जाहिरात
जाहिरात
Home >> Sports >> Other Sports

Other Sports News

 • जकार्ता- येथे सुरू असलेल्या इंडोनेशियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारताची स्टार खेळाडू आणि माजी चॅम्पियन सायना नेहवालने दुसया फेरीत प्रवेश केला आहे. सायनाने पहिल्या सामन्यात शानदार कामगिरी करताना बल्गेरियाच्या लिंडा झेचेरी हिला सरळ सेटमध्ये पराभूत करून पुढची फेरी गाठली. चौथ्या मानांकित सायनाने पहिला सामना अवघ्या २९ मिनिटांत जिंकला. तिने बिगर मानांकित झेचेरीला १७-२१, २१-१९, २१-९ ने पराभूत केले. झेचेरी सायनाला जोरदार आव्हान देऊ शकली नाही. तिने चांगली सुरुवात केली होती. सुरुवातीलाच तिने १०...
  June 23, 06:26 AM
 • ओळख संघटनांची : औरंगाबाद पॉवर आणि वेटलिफ्टिंग संघटना पॉवरलिफ्टिंग हा थेट फायदा करणारा असाच खेळ आहे. पॉवरलिफ्टिंग आणि वेटलिफ्टिंग या खेळामुळे शरीर बलदंड, मजबूत आणि कणखर बनते. याशिवाय व्यक्तिमत्त्व सुंदर आणि आकर्षक होते. स्वत:ची प्रकृती उत्तम राहते. पॉवरलिफ्टिंग आणि वेटलिफ्टिंग हा खेळ अवघ्या ७ ते ८ महिन्यांच्या सातत्यपूर्ण सरावाने आत्मसात करता येतो. फक्त गरज असते ती इच्छाशक्तीची. पॉवरलिफ्टिंग आणि वेटलिफ्टिंग हा केवळ खेळ नसून, उत्तम करिअरचे योग्य साधन आहे. या खेळला स्कूल गेम, आॅलिम्पिक...
  June 23, 04:35 AM
 • लंडन - येथील ग्रास कोर्टवर सुरु झालेल्या विम्बल्डन स्पर्धेत मंगळवारचा दिवस खास होता. ग्रास कोर्टची क्वीन म्हणून ओळखली जाणारी सेरेना विल्यम्सने या स्पर्धेत बराच अंतरानंतर पुनरागमन केले. तिने आपल्या पहिल्याच सामन्यात प्रेक्षकांची निराशा नाही केली. विम्बल्डनमधील पहिल्या विजयानंतर ती भावनाविवश होऊन रडू लागली.सेरेनाने फ्रान्सच्या अरावने रेंजाईचा पराभव केल्यानंतर टॉवेलमध्ये तोंड घालून जोरदार रडू लागली. गेल्या वर्षी विम्बल्डन जिंकल्यानंतरच ती काच पायात घुसल्याने टेनिसपासून दूर झाली...
  June 22, 06:49 PM
 • मुंबई - पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिकशी लग्न केल्यानंतर भारतात लोकप्रियता कमी झालेली टेनिसपटू सानिया मिर्झा ही पाकिस्तानची नसून भारतीय असल्याचे महेश भूपतीने म्हटले आहे. भूपती म्हणाला, सानियाचे भारतातील अस्तित्व नाकारून चालणार नाही आणि ते चुकीचे आहे. त्यामुळे तिला कोणी काही बोलू नये. ती अजूनही भारताकडून खेळत आहे. त्यामुळे तिने टेनिसमध्ये केलेल्या कामगिरीवर आपल्याला गर्व असला पाहिजे. सानियाने मिक्स दुहेरीत ग्रँडस्लॅम जिंकलेले आहे. ती एक प्रतिभावान खेळाडू आहे. तसेच भारताचे सोमदेव...
  June 22, 12:44 PM
 • दिल्ली- विदेशी प्रशिक्षकामुळेच खेळ सुधारेल, असे मनोरे रचणाऱया पाकिस्तान व भारताच्या हॉकी संघाची खेळीच संकटात सापडल्याची प्रतिक्रिया माजी कर्णधार व प्रशिक्षक ताहिर झमन यांनी व्यक्त केली. पाकिस्तान हॉकी संघाच्या प्रशिक्षक पदावर कार्यरत असलेले झमन म्हणाले की, मागील काही वर्षापासून भारत आणि पाकिस्तान संघामध्ये आक्रमक खेळीचा अभाव दिसून येत आहे. केवळ विदेशी प्रशिक्षक असल्यामुळेच संघाची कामगिरी सुधारते, असे मनोरेच या दोन्ही संघांनी मनोमन बांधले आहेत. मात्र, प्रशिक्षक बदलले तरी...
  June 22, 06:14 AM
 • लंडन - मागील दोन महिन्यांपासून भ्रष्टाचार प्रकरणामुळेच चर्चेत असलेले फिफाचे उपाध्यक्ष जॅक वॉर्नर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. या वेळी फिफाने त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे. तसेच लाच घेतल्याप्रकरणी वॉर्नरविरुद्ध सुरू असलेली कारवाई थांबवण्यात आली आहे. मार्च महिन्यात जॅक वॉर्नर यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता.
  June 22, 06:06 AM
 • लंडन- महिला एकेरीच्या सलामीच्या लढतीत भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झाचे विम्बल्डन स्पर्धेतील आव्हान फ्रान्सच्या टेनिसपटूने संपुष्टात आणले. ९६ व्या मानांकित फान्सच्या व्हिर्जिनी रझावाने ७-६, २-६, ६-३ गुणांच्या आघाडीने सानियाचा दारुण पराभव करून दुसऱया फेरीत धडक मारली. विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीत ६० व्या मानांकित सानियाविरुद्ध व्हिर्जिनी यांच्यात लढत झाली. लढतीच्या पहिल्या सेटमध्ये दुसया फेरीत प्रवेश मिळवण्यासाठी सानियाने कमी चुका करून व्हिर्जिनीच्या आक्रमणाला चोख...
  June 22, 05:47 AM
 • लंडन - भारताची टेनिसपटू सानिया मिर्झाला विम्बलडन स्पर्धेत पहिल्याच फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. सानियाचा फ्रान्सच्या व्हर्जिनी रझानो हिने ७-६(७-४), २-६, ६-३ असा पराभव केला. सानिया पहिल्याच फेरीत गारद झाल्याने भारताचे महिला एकेरीतील आव्हान संपुष्टात आले आहे. पहिला सेट टायब्रेकमध्ये हारणाऱ्या सानियाने दुसऱ्या सेटमध्ये जोरदार मुसंडी मारीत तो जिंकला. मात्र, तिसऱ्या सेटमध्ये व्हर्जिनीने वर्चस्व गाजवीत सानियाचा पराभव केला.
  June 21, 07:49 PM
 • लंडन - विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या पहिल्या फेरीत पुरुषएकेरीत स्पेनच्या राफेल नदाल व महिला एकेरीत रशियन टेनिसपटू वेरा जोनारेवाने शानदार विजयी सलामी दिली. अटीतटीच्या लढतीत व्हीनसने आघाडीच्या उझबेकिस्तानच्या अकगुलला पराभवाची धूळ चारत दुसर्या फेरीत धडक मारली.नदालची आघाडीअव्वल मानांकित स्पेन टेनिसपटू नदालविरुद्ध मायकल रसेल यांच्यात लढत चांगलीच रंगली.मात्र, पहिल्या सेटवर 6-4 ने बाजी मारणार्या नदालने दुसर्या व तिसर्या निर्णायक सेटमध्ये 6-2, 6-3 गुण संपादन करून दुसर्या फेरीत धडक मारली.वेरा...
  June 21, 11:17 AM
 • दोहा- आगामी लंडनमधील ऑलिम्पिक स्पर्धेच्या विजयाचे मनोरे रचण्याचे स्वप्न पाहणार्या भारतीय फुटबॉल संघाला पात्रता फेरीच्या सलामीत दारुण पराभवाची किक बसली. यजमान कतार संघाने 3-1 गुणांनी दणदणीत विजय संपादन करून पाहुण्या भारतीय संघाच्या प्रयत्नांना उधळून लावले. सलामीच्या सामन्यातील पराभवाच्या किक जमिनीवर आलेल्या भारतीय संघाची पुढील वाटचाल अधिकच खडतर राहणार आहे. कतारविरुद्धची दुसरी लढत भारतीय संघ 23 जूनला पुण्याच्या बालेवाडीत खेळणार आहे.हसन, एलनीलची आक्रमक खेळी1-1 च्या बरोबरीच्या...
  June 21, 06:18 AM
 • औरंगाबाद- विभागीय क्रीडा संकुलावरील ट्रॅक चुकीचे आहे, हे वृत्त कानी आले आहे. याबाबत मी अधिकृतरीत्या वरिष्ठ अधिकार्यांकडून माहिती घेतो. जो कोणी यात दोषी असेल, त्यावर कडक कारवाई केली जाईल, अशी माहिती राज्याचे क्रीडामंत्री पद्माकर वळवी यांनी दिव्य मराठीशी बोलताना दिली.औरंगाबादेतील विभागीय क्रीडा संकुलाचे ट्रॅक चुकीचे आहे, याबाबत आमच्याकडे आतापर्यंत अधिकृत तक्रार किंवा काहीच माहिती नव्हती. कोणीही याबाबत बोलले नव्हते. मात्र, आता अशी काही माहिती पुढे आली आहे. याबाबत पूर्ण चौकशी करतो. जो...
  June 21, 06:09 AM
 • ईस्टबोर्न: आघाडीचा इटालियन टेनिसपटू आद्रियास सेप्पीने पुरुष एकेरीत तर फ्रान्स टेनिसपटू मारीयन बार्तोलीने एगॉन इंटरनॅशनल टेनिस स्पर्धेच्या विजेतेपदाचा बहुमान पटकावला. महिला एकेरीत चमकदार कामगिरी करत ६ व्या मानांकित बार्तोलीने चेक गणराज्यच्या पेत्रा क्लेतोवाला ६-१, २-६, ७-५ गुणांनी पराभवाची धूळ चारली. अंतिम फेरीत पुरुष एकेरीच्या विजेतेपदासाठी आद्रियास विरुद्ध सार्बियन जांको यांच्यात अटीतटीची लढत झाली.
  June 20, 04:35 AM
 • लंडन: जागतिक क्रमवारीत तिसरा मानांकित स्वीस टेनिसपटू व माजी विम्बल्डन विजेता रॉजर फेडररला अव्वल टेनिसपटू सॅम्प्रासच्या विक्रमाची बरोबरी साधण्याची प्रतीक्षा आहे. विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या विजेतेपदाचा सलग सातव्यांदा किताब जिंकणा-या सॅम्प्रासच्या विक्रमाला गाठण्याचे वेध फेडररला लागले आहेत. हेच ध्येय गाठण्यासाठी फेडरर आज, सोमवारपासून सुरू होणाया विम्बल्डन टेनिस स्पर्र्धेच्या पुरुष एकेरीसाठी सज्ज झाला आहे.
  June 20, 04:27 AM
 • लंडन: टेनिस विश्वातल्या प्रतिष्ठेच्या विम्बल्डन टेनिस स्पर्धेला आज, सोमवारी मोठ्या दिमाखात सुरुवात होणार आहे. गतविजेत्या सेरेनासह महिला एकेरीत व्हीनस, ली ना, वेरापाठोपाठच भारताची टेनिसपटू सानिया मिर्झा विजेतेपदासाठी सज्ज झाल्या आहेत. तसेच पुरुष एकेरीच्या किताबासाठी फेडररसह नदाल, मुरेही उत्सुक आहेत. त्यामुळेच यंदाच्या विम्बल्डन स्पर्धेत अव्वल टेनिसपटूंच्या शर्थीच्या रोमहर्षक लढती होणार आहेत. लंडनमध्ये होत असलेल्या विम्बल्डन स्पर्धेसाठी ग्रास कोर्ट सज्ज झाली आहेत. नुकताच महिला...
  June 20, 04:20 AM
 • औरंगाबाद: औरंगाबादच्या विभागीय क्रीडा संकुलावर 1.17 कोटी खर्चून बांधण्यात आलेले अॅथेलेटिक्सचे ट्रॅक चुकीचे असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. राज्य कोणतीही अधिकृत स्पर्धा घेण्यासाठी ट्रॅकची जे अंतर असायला हवे होते, तेच चुकीचे आहे. यामुळे येथे एकही अधिकृत स्पर्धा होऊ शकणार नाही. मागच्या वर्षीच आॅक्टोबर महिन्यात घेण्यात आलेली आंतरशालेय स्पर्धेतील धावण्याच्या सर्व शर्यती येथील ट्रॅकवर न घेता त्या पीईएस महाविद्यालयाच्या मैदानावर घेण्याची नामुष्की आयोजकांवर आली. मात्र, या...
  June 20, 04:12 AM
 • दशकापासून औद्योगिक क्षेत्रात झपाट्याने नेत्रदीपक कामगिरी करणार्या औरंगाबाद शहराने विविध क्षेत्रातही प्रगतीचा मोठा पल्ला गाठला आहे. शैक्षणिक क्षेत्रात चमकदार कामगिरी करणारे औरंगाबाद क्रीडा क्षेत्रातही आघाडीच्या स्थानावर आहे. राष्ट्रीय व राज्यस्तरीय खेळाडूंपाठोपाठच आंतरराष्ट्रीय स्तरावरही खेळाडू मोठय़ा संख्येत वेगाने तयार होत आहेत. याच क्रीडा क्षेत्राच्या वातावरणात वयाच्या 6 व्या वर्षापासूनच वेगळा ठसा उमवटणारी मयूरीही आघाडीवर आहे. रोलर स्केटिंगमध्ये स्टार असलेली मयूरी...
  June 19, 12:16 PM
 • बीजिंग: महिला एकेरीत आघाडीची कामगिरी करून फ्रेंच ओपनचा किताब पटकावल्यानंतर आता विम्बल्डन किताब पटकावण्याचे ध्येय समोर असल्याची कबुली चिनी टेनिसपटू ली ना हिने दिली. वर्षातल्या तिसया ग्रँण्डस्लॅमचा पाठलाग करणारी ली ना विम्बल्डनमध्ये शानदार कामगिरी करण्यासाठी कसून सराव करत आहे. विम्बल्डन ओपन टेनिस स्पर्धा उद्या, सोमवारपासून मोठ्या दिमाखात सुरू होणार आहे. फ्रेंच ओपन किताब पटकावण्याच्या सुवर्णयशानंतर विम्बल्डन विजेतेपदाचा बहुमान पटकावण्याचा मानस ली ना हिने व्यक्त केला. महिला...
  June 19, 05:18 AM
 • म्युनिच: जर्मनीच्या म्युनिचमध्ये झालेल्या आयएसएसएफ विश्वचषक स्पर्धेच्या १० मीटर रायफलमध्ये 600 पैकी ५९६ गुण संपादन करून सुवर्णपदक विजेता अभिनव बिंद्राने अंतिम फेरीत धडक मारली. याच सुवर्ण कामगिरीसह अभिनव बिद्रांने लंडनमध्ये होत असलेल्या ऑलिम्पिकमधील कोटाही पूर्ण केला आहे. आगामी आॅलिम्पिक स्पर्धेत कोटा पूर्ण करणारा अभिनव हा आठवा नेमबाजपटू ठरला आहे. बीजिंग ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णवेध घेणाया अभिनव बिंद्राने जर्मनातील स्पर्धेत चमकदार कामगिरी साधली आहे. स्पर्धेच्या उपांत्य फेरीत...
  June 19, 05:16 AM
 • कोयंबतूर - चौदाव्या टायर नॅशनल रेसिंग चॅम्पियनशीप सहभागी झालेली एकमात्र महिला चालक आलिशा अब्दुल्ला म्हणते की, मी जेव्हा हेल्मेट घालते तेव्ही मी एक मुलगी असल्याचे विसरते.कारमध्ये होत असलेल्या चॅम्पियनशीपमध्ये सहभागी झालेली आलिशा मुलींनी या रेसमध्ये सहभागी होण्यासाठी पुढे आले पाहिजे, असे सांगितले. हेल्मेट घातल्यावर माझा आत्मविश्वास द्विगुणीत होतो. नऊ वर्षाची असताना रेसिंग ट्रॅकवर उतरणारी आलिशा आता 21 वर्षांची आहे. आलिशा 2006 पर्यंत बाईक रेसिंग करीत होती. पण, एका दुर्घटनेनंतर ती कार...
  June 18, 08:09 PM
 • नवी दिल्ली - बीजिंग ऑलिंपिकमध्ये भारताला एकमेव सुवर्णपदक मिळवून देणारा भारताचा अव्वल नेमबाज आता लंडन ऑलिंपिकसाठी पात्र झाला आहे.बीजिंग ऑलिंपिकमध्ये अभिनवने 10 मी एअर रायफल प्रकारात सुवर्णपदक जिंकले होते. लंडनमध्ये 2012 मध्ये ऑलिंपिकसाठी आतापर्यंत अभिनवसह आठ नेमबाज पात्र झाले आहेत. यामध्ये गगन नारंग, विजय कुमार, रोंजन सोधी, हरी ओम सिंह, संजीव राजपूत, राही सरनोबत आणि अन्नु राज सिंह यांचा समावेश आहे.
  June 18, 06:20 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात