जाहिरात
जाहिरात
Home >> Sports >> Other Sports

Other Sports News

 • अॅमस्टरडम- जगात नेदरलँड्सला सर्वात स्लिम व निरोगी देशाचा बहुमान प्राप्त आहे. येथील नागरिकांचे तंदुरुस्त राहण्याचे सूत्र म्हणजे रोज सरासरी तीन ते चार ग्लास दूध, २०० ग्रॅम भाजी, २०० ग्रॅम फळे व सात किमी सायकलिंग करणे हे आहे. याच कारणास्तवर नेदरलँड दरडोई दूध वापरात तिसरा सर्वात मोठा देश आहे. भाजी व फळामुळे रक्तदाबासोबत हृदयविकाराशी संबंधित आजाराचा धोका कमी होतो. सरकारने आहाराच्या मार्गदर्शक तत्त्वात प्रथिने, कार्बाेदके व लोहयुक्त पदार्थांनाही ठेवले आहे. येथे १९८६ मध्ये आहारासाठी...
  January 26, 08:49 AM
 • delete
  January 25, 10:16 AM
 • जकार्ता- भारताच्या तीन प्रतिभावंत खेळाडूंनी गुरुवारी इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. यामध्ये दुसऱ्या मानांकित सिंधूसह आठव्या मानांकित सायना आणि के. श्रीकांतचा समावेश आहे. या तिघांनी आपापल्या गटाच्या सामन्यात शानदार विजयाची नोंद केली. दुसरीकडे मनू अत्री आणि सुमीत रेड्डीला पराभवाचा सामना करावा लागला. यामुळे भारताचे दुहेरीतील आव्हान संपुष्टात आले. भारताच्या जोडीला पाचव्या मानांकित किम आणि एंडर्सने पराभूत केले. त्यांनी २१-१४, १७-२१, २१-१० ने सामना...
  January 25, 10:14 AM
 • लंडन- स्पेनचा रिअल माद्रिद हा जगातील आता सर्वात श्रीमंत फुटबॉल क्लब ठरला आहे. या क्लबने आतापर्यंत २०१७ ते २०१८ दरम्यान ६०७५ कोटींचा महसूल जनरेट केला. यामुळे या क्लबला आपला दबदबा कायम ठेवता आला. यासह या क्लबला टॉप-१० मध्ये अव्वल स्थानावर धडक मारता आली. त्यापाठोपाठ स्पेनच्याच बार्सिलोना क्लबने दुसऱ्या स्थानावर धडक मारली आहे. गतवर्षी अव्वल स्थानावर असलेल्या मँचेस्टर युनायटेड क्लबला धक्का बसला. या क्लबची आता क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर घसरण झाली. या क्लबचा महसूल हा ५३८० कोटींचा आहे....
  January 25, 08:53 AM
 • मेलबर्न- सत्रातील पहिल्या ग्रँडस्लॅम किताबासाठी आता नाओमी ओसाका आणि पेत्रा क्वितोवा झुंजणार आहेत. या दोघांनी गुरुवारी ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेची फायनल गाठली. या दोघींनी पहिल्यांदा या स्पर्धेच्या अंतिम फेरीतील प्रवेश निश्चित केला. त्यामुळे आता या दोघी महिला एकेरीच्या विजेतेपदासाठी समोरासमोर असतील. या फायनलमधील विजेत्या खेेळाडूला जगातील नंबर वन खेळाडू होण्याची संधी आहे. माजी नंबर वन राफेल नदालने पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीचा पल्ला गाठला. त्याने सितसिपासचा पराभव केला. यासह...
  January 25, 08:44 AM
 • सुरत-राजस्थानचा जसवंतसिंह (२६)याच्या डाव्या पायाची जन्मत:च वाढ झालेली नाही. परंतु तो अष्टपैलू क्रिकेटपटू म्हणून गाजतो आहे. तो बाॅलिंग, बॅटिंग व फील्डिंग उत्कृष्ट पद्धतीने करतो. तो पॅरालॉम्पिक क्रिकेट सामने तर खेळतोच, शिवाय सर्वसाधारण क्रिकेटमध्येही सहभागी होतो. त्याचा खेळ पाहून इंग्लंडमध्ये जून २०१९ मध्ये अपंगाच्या वर्ल्ड कप क्रिकेटमध्ये भारतीय संघात त्याची निवड करण्यात आली आहे. तो राजपुरोहित राजस्थानी संघात सध्या खेळतो आहे. अफगाणविरोधात खेळला जसवंतने २०११ मध्ये झालेल्या ओपन...
  January 24, 10:50 AM
 • मेलबर्न- ऑस्ट्रेलियन ओपनचा सहा वेळेचा विजेता राहिलेल्या नोवाक योकोविकने या स्पर्धेत सातव्यांदा आणि एकूण ३४ व्या वेळी ग्रँडस्लॅमच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. योकोविकने सामन्याच्या सुरुवातीपासूनच दबावात होता. तो पहिल्या सेटमध्ये ०-३ ने पिछाडीवर पडला होता. या जपानच्या खेळाडूने ट्रेनरलादेखील बोलावले, मात्र पहिला सेट ३१ मिनिटांत गमावला. पहिल्या सेटमध्ये निशिकोरीने वैद्यकीय मदत घेतली, मात्र त्याचा फायदा झाला नाही. त्याला पराभवाचा सामना करावा लागला. दुसऱ्या सेटमध्ये निशिकोरीने १-४...
  January 24, 09:20 AM
 • मुंबई- मल्लखांब ही पारंपरिक कला किंवा सध्याचा क्रीडाप्रकार. मूळचा महाराष्ट्राचा. महाराष्ट्राच्या अस्मितेच्या गोष्टी करणाऱ्यांना या खेळाचे महत्त्व कधीच कळले नाही. त्यामुळे राज्य सरकारने या खेळाला कधीच मदतीचा हात दिला नाही. उदय देशपांडे नामक एका व्यक्तीने मात्र आपलं आयुष्यच या खेळाच्या प्रचार व प्रसारासाठी वेचलं. तब्बल ५२ देशांमध्ये दोरीवरचा आणि खांबावरचा मल्लखांब घेऊन ते त्या देशांमध्ये गेले. कालपरवा ते मलेशियातील मल्लखांब प्रचार दौरा आटोपून आले. मुस्लिम देशांमध्ये या खेळाला कसे...
  January 24, 09:18 AM
 • मेलबर्न- माजी नंबर वन राफेल नदालसह चेक गणराज्यची पेत्रा क्वितोवा, कोलिनने आपली विजयी मोहीम अबाधित ठेवताना मंगळवारी ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. दुसरीकडे पाच वेळच्या ग्रँडस्लॅम मारिया शारापोवाचा पराभव करणाऱ्या अॅश्ले बार्टीचे आता स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. तसेच भारताच्या लिएंडर पेसलाही पराभवाचा धक्का बसला. त्यामुळे त्याचा मिश्र दुहेरीत किताब जिंकण्याचा प्रयत्न अपयशी ठरला. पेत्रा क्वितोवाने महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व सामन्यात रोमहर्षक विजयाची...
  January 23, 09:29 AM
 • मेलबर्न- सेरेना विल्यम्ससह नोवाक योकोविक आणि रोमानियाच्या सिमोना हालेपने शनिवारी ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या प्री-क्वार्टर फायनलमध्ये धडक मारली. ओसाका, स्वितलोना व केई निशिकोरीनेही आगेकूच कायम ठेवली. अव्वल मानांकित योकोविकने पुरुष एकेरीच्या लढतीत कॅनडाच्या डेनिस शापोवालोवचा पराभव केला. त्याने दोन तास २२ मिनिटे रंगलेली मॅरेथाॅन लढत ६-३, ६-४, ४-६, ६-० ने जिंकली. आता त्याचा सामना रशियाच्या मेदवेदेवशी होईल. नंबर वन सिमोना हालेपने महिला एकेरीच्या सामन्यात व्हीनसवर मात केली....
  January 20, 09:32 AM
 • पुणे- खेलो इंडिया यूथ गेम्समध्ये महाराष्ट्राच्या शिलेदारांची सुवर्णमय घोडदौड सुरू आहे. शनिवारी टेनिसमध्ये प्रेरणा विचारे, बॉक्सिंगमध्ये निखिल दुबे यांनी खात्यात सुवर्णपदकांची भर घातली. तसेच टेबलटेनिसपटू चिन्मयने दुहेरी मुकुटाचा बहुमान पटकावत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यामुळे टीमच्या नावे दाेन पदकांची नाेंद झाली. या कामगिरीमुळे महाराष्ट्राच्या खात्यात ८२ सुवर्णांसह तब्बल २१७ पदके जमा झाली आहेत. यामुळे खेलो इंडियात महाराष्ट्रच अव्वल ठरला आहे. गेल्या ११ दिवसांपासून सुरू...
  January 20, 09:04 AM
 • पुणे- खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्राची सुवर्णमय विजयी मोहीम कायम आहे. शुक्रवारी १७ वर्षांखालील स्पर्धेत महाराष्ट्राच्या बाॅक्सरने गोल्डन पंच मारला. यासह यजमानांनी बाॅक्सिंगमध्ये पाच सुवर्ण, एक रौप्य पटकावले. टेनिसमध्ये महाराष्ट्राने दोन सुवर्ण, एक रौप्य पटकावले. या कामगिरीमुळे महाराष्ट्राच्या खात्यात ७५ सुवर्णपदकांसह १९५ पदके जमा झाली. मात्र बास्केटबॉल, व्हॉलीबॉलमध्ये महाराष्ट्राला पराभवाचा सामना करावा लागला. पुणे येथील शिवछत्रपती क्रीडानगरी येथे सुरू असलेल्या खेलो इंडिया...
  January 19, 11:28 AM
 • पुणे- सांस्कृतिक कार्यक्रमात नृत्याचा अप्रतिम आविष्कार करणारी पावलं ही केवळ वडिलांच्या आवडीमुळे बाॅक्सिंगच्या रिंगमध्ये वळली आहे. यातील मेहनतीच्या बळावर गोल्डन पंच मारून खेलो इंडिया यूथ गेममध्ये चॅम्पियन होण्याचा बहुमान पटकावला, हा संघर्षमय प्रवास आहे पुण्यातील प्रसिद्ध नृत्यांगना आणि १३ वर्षीय बाॅक्सर देविका घोरपडेचा. तिने अव्वल कामगिरीच्या बळावर शुक्रवारी गोल्डन पंच मारला. यासह ती महिलांच्या गटात सुवर्णपदकाची मानकरी ठरली. हरियाणाच्या बॉक्सर सोबत सुवर्णपदकासाठी रंगलेल्या...
  January 19, 10:00 AM
 • क्वालालंपूर- माजी नंबर वन सायना नेहवालने यंदाच्या सत्रात किताब जिंकण्याच्या आपल्या मोहिमेला कायम ठेवले. यासह तिने गुरुवारी मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली. दुसरीकडे पी.कश्यपला पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे त्याचे आव्हान संपुष्टात आले. श्रीकांतने पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीतील आपला प्रवेश निश्चित केला. सातव्या मानांकित श्रीकांतने शर्थीची झुंज देताना एक तास चार मिनिटांत वोंग विंगवर मात केली. त्याने २३-२१, ८-२१, २१-१८ ने सामना जिंकला. कश्यप...
  January 18, 09:15 AM
 • पुणे- युवा संघांनी आपापले वर्चस्व अबाधित ठेवताना मराठमोळ्या खो-खो खेळात यजमान महाराष्ट्राच्या संघाला गुुरुवारी खेलो इंडिया यूथ गेम्समध्ये सोनेरी यश मिळवून दिले. याच अव्वल कामगिरीच्या बळावर महाराष्ट्राने स्पर्धेत गोल्डन चाैकार मारला. महाराष्ट्राचे १७ आणि २१ वर्षांखालील पुरुष-महिला संघ एकाच दिवशी स्पर्धेत चॅम्पियन ठरले. या संघांनी ९ तासाच्या अंतरात चारही गटात सुवर्णपदकांची कमाई केली. यासह टीमला आपला दबदबा कायम ठेवता आला. महाराष्ट्राच्या युवा संघांनी १७ वर्षांखालील मुले आणि...
  January 18, 09:09 AM
 • बॉक्सिंग रिंगमध्ये एका पंचने प्रतिस्पर्धीला चित करणाऱ्या द ग्रेट मोहम्मद अली जगभरात बॉक्सिंग आयकॉन आहेत. अमेरिकेच्या या महान बॉक्सर मोहम्मद अलीचा जन्म 17 जानेवारी 1942 ला केंटकी येथे झाला होता. लहानपणी अली आई-वडिलांनी त्याचे नाव कॅसिअस क्ले ठेवले होते. परंतु नंतर त्यांच्या आयुष्यात असे काही झाले की ते इस्लाम धर्म स्वीकारून आपले नाव मोहम्मद अली असे केले. मोहम्मद अली कसे बनले बॉक्सर? मोहम्मद अली यांच्या कारकिर्दीची सुरुवात मोठी नाट्यमय होती. १९५४ साली एका दिवशी अलीची सायकल चोरीस गेली;...
  January 17, 11:48 AM
 • पुणे- खेलो इंडियात खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राने आपली प्रबळ दावेदारी सिद्ध केली आहे. महाराष्ट्राने खो-खो मुलांच्या १७ वर्षांखालील उपांत्य लढतीत तामिळनाडूचा १२-६ असा एक डाव सहा गुणांनी पराभव केला. त्या वेळी त्यांनी पूर्वार्धात १२-२ अशी आघाडी घेतली होती. महाराष्ट्राचा अंतिम सामना आंध्र प्रदेशच्या संघाशी होणार आहे. मुलींच्या १७ वर्षांखालील गटात महाराष्ट्राने अंतिम फेरीत स्थान मिळवताना पंजाबचा ७-६ असा पाच मिनिटे राखून पराभव केला. महाराष्ट्राला विजेतेपदासाठी दिल्ली संघाशी खेळावे लागणार...
  January 17, 09:35 AM
 • पुणे- तिळगूळ घ्या गोड गोड बोला असा सर्वत्र संक्रांतीचा उत्साह असताना औरंगाबादच्या हर्षदाने नेमबाजीमध्ये मंगळवारी सुवर्णवेध घेत संक्रांतीचा गोडवा वाढवला.याचबरोबर जलतरणामध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंनी आज ५ सुवर्णपदके पटकावली. या सुवर्ण कामगिरीमुळे महाराष्ट्राने ६४ सुवर्णंपदकांसह १७७ पदकांची कमाई करत पदकतालिकेतील अग्रस्थान अबाधित ठेवले आहे. यादरम्यान औरंगाबादच्या क्रीडा प्राधिकरणात जिम्नॅस्टिककरिता नवीन संकुल उभारले जाणार असल्याची माहिती प्राधिकरणाच्या संचालिका नीलम कपूर...
  January 16, 08:56 AM
 • पुणे- खेलो इंडिया यूथ गेम्स स्पर्धेत खेळाडूंच्या दमदार कामगिरीच्या जोरावर महाराष्ट्र संघाची सुवर्णपदकरूपी पतंगाने आकाशात उंच भरारी घेतली आहे. या उंचावलेल्या कामगिरीमुळे महाराष्ट्राने पदकतालिकेत मानाचे स्थान गाठले आहे. यजमान संघाने सोमवारी वेटलिफ्टिंगमध्ये एक सुवर्ण, तर स्विमिंगमध्ये दोन, तीन रौप्य व दोन कांस्य पटकावले, तर आपल्या लौकिकानुसार १७ वर्षांखालील व २१ वर्षांखालील गटात खो-खोच्या संघाने आपले वर्चस्व कायम ठेवले. यामुळे महाराष्ट्राच्या खात्यात ५९ सुवर्णांसह १६४ पदकांची...
  January 15, 08:57 AM
 • स्पोर्ट्स डेस्क- जलतरणात केनिशा गुप्ता व अपेक्षा फर्नांडिसने सुवर्ण, आकांक्षा, रुद्राक्ष, शेरॉनने रौप्य तर साहिल, साध्वीने कांस्यपदक मिळवले. अपेक्षाने १७ वर्षांखालील २०० मीटर्स बटरफ्लाय शर्यतीत २ मिनिटे २७.५४ सेकंदांत सुवर्ण पटकावले. ५० मीटर्स फ्रीस्टाइल शर्यत केनिशाने २७.२८ सेकंदांत जिंकली. २१ वर्षांखालील गटात आकांक्षाने २०० मीटर्स बटरफ्लायमध्ये रौप्य पटकावले. शेरऑनचे सुवर्ण हुकले : राजस्थानच्या फिरदोस कायमखानीने २ मिनिटे ३४.११ सेकंद वेळ नोंदवत सुवर्ण पटकावले. याच वयोगटातील ५०...
  January 15, 08:54 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात