जाहिरात
जाहिरात
Home >> Sports >> Other Sports

Other Sports News

 • पॅरिस - गत महिनाभरापासून फुटबॉल स्पर्धेत मादक पदार्थ सेवनास मंजुरी दिल्याप्रकरणी सुरू असलेल्या वादावर अखेर हम्माम यांनी निवडणूक स्पर्धेतून माघार घेतल्याने पडदा पडला. फिफा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत हम्माम हे ब्लाटरचे कट्टर प्रतिस्पर्धी मानले जात होते. गत दशकापासून फुटबॉल महासंघात सुरू असलेल्या भ्रष्टाचाराला रोखण्यासाठी करतचे मोहम्मद हम्माम हे निवडणुकीच्या रणांगणात उतरले होते. मात्र, सोमवारी त्यांनी माघार घेतली.
  May 30, 05:35 PM
 • पॅरिस - माजी अव्वल टेनिसपटू रोजर फेडररने 6-3, 6-2, 7-5 गुणांनी स्तानिस्लास वावरिंकाला पराभवाची धुळ चारत फ्रेंच ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. महिला एकेरीत ज्वोनारेवाला पराभवाचा धक्का बसला. पुरुष एकेरीत रोजर फेडररविरूद्ध वावरिका यांच्यात शर्थीची लढत झाली. पहिल्या सेटवर आक्रमक खेळी करून फेडररने 6-3 गुणांनी बाजी मारली. याच खेळीला कायम ठेवत फेडररने दोन सेटवर 6-2, 7-5 ने सहज आघाडी घेत वावरिकाचे स्पध्रेतील आव्हान संपुष्टात आणले.
  May 30, 04:50 PM
 • पॅरिस - भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झाने रशियन टेनिसपटू एलेना वस्निनासोबत महिला दुहेरीच्या लढतीत 6-1, 6-4 गुणांच्या आघाडीने मारिया जोश -अनाबेलवर ऐतिहासिक विजय मिळविला. फ्रेंच ओपनची उपांत्यपूर्व फेरी गाठणारी सानिया एकमेव भारतीय टेनिसपटू ठरली. सानिया-एलेनाने पहिल्या सेटवर 6-1 गुणांनी बाजी मारली. या जोडीने दुसर्या सेटवर 6-4 ने आघाडी घेत उपांत्य फेरीत धडक मारली.
  May 30, 04:46 PM
 • महिला बॅडमिंटनपटूंना खेळतांना स्कर्ट घालण्याची सक्ती करण्याचा निर्णय जागितिक बॅडमिंटन महासंघाने अनिश्चित कालावाधीसाठी मागे घेतला आहे. महासंघाच्या वेबसाईटवर हा निर्णय अधिकृतरित्या जाहिर करण्यात आला आहे. स्कर्टच्या सक्तीचा नियम 1 जूनपासून लागू होणार होता.महिला बॅडमिंटन समितीच्या सुचना महासंघाने मान्य केल्या असल्याचे वेबसाईटवर दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. महासंघाच्या निर्णयाला सर्वच महिला बॅडमिंटनपटुंकडून विरोध झाला होता. महासंघावर अश्लिलतेचा आरोप करण्यात आला होता.
  May 30, 09:52 AM
 • पॅरिस - पाच वेळेसचा चॅम्पियन स्पेनच्या राफेल नदालने तिसऱ्या फेरीत आपल्या लौकिकानुसार खेळ करताना आज फ्रेंच ओपनमध्ये एकेरीत चौथ्या फेरीत प्रवेश केला. इंग्लंडचा ऍण्डी मुरे, महिला गटात चीनची ली ना, व्हिक्टोरिया अजारेंका यांनीही आपापल्या लढती जिंकल्या. नदालने क्रोएशियाच्या ऍटोनियो वेक याला सरळ सेटमध्ये ६-१, ६-३, ६- ने नमविले. महिला गटात बेलारुसच्या अजारेंकाने इटलीच्या रोबर्टा विंसीला ६-३, ६-२ ने नमविले. ली ना हिने रोमानियाच्या सोराना क्रिस्टियाला ६-२, ६-२ ने पराभूत केले.
  May 29, 01:59 AM
 • पॅरिस - गत सामन्यातील विजयी आघाडीने आत्मविश्वास दुणावलेल्या भारताच्या लिएँडर पेस व महेश भूपती या जोडीला दुसऱ्या फेरीत दारुण पराभवाचा धक्का बसला. फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत ऑस्ट्रेलियाच्या स्टीफन व एशले फिशर या जोडीने सलामीच्या विजयाने भरधाव वेगाने धावणाऱ्या पेस-भूपती या इंडियन एक्स्प्रेसला रोखून तिसऱ्या फेरीत धडक मारली. चेन्नई सुपर ओपन टेनिस स्पर्धेच्या विजेतेपदाचा बहुमान पटकावण्याची महत्त्वपूर्ण कामगिरी करणारी पेस-भूपती ही जोडी दुहेरीत एकत्र खेळत होती. फ्रेंच...
  May 29, 01:54 AM
 • परभणी - लिम्का बुकमध्ये नोंद करण्यासाठी वयाच्या 47 व्या वर्षी सलग 30 तास पोहण्याच्या विक्रमास बालरोगतज्ज्ञ डॉ.रामगोपाल कालानी यांनी काल,शनिवारी 28 मे रोजी सकाळी 10 वाजता सुरुवात केली.डॉ.रामगोपाल कालानी हे गत दशकापासून परभणीमध्ये बालरोगतज्ज्ञ म्हणून ओळखले जातात. वैद्यकीय व्यवसायात मग्र असतानाच जलतरणाचा छंद डॉ.कालानी जोपासत आहेत. 2002 मध्ये डॉ.कालानी यांनी सलग 12 तास पोहण्याचा विक्रम आपल्या नावे नोंदवला होता.त्यापाठोपाठच 2007 मध्येही 24 तास सलग पोहण्याचा विक्रम डॉ.कालानी यांच्या नावावर नोंद...
  May 29, 01:50 AM
 • आयर्स - गत महिनाभरापासून अर्जेंटिना फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष ग्रोनडोनांवरच्या मादक पदार्थ सेवनास होकार दिल्याप्रकरणावरून मोठे वादंग निर्माण झाले आहे.प्रसिद्ध खेळाडू मार्डोना याने पुन्हा एकदा या वादाला उजाळा दिला आहे.मागील महिनाभरापासून अर्जेंटिना संघास मादक पदार्थ सेवनाची मुभा अध्यक्ष ग्रोनडोना यांनीच दिल्याचा आरोप मार्डोना करत आहे.हाच कित्ता त्याने पुन्हा एकदा गिरवून याप्रकरणी दोषी असलेल्या अध्यक्ष ग्रोनडोनावर कारवाई व्हावी,अशी मागणीही त्याने केली आहे.1994मध्ये विश्वचषक...
  May 29, 01:48 AM
 • पॅरिस - तब्बल 17 वर्षापासून टेनिस विश्वामध्ये आपल्या आक्रमक खेळीच्या बळावर महिला एकेरीत वर्चस्व गाजवत असलेल्या स्वीस टेनिसपटू पैटी श्वाइडरने टेनिसमधून निवृत्तीची घोषणा केली. 32 वर्षीय पैटीने 11 अजिंक्यपदासह 59 ग्रँड स्लॅम किताबही पटकावलेला आहे. मागील 17 वर्षांपासून पैटीने टेनिस विश्वात आपल्या चमकदार कामगिरीने वेगळाच ठसा उमटवला आहे. दरम्यान,आयोजित पत्रकार परिषदेत पैटीने आपल्या निवृत्तीची घोषणा केली.या निर्णयामुळेच चाहत्यांसह अनेक टेनिसपटूंना आश्चर्याचा मोठा धक्काच बसला. आव्हानात्मक...
  May 29, 01:45 AM
 • लंडन - गत आठवड्यापासून फुटबॉल लीगमध्ये झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणात विनाकारण नाव गोवल्या जात असल्यामुळेच फिफाचे अध्यक्ष ब्लाटर यांनी विरोधांकावर निशाना साधला आहे.कोणत्याही प्रकरणाची संबंध नसतानाच हम्माम यांच्यासोबत आपले नाव जोडल्या जाण्याच्या कारणावरून संतप्त झालेल्या ब्लाटर यांना विरोधकांवरच चांगलेच आगपाखड घेतला. सदर प्रकरणाशी आपला काडीमात्रही संबंध नसल्याची स्पष्टोक्तीही त्यांनी दोन दिवसापुर्वीच केली होती.
  May 28, 07:13 PM
 • रोम - गत पाच वर्षापासून आपल्या सुसाट वेगाने धावण्याच्या विश्वात वर्चस्व निर्माण करणाऱ्या युसेन बोल्टने अमेरिकन लीगमध्येही आपला दबदबा कायम ठेवला आहे. 100 मीटर धावण्याच्या शर्यतीचे अंतर अवघ्या 9.91 सेंकदाच्या वेळात पुर्ण करून पॉवेलला पिछाडीवर टाकून अमेरिकेतील डायमंड लीगमध्ये चमकदार कामगिरी केली. या स्पर्धेत पावेलने दिलेले अंतर 9.93 सेंकदात पुर्ण करून दुसऱ्या क्रमांकाचा बहुमान पटकावला.
  May 28, 07:04 PM
 • दिल्ली गत आठवड्यापासून फुटबॉल स्पर्धेत मॅच फिक्सिंगमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक भ्रष्टाचार झाल्याच्या आरोपांची चर्चा होत आहे. या प्रकरणात हात असल्याचे करण्यात येत असलेल्या आरोपांचे फिफाचे अध्यक्ष बिन हम्माम यांनी आरोप फेटाळून लावले. दिल्ली गत आठवड्यापासून फुटबॉल स्पर्धेत मॅच फिक्सिंगमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक भ्रष्टाचार झाल्याच्या आरोपांची चर्चा होत आहे. या प्रकरणात हात असल्याचे करण्यात येत असलेल्या आरोपांचे फिफाचे अध्यक्ष बिन हम्माम यांनी आरोप फेटाळून लावले. त्यामुळेच हे...
  May 27, 01:24 PM
 • किंगदानो - भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू सायना नेहवालने महिला एकेरीत अव्वल मानांकित चीनच्या वांग जीनला २१-१५, २१-११ गुणांच्या आघाडीने पराभवाची धूळ चारत सुदीरमन चषक विजयी आघाडी घेतली. महिला ऐकरीत सायनाविरुद्ध वांग जीन यांच्यामध्ये शर्थीची लढत झाली. पहिल्या सेटवर सायनाने आक्रमक प्रदर्शन करून वांग जीनवर २१-१५ च्या गुणांनी बाजी मारली. याच आव्हानाला राखून ठेवणाऱ्या सायनाने दुसऱ्या सेटवरही आक्रमक खेळीचे प्रदर्शन केले. वांग जीनला २१-११ च्या आघाडीने पराभवाची धूळ चारून सायनाने स्पर्धेतील...
  May 27, 01:07 PM
 • पॅरिस - भारताची टेनिसपटू सानिया मिर्झाला फ्रेंच ओपनमध्ये दुसऱ्या फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. पोलंडच्या ऍग्नेयस्का रॅडवान्स्का हिने सायनियाचा ६-२, ६-४ असा सरळ सेटमध्ये पराभव केला. सानियाच्या पराभवामुळे भारताचे स्पर्धेच्या महिला एकेरीतील आव्हान संपुष्टात आले आहे.७२व्या मानांकित सानियापेक्षा १२व्या मानांकित रॅडवान्स्काचं पारडं निश्चितच जड होतं. त्यानुसारच तिने सामन्यावर वर्चस्व गाजविले. पहिल्या सेटमध्ये पार निष्प्रभ ठरलेल्या सानियाने दुस-या सेटमध्ये थोडा प्रतिकार केला, पण...
  May 26, 09:09 PM
 • पॅरिस - फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीतील अटीतटीच्या लढतीत अव्वल मानांकित टेनिसपटूंनी सलामीच्या विजयी खेळीला उजाळा देत तिसऱ्या फेरीत धडक मारली आहे.पुरुष एकेरीत मानांकित रोजर फेडररपाठोपाठच महिला एकेरीत कैरोलीन वोझानिकी, संमथा स्टोसुर या आघाडीच्या टेनिसपटूंनीही शर्थीची झुंज देऊन तिसऱ्या फेरीत स्थान मजबूत केले आहे. एकेरीतील लढतीत वोझानिकीविरुध्द वोझानिकची खेळी अधिकच झुंजली होती. अखेर आपल्या आक्रमक खेळीच्या बळावर वोझानिकीने विजयी खेळी करून नवख्या वोझानिकला पराभवाची...
  May 26, 06:03 PM
 • फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या मिश्र दुहेरी भारताच्या लिएँडर व महेश भुपती या जोडीने शानदार विजय संपादन करून दुसऱ्या फेरीत धडक मारली. पेसने मिश्र दुहेरीतील साथीदार इव्हेटासोबत चमकदार कामगिरी करून फ्रेच टेनिसपटू रेझई व डिम्नीटोव्हाला 6-3,6-1 ने पराभवाचा धक्का दिला.तर,महेश भुपती व चीन टेनिसपटू झेंग याजोडीने 6-7(3-7), 6-0,10-8 गुणांनी बाजी मारून पेक्ट्रोव्हा-सेर्जिया जोडीचा पराभव केला.
  May 26, 05:58 PM
 • ब्रुसेल्स - इटालियन ओपनचे अजिंक्यपद पटकावणारी आघाडीची टेनिसपटू वोझानिकने महिला एकेरीच्या अंतिम लढतीत चीनच्या पेंग शुईला २-५, ६-३, ६-४ गुणांनी पराभवाची धूळ चारत ब्रुसेल्स ओपन टेनिस स्पर्धेच्या विजेतेपदाचा बहुमान पटकावला. आठवडाभरात वोझानिकने शानदार सुवर्ण कामगिरीचा योग साधला. बुसेल्स ओपन टेनिस स्पर्धेच्या विजेतेपदासाठी महिला एकेरीत वोझानिक विरुद्ध पेंग यांच्यात अटीतटीची लढत झाली. पहिल्या सेटवर वोझानिकच्या आक्रमणाला व्यवस्थित परतावून लावत पेंगने ६-२ गुणांनी बाजी मारत आघाडी घेतली...
  May 23, 01:30 PM
 • पॅरिस : गेतवेळची महिला उपविजेती ऑस्ट्रेलियाची सामंता स्टोसूर आणि पुरुष गटात सातवा मानांकित स्पेनचा डेव्हिड फेरर यांनी फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. मात्र, याच वेळी क्रोएशियाचा मारिन सिलिच आणि इस्रायलची सहर पीर यांना पहिल्याच फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. आठव्या मानांकित स्टोसूरने चेक गणराज्याच्या इवेता बेनेसोवा हिला सरळ सेटमध्ये ६-२, ६-३ ने पराभूत केले. दुसऱ्या फेरीत तिचा सामना रशियाच्या ऍना कुद्रिवत्सेवाशी होईल. तिने पहिल्या फेरीत रोमानियाच्या...
  May 23, 01:28 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात