जाहिरात
जाहिरात
Home >> Sports >> Other Sports

Other Sports News

 • म्युनिच - बीएमडब्ल्यू आंतरराष्ट्रीय गोल्फ क्लब स्पर्धेत भारताच्या शिव कपूरला फायनलमध्ये प्रवेश करण्यात अपयश आले. ३ ओव्हर ७५ या स्कोअरमुळे कपूर ३९ व्या स्थानी घसरला. सुरुवातीला कपूरने सहा अंडर ६६ चा दमदार स्कोअर करून टॉप टेनमध्ये स्थान मिळविले होते.
  June 28, 04:02 AM
 • लंडन - फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या विजेतेपदाचा बहुमान पटकावण्याची ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या ली ना हिच्यावर अमेरिकन, इंग्लंडच्या प्रसारमाध्यमांनी कौतुकाचा वर्षाव केला. वर्षाच्या सुरुवातीलाच चमकदार खेळीच्या बळावर फ्रेंच ओपनचा किताब पटकावणारी ती सर्वाेत्कृष्ट टेनिसपटू असल्याचा खुलासाही प्रसारमाध्यमांनी केला आहे. चीनच्या टेनिसविश्वात तिने नवा ऐतिहासिक बदल घडवून आणल्याचेही कॉलम प्रसिद्ध करण्यात आले आहेत. चीनची टेनिसपटू ली ना हिला विम्बल्डन टेनिस स्पर्धेत पराभवाचा अनपेक्षित...
  June 28, 04:00 AM
 • दिल्ली - एएफआय ग्रॅण्डमास्टर्स बुद्धिबळ चॅम्पियनशिप स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत यजमान संघाच्या परिमार्जन नेगीवर मात करून शशिकिरणने विक्रमी आघाडी घेतली आहे. स्पर्धेत सलग तिसऱ्या विक्रमी विजयाची नोंद करणाऱ्या शशिकिरणने तिसऱ्या स्थानावर धडक मारली. दुसऱ्या फेरीत परिमार्जन नेगी विरुद्ध शशिकिरण यांच्यातील लढत अधिकच रोमहर्षक झाली. नेगीच्या अनपेक्षित पराभवामुळेच स्पर्धेला आता अधिकच रंगत चढली आहे. तसेच आघाडीच्या व्हिक्टरने 3.5 गुणांची कमाई करून दुसरे स्थान पटकावले आहे. फैबियाना ४...
  June 28, 03:56 AM
 • लंडन - तिसऱ्या फेरीत झालेल्या महिला एकेरीच्या रोमहर्षक लढतीत बेलारूसच्या चौथ्या मानांकित व्हिक्टोरिया अझारेका व रशियाच्या मारिया शारापोवाने विम्बल्डन टेनिसच्या चौथ्या फेरीत धडक मारली. तसेच पुरुष एकेरीत ऑस्ट्रेलियन टेनिसपटू बर्नार्ड टॉमिकने बेल्जियमच्या झेविअरला नमवून चौथ्या फेरीत स्थान पटकावले. चीनच्या आघाडीच्या पेंग शुईविरुद्ध मारिया शारापोवाची लढत अधिकच रंगतदार झाली. विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीतील लढतीत आता अधिकच अनपेक्षित निकाल बाहेर येत आहेत.सेरेना...
  June 28, 03:52 AM
 • बर्लिन - आक्रमक खेळीचा चॅम्पियन यजमान जर्मनी संघाने विश्वचषक महिला फुटबॉल स्पर्र्धेत पाहुण्या कॅनडा संघाला २-१ च्या आघाडीने पराभवाची धूळ चारली. केर्स्टीन व सेलिया या दोघींनी केलेल्या शानदार गोलच्या चमकदार कामगिरीच्या बळावर जर्मनी संघाने विजयश्री खेचून आणली. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या दुसया फेरीत जर्मनीविरुद्ध कॅनडा यांच्यात रोमहर्षक लढत झाली. स्पर्धेतील विजेतेपदावरचे आव्हान राखून ठेवण्यासाठी जर्मनीच्या मध्यंतरापूर्वी केर्स्टीनने शानदार पहिला गोल नोंदवला. १-० च्या...
