झाला आस्ट्रियाच्या पाजेकने महिला एकेरीत 6-3, 4-6, 6-2 गुणांच्या आघाडीने पराभवाची धूळ चारली. गत आठवड्यातच महिला दुहेरीत चमकदार कामगिरीच्या बळावर फ्रेंच ओपनच्या अंतिम फेरीत सानियाने धडक मारली होती.या लढतीत समाधानकारक कामगिरी करून सानियाने उपविजेतेपद पटकावले.एनजीओएन क्लासिक टेनिस टुर्नामेंट स्पर्धेत सानिया विरुध्द पाजेक यांच्यात सलामीची...
  June 9, 05:21 AM
 • हाले- विजयी आघाडीचा सूर गवसलेल्या इंडो-पाक एक्स्प्रेस बोपन्ना व कुरेशी या जोडीने जर्मनीतील टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. या जोडीने इवान डोंगिग-अलेक्जैदरला 7-5, 6-4 गुणांनी पराभवाची धूळ चारली. तसेच सोमदेवला दुस-या एका स्पर्धेत पराभवाची धूळ चाखावी लागली. फ्रेंच ओपनच्या उपांत्य फेरीत धडक मारणा-या रोहन बोपन्ना-कुरेशी जोडीची पुरुष दुहेरीतही चमकदार कामगिरी कायम ठेवली. आव्हानात्मक खेळीचे प्रदर्शन करत या जोडीने उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत विजय संपादन केल
  June 9, 05:16 AM
 • मुंबई-गतवर्षी नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या विश्वचषक हॉकी स्पर्धेसाठी कॅपिटेशन फी म्हणून ठरल्यापेक्षा पाच कोटी रुपये अधिक दिले असल्याचा खळबळजनक आरोप आज भारतीय हॉकी महासंघाचे माजी अध्यक्ष के. पी. एस. गिल यांनी केला. राष्ट्रीय ज्युनियर हॉकी स्पर्धेच्या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी आज येथे उपस्थित असलेल्या गिल यांनी अंतिम सामन्याआधी पत्रकारांशी संवाद साधला. या विषयी अधिक माहिती देताना गिल म्हणाले, आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने (एफ. आय. एच.) भारतीय हॉकी महासंघाशी 2010 च्या विश्वचषक...
  June 9, 04:41 AM
 • मुंबई - यजमान मुंबई आणि विजेतेपदाचा प्रबळ दावेदार समजल्या जाणार्या पंजाबने अनुक्रमे छत्तीसगढचा 9-2 आणि तामिळनाडूचा 7-0 असा दारुण पराभव करून मुंबई हॉकी संघटनेच्या महिंद्र स्टेडियमवर सुरू असलेल्या ज्युनिअर राष्ट्रीय हॉकी स्पर्धेची उपात्य फेरी गाठली. आता उपांत्य फेरीमध्ये मुंबई-राजस्थान आणि पंजाब-कर्नाटक अशा रंगतदार लढती अपेक्षित आहेत.मुंबई 9 (रोशन केशाम, ज्ॉरिड न्यूनस, अनुप वाल्मीकी, आदित्य शिर्के, गणेंद्रजित रणजित, निखिल पुजारी, शेन फेचर, रजत शर्मा, मोसेस पुलंथरा) विजयी वि. छत्तीसगढ 2...
  June 7, 11:25 AM
 • युरोपियन चषक पात्रता फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत अल साल्वाडोरविरुद्ध झालेल्या लढतीत मेक्सिको संघाने 5-0 गुणांनी विजय संपादन केला. स्टार स्ट्रायकर झेवियर हर्माजेदच्या शानदार 3 गोलच्या बळावरच मेक्सिको संघाला विजय संपादन करता आला. पात्रता फेरीच्या लढतीत मेक्सिको संघाने दमदार खेळीचा प्रयत्न केला. मात्र प्रतिस्पर्धी साल्वाडोर संघाच्या खेळाडूंनी मेक्सिकोचा प्रयत्न हाणून पाडला. त्यामुळेच मध्यंतरापर्यंत दोन्ही संघांना गोल करता आला नाही. अतिशय रंगतदार सुरू असलेल्या या सामन्यात...
  June 7, 11:22 AM
 • कोलकता - भारतीय फुटबॉल प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी असून, अर्जेंटिनाचा स्टार खेळाडू लिओनेल मेस्सी सप्टेंबरमध्ये भारतीय फुटबॉलची पंढरी समजल्या जाणाऱ्या कोलकता शहरामध्ये खेळणार आहे.सॉल्ट लेक युवाभारती क्रीडांगणावर व्हेनेझुएला संघाशी अर्जेंटिनाचा संघ एक मैत्रीपूर्ण लढत 2 सप्टेंबरला खेळणार आहे. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने ही माहिती प्रसिद्ध केली आहे. अर्जेटिनाचे स्टार खेळाडू मेसी, कार्लोस तेवेझ यांच्यासह दिग्गज खेळाडू मैदानावर उतरणार आहेत. यापूर्वी दिग्गज फुटबॉल खेळाडू दिएगो...
  June 6, 09:48 PM
 • पॅरिस: महिला एकेरीत फ्रान्सिस्काला पराभवाची धूळ चारून फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या विजेतेपदाचा बहुमान पटकावणार्या ली ना हिने विजयाचे गुपित उलगडले.जेतेपदाचा बहुमान पटकावणार्या पहिल्या आशियाई टेनिसपटू ली ना हिने पतीला सोडल्यामुळेच हे यश गवसल्याचा गौप्यस्फोट केला आहे.मागील काही दिवसांपासून चीन टेनिसपटू ली ना ही पती व उत्कृष्ट टेनिस प्रशिक्षक जियांग शांग यांच्याकडे प्रशिक्षणाचे धडे गिरवत होती;मात्र गत महिन्यातच ली ना हिने पतीकडच्या प्रशिक्षणाला सोडून दुसर्या ठिकाणी जाण्याचा...
  June 6, 04:09 AM
 • पेटर्सबर्ग: गत दोन दशकांपासून फुटबॉल विश्वात आपल्या वैशिष्ट्यपूर्णखेळीने यशाचे शिखर गाठणार्या रशियाच्या रोमन पायल्हुचिंको व आयर्लंडच्या स्ट्रायकर रोबी किन याने विक्रमी किक मारली. युरोपीय चषक पात्रता फेरीत लढतीत या जोडीने नव्या विक्रमाची नोंद केली.सलग तीन गोल करण्याच्या विक्रमी खेळीच्या बळावर रशियाने अर्मेनियाला पराभवाची धूळ चारली, तर आयर्लंडच्या रोबी किनने लढतीत दोन गोल करून आंतरराष्ट्रीय सामन्यातील 50 व्या गोलचा विक्रमी टप्पा गाठला.
  June 6, 04:07 AM
 • औरंगाबाद: झालानी टूल्स मैदानावर आज झालेल्या अटीतटीच्या अंतिम सामन्यात साई अकादमीने स्वप्निल चव्हाणच्या शानदार नाबाद 71 धावांच्या बळावर विश्वासन अकादमीवर 7 गडी राखून विजय मिळवला. या विजयासह साई संघाने एस अँण्ड के क्रिकेट करंडक स्पध्रेच्या विजेतेपदावर आपले नाव कोरले.नाबाद 71 धावा क रणारा स्वप्नील सामनावीर ठरला. प्रथम फलंदाजी करताना विश्वासनने 15 षटकांत 4 बाद 120 धावा केल्या. यात आशिष गवळी 51, विश्वास सोनवणे 16, विलास हिवाळे 16, स्वप्निल दौड 7, सिद्धांत शर्मा नाबाद 13, नीतेश सिंगने नाबाद 9 धावा केल्या....
  June 6, 04:05 AM
 • क्युबा: राष्ट्रकुल सुवर्ण विजेत्या सुरंजय सिंहसह 6 मुष्टियोद्धय़ांनी 41 व्या गिराल्डो कोरडोवा मुष्टियुद्ध स्पर्धेत अंतिम चारमध्ये धडक मारली आहे. क्युबामध्ये सुरू असलेल्या मुष्टियुद्ध स्पर्धेत भारताच्या थाकचोवा ननाओने 49 किलो वजन गटात प्रदर्शन करत विययी आघाडी घेतली. तसेच 52 किलो वजन गटात राष्ट्रकुल सुवर्ण विजेता सुरंजय व संतोष या जोडीने शानदार विजय संपादन केला. संतोषने मोजाबिकच्या आतरुरला 32-8 गुणांनी पराभवाची धूळ चारून उपांत्य फेरीत धडक मारली. तसेच कुलदीप सिंह (75 किलो), मनप्रीत सिंह व...
  June 6, 03:59 AM
 • पॅरीस: जागतिक क्रमवारीतील नंबर वनचा खेळाडू राफेल नदालने आज अतिशय रोमांचक अशा फ्रेंच ओपनच्या अंतिम सामन्यात स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररला नमविले. या विजयासह नदालने विक्रमी सहाव्यांदा फ्रेंच ओपनचे विजेतेपद पटकाविले.बहुप्रतिक्षित अंतिम सामन्यात नदालने फेडररवर 7-5, 7-6, 5-7, 6-1 ने विजय मिळविला. ही लढत अतिशय रंगतदार अशीच झाली. पहिल्या सेटमध्ये नदालने बाजी मारली. नदालने सुरुवातीपासून आक्रमक भूमिका घेताना फेडररवर दबाव निर्माण केला. क्ले कोर्टवर नदालचे वर्चस्व आजच्या लढतीने पुन्हा एकदा सिद्ध...
  June 6, 03:40 AM
 • औरंगाबाद: चांगल्या व अनुभवी प्रशिक्षकांच्या अभावामुळेच मराठवाड्यात शतकी वर्षांचा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या मल्लखांबाला टिकून ठेवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. शेवटची घटका मोजणार्या मल्लखांबाला वाचवण्यासाठी लातूर, उस्मानाबाद, नांदेडमध्ये प्रयत्न केला जात आहे. शासन दरबाराकडूनची अवहेलना, ग्लॅमरचा अभाव अन् उधळलेल्या माती आखाड्यामुळेच हा प्रयत्न कुचकामी ठरत आहे. कुस्ती, योगाप्रमाणेच मराठवाड्यात एकेकाळी मल्लखांबाला चांगले वातावरण निर्माणझाले होते; मात्र, गत काही वर्षांपासून...
  June 5, 04:54 AM
 • दिल्ली: भारतातप्रथमच आंतरराष्ट्रीय धर्तीवर होत असलेल्या रेसिंग कारच्या स्पर्धेला फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल ऑटोमोबाइल्सने हिरवी झेंडी दाखवली आहे. त्यामुळेच येत्या डिसेंबर महिन्यात ग्रेट नोएडामध्ये 1700 कोटी खचरून तयार केलेल्या ट्रॅकवर फॉम्र्युला-1च्या रेसिंग कारचा थरार पाहावयास मिळणार आहे. मागील दशकापासून फॉम्र्युला-1 रेसिंग कार स्पर्धेची वाढती क्रेझ लक्षात घेऊन ग्रेट नोएडामध्ये प्रथमच अडीच हजार एकरच्या 5.14 किमी अंतराचा ट्रॅक तयार केला आहे. मागील अडीच वर्षांपासून फॉर्म्युला-1 च्या...
  June 5, 04:51 AM
 • दिल्ली: भारतातप्रथमच आंतरराष्ट्रीय धर्तीवर होत असलेल्या रेसिंग कारच्या स्पर्धेला फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल ऑटोमोबाइल्सने हिरवी झेंडी दाखवली आहे. त्यामुळेच येत्या डिसेंबर महिन्यात ग्रेट नोएडामध्ये 1700 कोटी खचरून तयार केलेल्या ट्रॅकवर फॉम्र्युला-1च्या रेसिंग कारचा थरार पाहावयास मिळणार आहे. मागील दशकापासून फॉम्र्युला-1 रेसिंग कार स्पर्धेची वाढती क्रेझ लक्षात घेऊन ग्रेट नोएडामध्ये प्रथमच अडीच हजार एकरच्या 5.14 किमी अंतराचा ट्रॅक तयार केला आहे. मागील अडीच वर्षांपासून फॉर्म्युला-1 च्या...
  June 5, 04:51 AM
 • पॅरिस: फ्रेंच ओपन टेनिस स्पध्रेच्या अंतिम सामन्यात आज चीनच्या ली ना हिने इतिहास रचताना महिला एकेरीचे विजेतेपद पटकाविले. तिने अंतिम सामन्यात इटलीच्या फ्रान्सिस्का शियावोन हिला पराभूत करीत ग्रॅण्डस्लॅम जिंकले. या विजयासह ती एकेरीचे ग्रॅण्डस्लॅम जिंकणारी पहिली आशियाई खेळाडू ठरली आहे. अंतिम सामन्यात तिने शियावोनवर 6-4, 7-6 ने मात केली. ली नाने अतिशय दज्रेदार खेळाचे प्रदर्शन करीत चाहत्यांची मने जिंकली. पहिली आशियाई खेळाडू टेनिस ऐकरीचे ग्रॅण्डस्लॅम जिंकणारी चीनची ली ना पहिली...
  June 5, 04:31 AM
 • पॅऱिस - फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत दुहेरीच्या अंतिम फेरीत पराभवाला सामोरे जावे लागलेली भारताची टेनिसपटू सानिया मिर्झाने आपण पराभवानंतर रडल्याचे ट्विटरवर लिहिले आहे.सानिया मिर्झा आणि ऐलना यांच्या जोडीला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. फ्रेंच ओपनच्या अंतिम फेरीपर्यंत मजल मारणारी सानिया ही एकमेव भारतीय खेळाडू आहे. सानियाने ट्विटरवर म्हटले आहे की, आजचा दिवस माझ्यासाठी भावनिक होता. गेल्यावर्षी मला झालेल्या दुखापतीमुळे मला वाटले नव्हते की, मी पुन्हा टेनिस खेळू शकेल. मात्र, आता अंतिम...
  June 4, 03:33 PM
 • औरंगाबाद - जम्मू येथे होणा-या राष्ट्रीय सबज्युनिअर कुस्ती स्पर्धेसाठी राज्याच्या संघनिवडीसाठी ५ जून रोजी कात्रज, पुणे येथे निवड चाचणी आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धा ग्रीक आणि फ्रीस्टाइल या दोन प्रकारांत होणार आहे. या स्पर्धेमध्ये चालू वर्षातील राज्यस्तरीय स्पर्धेतील सहभागी खेळाडू सहभागी होऊ शकतात. अधिक माहितीसाठी ४ जूनपर्यंत शरद कचरे यांच्याशी संपर्क साधावा.
  June 4, 05:03 AM
 
जाहिरात

RECOMMENDED