  June 28, 03:48 AM
 • बीजिंग: गत दोन दिवसांपूर्वी पराभवाचा अनपेक्षित धक्का बसलेली फ्रेंच ओपन विजेती चीन टेनिसनपटू ली ना हिचे नुकतेच मायदेशात आगमन झाले. दरम्यान, चाहत्यांनी भेटण्याचा प्रयत्न केला. मात्र, आपण तब्बल ६ आठवड्यांची दीर्घ विश्रांती घेत असल्याचे सांगून ली ना हिने भेट नाकारली. फ्रेच ओपन विजेतेपदाचा बहुमान पटकावून चीनच्या टेनिसविश्वात ली ना हिची कामगिरी सुवर्णाक्षरांनी लिहिली गेली. याच कामगिरीला उजाळा देऊन महिनाभरात दुसया गॅ्रण्डस्लॅम विम्बल्डन टेनिसचा बहुमान पटकावण्याचे मनसुबे ली ना हिने रचले...
  June 27, 04:17 AM
 • जकार्ता: भारताची गतविजेती स्टार खेळाडू सायना नेहवालला इंडोनेशियन सुपर सीरीज बॅडमिंटन स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सायनाला जागतिक क्रमवारीतील नंबर तीनची खेळाडू चीनच्या यिंग वँगकडून पराभवाचा सामना करावा लागला. यासह सलग तीन वेळा या स्पर्धेचे विजेतेपद पटकावण्याचे सायनाचे स्वप्न धुळीस मिळाले. चौथ्या मानांकित सायनाने येथे २००९ आणि २०१० मध्ये विजेतेपद पटकावले होते हे विशेष. मात्र, यंदा अंतिम सामन्यात सायनाचा थरार चालू शकला नाही. अंतिम...
  June 27, 04:07 AM
 • लंडन: जागतिक क्रमवारीत दुस-या स्थानावर असलेल्या सार्बियन टेनिसपटू नोवाक जोकोविचने बागदातिसचा दारुण पराभव करून पहिल्या १६ मध्ये आपले स्थान निश्चित केले आहे, तसेच पुरुष एकेरीत ५व्या मानांकित स्वीडन टेनिसपटू रॉबिन सोडरलिंगला अनपेक्षित पराभवाचा धक्का सहन करावा लागला. आॅस्ट्रेलियाच्या १८ वर्षीय बर्नार्ड टॉमिकने ६-१, ४-६, ७-६ च्या आघाडीने रॉबिन सोडरलिंगचा दारुण पराभव करून आपले आव्हान राखून ठेवले. अनपेक्षित निकालामुळेच दिवसेंदिवस विम्बल्डन टेनिस स्पर्धेला अधिकच रंगत चढत आहे. ५ व्या...
  June 27, 03:57 AM
 • भारताची शेटल क्वीन सायना नेहवालचे इंडोनेशियन ओपन स्पर्धेत विजेतेपदाची हॅटट्रिक करण्याचं स्वप्न चीनच्या यिहान वँगनं भंग केले. गेल्या सलग दोन इंडोनेशियन स्पर्धेत ती विजेती ठरली होती. मात्र रविवारी झालेल्या चुरशीच्या लढतीत सायनाचा १२-२१, २३-२१, १४-२१ असा पराभव झाला. त्यामुळे इंडोनेशियन ओपनमधील तिची विजयाची मालिका खंडीत होण्याबरोबरच हॅटट्रिक हुकली.अंतिम सामन्यात चीनच्या यिहान वँगनं आक्रमक खेळ करत पहिला गेम झटपट खिशात टाकला आणि सायनावर दडपण वाढवले. सायना यातून सावरुच शकली नाही. मात्र...
  June 26, 06:54 PM
 • औरंगाबाद - मागील साडेतीन दशकांचा ऐतिहासिक वारसा लाभलेले अजिंठा क्रीडा मंडळ खो-खोच्या अस्तित्वासाठी शर्थीची झुंज देत आहे. दरम्यान, खो-खो ला टिकवून ठेवण्यासाठी धडपडत असलेल्या अजिंठा क्रीडा मंडळाला मनपाकडून नाहक त्रास सहन करावा लागत आहे. जिल्हा परिषदेच्या मैदानावर मागील 30 वर्षांपासून राष्ट्रीय खेळाडू घडवणाया अजिंठा क्रीडा मंडळाच्या खेळाडूंना मैदानावर सराव करताना मनपाने टाकलेल्या कचयाचा त्रास सहन करावा लागत आहे. मागील वर्षभरापासून या त्रासामुळेच खेळाडू वैतागले आहेत. वारंवार...
  June 26, 06:17 AM
 • लंडन- रशियन 5 वी मानांकित मारिया शारापोवा, डेन्मार्कची कारोलीन वोझानिकी व पुरुष एकेरीत स्पेनच्या रफाल नदालने विजयी आघाडी घेऊन विम्बल्डनच्या चौथ्या फेरीत धडक मारली. तिसया फेरीत झालेल्या रंगतदार लढतीत मारिया शारापोवाने चेक गणराज्याच्या आघाडीच्या कार्लो झकोपालोवाला सरळ दोन सेटवर पराभवाची धूळ चारली. महिला एकेरीप्रमाणे पुरुष एकेरीतील लढती अधिकच रोमहर्षक खेळल्या गेल्या. इंग्लंडचा खेळाडू अॅण्डी मुरेने दोन तास ५६ मिनिटे चाललेल्या लढतीत ज्युबिसिचला ६-४, ४-६, ६-१, ७-६ ने नमविले. सेरेनाने...
  June 26, 06:12 AM
 • जकार्ता - गतविजेती भारताच्या सायना नेहवालने जबरदस्त कामगिरी करताना इंडोनेशियन ओपन सुपर सिरीजच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. उपांत्य सामन्यात सायनाने झुंजार कामगिरी करीत बाजी मारली. उपांत्य लढतीत सायनाने चीन तैयपैच्या शाओ चिह चेंगला तीन सेटमध्ये पराभूत केले. चौथ्या मानांकित भारताच्या स्टार खेळाडूने उपांत्य फेरीची लढत २१-१४, १४-२१ आणि २१-१७ ने जिंकली. ही लढत त्याने अवघ्या ४५ मिनिटांत आपल्या नावे केली. जॉयंट किलर म्हणून ओळखल्या जाणारी चेंग या लढतीत काही धक्कादायक निकाल नोंदविते काय,...
  June 26, 05:54 AM
 • लंडन- एकेरीतील पराभवातून नुकत्याच सावरलेल्या सानिया मिर्झाने महिला दुहेरीच्या लढतीत एलेना वेसनीनासोबत आक्रमक खेळीच्या बळावर विम्बल्डन स्पर्धेच्या दुसया फेरीत विजय संपादन केला. 4थ्या मानांकित इंडो-रशियन एक्स्प्रेस सानिया-एलेनाने 6-0, 7-6 गुणांच्या आघाडीने रशियन अन्ना -मेलिनीचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आणले. गुडघा दुखापतीतून सावरली!विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या लढतीत विजयी आघाडीच्या प्रयत्नात असलेल्या सानिया मिर्झाच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. गुडघ्याच्या गंभीर...
  June 25, 06:53 AM
 • दिल्ली । जर्काता- भारताच्या गतविजेत्या स्टार बॅडमीटनपटू सायना नेहवालने बाजी मारून इंडोनेशिया ओपनच्या सेमीफायलनमध्ये धडक मारली. उपांत्यपुर्व फेरीत 4 थ्या मानांकित सायना नेहवालने महिला एकेरीत डेनमार्कच्या 8 व्या मानांकित टिनेला 21-19, 21-19 गुणांनी पराभवची धूळ चारली. इंडोनेशिया ओपन सुपर सिरीज बॅडमीटन स्पर्धेच्या उपांत्यपुर्व फेरीत टिने विरुध्द सायना यांच्यात सेमीफायनलमधील आव्हान राखून ठेवण्यासाठी शर्थीची लढत झाली;मात्र आक्रमक वैशिष्टपुर्ण खेळी करणाया सायनाने पहिला सेट21-19 गुणांनी...
  June 25, 06:45 AM
 • औरंगाबाद- येथील भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या पश्चिम विभागीय क्रीडा केंद्रात महिला व्हॉलीबॉल आणि बॉक्सिंगचे राष्ट्रीय शिबिर सुरू झाले आहे. सप्टेंबर महिन्यात होणाया आशियाई स्पर्धेत टॉप-४ मध्ये स्थान पटकावण्याचे आपले लक्ष्य असल्याचे व्हॉलीबॉलचे मुख्य प्रशिक्षक पी. ए. जोसेफ यांनी दिव्य मराठीशी बोलताना सांगितले. व्हॉलीबॉल शिबिरात देशभरातील आघाडीच्या महिला खेळाडू सहभागी झाल्या आहेत. तब्बल १०० दिवस चालणाया व्हॉलीबॉलच्या या शिबिरात प्रामुख्याने तंदुरुस्ती आणि डिफेंसवर अधिक भर दिला...
  June 24, 05:18 AM
 • इस्तेर- गत आठवड्यातील सिंगापूर ओपनमधील अनपेक्षित पराभवातून सावरलेल्या भारताच्या स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवालने इंडोनेशिया ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. शानदार विजयी सलामीने आत्मविश्वास दुणावलेल्या सायनाने दुसया फेरीत बुल्गारियाच्या पेट्या नेदेलचेवाचा २१-१८, २१-९ असा दोन सेटवर अवघ्या ३१ व्या मिनिटात दारुण पराभव करत आघाडी घेतली. इंडोनेशिया ओपन सुपर सिरीजच्या दुसया फेरीत ४ थ्या मानांकित सायना विरुद्ध पेट्या यांच्यात लढत झाली. गत विजेतेपदावरचे आव्हान राखून ठेवण्यासाठी...
  June 24, 05:06 AM
 • लंडन - दुसरा मानांकित नोवाक जोकोविचने पुरुष एकेरीत आणि गतविजेती सेरेना विल्यम्सने महिला एकेरीत आपापले सामने जिंकून विम्बल्डन टेनिस स्पर्धेत तिसया फेरीत प्रवेश निश्चित केला आहे. याच वेळी बिगरमानांकित नादिया पेत्रोव्हाने १४ वी मानांकित अॅनास्ताशिया पॉव्ल्युचेंकोवाला पराभूत करून स्पर्धेत खळबळजनक विजय मिळविला. सर्बियाच्या जोकोविचने गुरुवारी येथे पुरुष एकेरीच्या दुसयाा फेरीत दक्षिण आफ्रिकेच्या केविन अँडरसनला ६-३, ६-४, ६-२ ने पराभूत केले. त्याने ही लढत एक तास आणि ४७ मिनिटांत जिंकली....
  June 24, 05:02 AM
 • लंडन- वजन वाढल्यामुळे रोमानियाच्या सिमोना हिल्पची टेनिस कारकीर्द धोक्यात आली होती. वजन वाढल्यामुळे तिला पाठीचे दुखणे उद्भवले. याचा परिणाम तिच्या खेळावर होऊ लागला. वेदनांमुळे तिच्या कामगिरीवर प्रभाव पडत असल्याचे लक्षात असल्यानंतर सिमोनाने वजन घटवण्यासाठी आपल्या वक्षस्थळांवर शस्त्रक्रिया करवून घेतली. शस्त्रक्रिया केल्यानंतर आता तिने पुन्हा टेनिसच्या कोर्टवर यशस्वी पुनरागमन केले आहे.पाठीचे दुखणे इतके वाढले की तिची टेनिस कारकीर्द धोक्यात आली होती. कारकीर्दीवर परिणाम होत असल्याचे...
  June 23, 06:37 AM
 • लंडन- भारताचा युवा टेनिसपटू सोमदेव देववर्मनने विम्बल्डनच्या दुसया फेरीत प्रवेश केला आहे. पहिल्या फेरीत त्याचा विरोधी खेळाडू जर्मनीच्या डेनिस ग्रीमलेरने सामना अर्धवट सोडून माघार घेतली. यामुळे सोमदेवने पुढच्या फेरीत प्रवेश निश्चित केला आहे. ग्रीमलेरने माघार घेतली त्या वेळी सोमदेव ६-४, ४-२ ने पुढे होता. आता पुढच्या सामन्यात सोमदेवची लढत रशियाचा डेव्हिस चषकपटू स्टलवर्ट मिखाली युझिनीसोबत होणार आहे. युझिनीने अर्जेंटिनाचा खेळाडू जुआन मोनॅको याला ४-६, ६-२, ६-२, ४-६, ६-४ ने नमविले. सोमदेवने पहिला...
  June 23, 06:30 AM
 • जकार्ता- येथे सुरू असलेल्या इंडोनेशियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारताची स्टार खेळाडू आणि माजी चॅम्पियन सायना नेहवालने दुसया फेरीत प्रवेश केला आहे. सायनाने पहिल्या सामन्यात शानदार कामगिरी करताना बल्गेरियाच्या लिंडा झेचेरी हिला सरळ सेटमध्ये पराभूत करून पुढची फेरी गाठली. चौथ्या मानांकित सायनाने पहिला सामना अवघ्या २९ मिनिटांत जिंकला. तिने बिगर मानांकित झेचेरीला १७-२१, २१-१९, २१-९ ने पराभूत केले. झेचेरी सायनाला जोरदार आव्हान देऊ शकली नाही. तिने चांगली सुरुवात केली होती. सुरुवातीलाच तिने १०...
  June 23, 06:26 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात