जाहिरात
जाहिरात
Home >> Sports >> Other Sports

Other Sports News

 • पुणे- खेलो इंडिया यूथ गेम्समध्ये राष्ट्रीय पातळीवरील नामांकित प्रतिस्पर्ध्यांचे आव्हान पेलत तेलंगणाच्या १६ वर्षीय धनुष श्रीकांतने (१६) १० मीटर एअर रायफल स्पर्धेत १७ वर्षांखालील गटात रविवारी सुवर्णपदकाचा वेध घेतला. धनुषची ही कामगिरी आणि जिद्द अधिक कौतुकास्पद ठरली, कारण जन्मत:च कर्णबधिर आणि स्पष्टोच्चाराचा अभाव अशा व्यंगावर मात करत त्याने हे यश मिळवले. मुलाच्या व्यंगामुळे धनुषचे वडील चिंताक्रांत असत. यादरम्यान त्याच्या कानावर शस्त्रक्रिया झाली आणि मशीन बसवल्यावर ऐकू येऊ लागले....
  January 14, 05:51 AM
 • पुणे- यजमान महाराष्ट्र संघाने आपला दबदबा कायम ठेवताना खेलो इंडिया यूथ गेम्समध्ये शनिवारी पदकांचे शतक साजरे केले. यासह महाराष्ट्र संघाचे वर्चस्व अबाधित राहिले. यादरम्यान आता महाराष्ट्राच्या नावे ११६ पदकांची नाेंद झाली. यात ४१ सुवर्ण, ३३ राैप्य अाणि ४२ कांस्यपदकांचा समावेश आहे. याच स्पर्धेत राजस्थानचे प्रतिनिधित्व करत असलेल्या मानवआदित्य राठाेडने सुवर्णपदकाचा वेध घेतला.त्याने शाॅर्टगन ट्रॅप प्रकारात हे साेनेरी यश मिळवले. ताे ऑलिम्पियन पदक विजेते आणि केंद्रीय क्रीडा मंत्री...
  January 13, 08:40 AM
 • महाराष्ट्रातील सांगलीची रूपा हनगंडी हिने २१ वर्षांखालील महिलांच्या ५९ किलो गटात सोनेरी वेध घेतला. तिने स्नॅचमध्ये ८३ किलो वजन उचलताना पश्चिम बंगालच्या सुकर्णा आदक हिने नोंदवलेला ८१ किलो हा विक्रम मोडला. तिने क्लीन व जर्कमध्ये १०३ किलो असे एकूण १८६ किलो वजन उचलले आणि सुवर्णपदक जिंकले. हरियाणाच्या मोहिनी चव्हाण हिने अनुक्रमे ८२ किलो व ९९ किलो असे एकूण १८१ किलो वजन उचलून रुपेरी कामगिरी केली. आदकला येथे कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. तिने स्नॅचमध्ये ८१ किलो तसेच क्लीन व जर्कमध्ये ९६...
  January 12, 09:24 AM
 • पुणे- राष्ट्रीय विक्रमवीर युवा धावपटू तेजस शिर्सेने शुक्रवारी खेलाे इंडिया यूथ गेम्समध्ये पदकाची कमाई केली. ताे या स्पर्धेत राैप्यपदकाचा मानकरी ठरला. पहिल्यांदाच सहभागी हाेताना त्याने पदकाला गवसणी घालण्याचा पराक्रम गाजवला. त्याने १७ वर्षांखालील मुलांच्या ११० मीटर अडथळा शर्यतीमध्ये दुसरे स्थान गाठले. त्याने १४.४८ सेकंदांत ही शर्यत पूर्ण केली. यासह त्याने २० दिवसांनंतर सलग दुसऱ्या पदकाची कमाई केली. त्याने १९ डिसेंबर राेजी ६४ व्या राष्ट्रीय स्पर्धेत विक्रमासह सुवर्णपदक पटकावले...
  January 12, 09:19 AM
 • पुणे- आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रीडा क्षेत्रातली पदके भारतासाठी आजही दुर्मिळ असल्याचे वास्तव सध्याच्या केंद्रीय क्रीडामंत्री राजवर्धन राठोड यांच्यापेक्षा जास्त कोणाला जाणते? शूटिंगमध्ये सन २००४ च्या ऑलिम्पिक पदकासह आंतरराष्ट्रीय पातळीवरची एकूण २५ पदके जिंकलेला ऑलिम्पिकवीर क्रीडामंत्री राठोड यांच्या रूपाने देशाला पहिल्यांदाच लाभला. आंतरराष्ट्रीय स्तरावरील भारताचा पदकांचा दुष्काळ संपवण्यासाठी राठोड यांनी खास प्रयत्न सुरू केले आहेत. त्यांची खरी नजर आहे ती २०२० टोकियो...
  January 12, 08:58 AM
 • स्पोर्ट्स डेस्क-सुनील क्षेत्रीचे वडील लष्करात अभियांत्रिकी विभागात हाेते. लष्कराच्या टीमकडून ते फुटबाॅलही खेळत. वडिलांचा जन्म नेपाळ देशात झाला. अाई सुशीला व जुळी बहिणही फुटबाॅल खेळत हाेत्या. घरी जेवणाच्या टेबलवर फुटबाॅलचीच चर्चा असायची. मात्र बालपणापासूनच सुनीलचा ओढा क्रिकेटकडे हाेता. लाखाे भारतीयांप्रमाणे सुनीलही सचिन तेंडुलकरला आपला आदर्श मानायचा. त्याने घरी क्रिकेट खेळण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा वडिलांना महागडी क्रिकेटची किट खरेदी करणे शक्य नव्हते. त्यामुळे सुनीलने...
  January 12, 08:21 AM
 • औरंगाबाद- औरंगाबादच्या युवा तलवारबाजीपटू तुषार आहेरने गुरुवारी विक्रमी यशाचा पल्ला गाठला. त्याने अमृतसर येथील अखिल भारतीय आंतर विद्यापीठ तलवारबाजी स्पर्धेत दाेन पदकांची कमाई केली. त्याने डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संघाला या स्पर्धेत प्रत्येकी एक सुवर्ण आणि राैप्यपदक मिळवून दिले. त्याने या स्पर्धेत फाॅइलमध्ये सुवर्ण ाणि इप्पी प्रकारात राैप्यपदकाची कमाई केली आहे. विद्यापीठाला ८ वर्षांनंतर सुवर्ण : तुषारने डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संघाला तब्बल...
  January 11, 08:50 AM
 • पुणे- थाेडक्यात दिल्लीत खेलाे इंडियाची चॅम्पियन हाेण्यापासून दुरवण्याचे सल उराशी बाळगली आणि याचा बहुमान मिळवण्यासाठी अहाेरात्र मेहनत घेतली. आणि यातूनच ०.३ च्या हुकलेले सुवर्णपदक आता ०.५ च्या आघाडीने मिळवण्याचा पराक्रम औरंगाबादच्या प्रतिभावंत जिम्नॅस्ट सिद्धीने गाजवला. ती गुरुवारी दुसऱ्या सत्राच्या खेलाे इंडिया यूथ गेम्स स्पर्धेत चॅम्पियन ठरली. तिने अन इव्हन इव्हेंटमध्ये सुवर्णपदक जिंकले. तिने ८.५५ गुणांची कमाई करून हा बहुमान पटकावला. त्यापाठाेपाठ तिची जुळी बहीण रिद्धीने पदकाची...
  January 11, 08:46 AM
 • पुणे- खेलाे इंडियाअंतर्गत स्पर्धेत बुधवारी (दि.८) झालेल्या वेटलिफ्टिंगमध्ये २१ वर्षांखालील गटात महाराष्ट्राच्या शुभम कोळेकर याने ५५ किलो गटात क्लीन व जर्क प्रकारात तब्बल १३९ किलो वजन उचलत यापूर्वी स्वत: नोंदवलेला १३८ किलो हा विक्रम मोडला. तसेच त्याने स्नॅचमध्ये ९७ किलो असे एकूण २३६ किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकावले. शुभम हा सांगलीचा. त्याने यापूर्वी विशाखापट्टणम येथे झालेल्या कनिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेत कांस्यपदक, तर नागपूर येथे नुकत्याच झालेल्या युवा गटाच्या राष्ट्रीय स्पर्धेत...
  January 10, 10:17 AM
 • पुणे- चांगला खेळ करत आपल्या राज्यासाठी पदक मिळवण्याची जिद्द...त्यासाठी गेल्या कित्येक महिन्यांचा केलेला सराव...अन् हजारो किलाेमीटरचा प्रवास करत देशभरातून दा़खल झालेल्या युवा खेळाडूंच्या रूपातून जणू पुण्यातील बालेवाडीच्या क्रीडा नगरीला युवा खेळाडूंच्या कुंभमेळ्याचेच स्वरूप प्राप्त झाले. कुंभरूपी भरलेल्या या खेळनगरीत पुढील ११ दिवस विविध प्रकारच्या १८ खेळांमध्ये तब्बल ६५०० अधिक खेळाडू पदकासाठी मैदानात उतरणार आहेत. देशातील युवा खेळाडूंना व्यासपीठ मिळावे तसेच २०२० ऑलिम्पिकच्या...
  January 10, 10:00 AM
 • औरंगाबाद- चाळीसगाव घाटाचा राजा स्पर्धेत सलग १२ वेळा चॅम्पियन आणि इतर स्पर्धांमधील जेतेपदामुळे सायकलींगच्या क्षेत्रात चरणजित सिंग संघा तीन दशके अधिराज्य गाजवले. मात्र, याच वर्चस्वाला अचानक रेसदरम्यान झालेल्या अपघाताने ब्रेक लागला. हा ब्रेक त्याला काही केल्या स्वस्थ बसू देत नव्हता. अखेर दान वर्षांच्या विश्रांतीनंतर ताे पुन्हा नव्या उमेदीने परतला ताे बीआरएमच्या विक्रमासाठीच. यासाठी त्याने स्वत:च्या हाताने तयार केलेल्या सायकलवरूनच हा पराक्रम गाजवण्याचे ठरवले. यासाठी त्याने स्वत:...
  January 7, 09:29 AM
 • दोहा- जगातील नंबर वन नाेवाक याेकाेविकचे तिसऱ्यांदा चॅम्पियन हाेण्याचे स्वप्न भंगले. त्याला कतार ओपन टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत अनपेक्षितपणे पराभवाचा सामना करावा लागला. किताबासाठी दाेन पावलांवर असलेल्या अव्वल मानांकित याेकाेविकला उपांत्य फेरीत राॅबर्टा बतिस्ता आगुतने पराभूत केले. सातव्या मानांकित आगुतने २ तास ३० मिनिटे शर्थीची झुंज देत ६-३, ६-७, ६-४ अशा फरकाने सनसनाटी विजयाची नाेंद केली. या विजयाच्या बळावर आगुतने पुरुष एकेरीच्या फायनलमध्ये धडक मारली. याच पराभवामुळे दाेन...
  January 6, 10:36 AM
 • अबुधाबी- जगातील सर्वात जुन्या आणि माेठ्या फुटबाॅल चॅम्पियनशिपला आज शनिवारपासून अबुधाबी येेथे सुरुवात हाेत आहे. एएफसी एशियन चषक फुटबाॅल स्पर्धा यंंदा यूएईमध्ये आयाेजित करण्यात आली. या स्पर्धेच्या उद्घाटनाची किक आज अबुधाबीच्या मैदानावर बसणार आहे. या स्पर्धेत यजमान यूएई आणि बहरीन यांच्यात सलामी सामना हाेणार आहे. त्यापूर्वी स्थानिक ६०० कलाकार सांस्कृतिक कार्यक्रमात आपल्या नृत्याविष्काराने उद््घाटन साेहळ्याला रंगत आणणार आहेत. जगभरातील ३० काेटींपेक्षा अधिक चाहते हा उद््घाटनीय...
  January 5, 09:41 AM
 • कतार- जगातील नंबर वन नाेवाक याेकाेविकला गुरुवारी कतार ओपन टेनिस स्पर्धेतील आपले आव्हान कायम ठेवण्यासाठी शर्थीची झुंज द्यावी लागली. मात्र, त्याने पिछाडीनंतरही बाजी मारून राेमहर्षक विजयाची नाेंद केली. यासह त्याने स्पर्धेतील आपले आव्हान राखून ठेवले. सर्बियाच्या याेकाेविकने पुरुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीत हंगेरीच्या मार्टन फुसकाेविक्सवर मात केली. त्याने ४-६, ६-४, ६-१ अशा फरकाने सामना जिंकला. यासह त्याने एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीतील आपला प्रवेश निश्चित केला. आता त्याचा अंतिम आठमधील...
  January 4, 08:43 AM
 • दाेहा- जगातील नंबर वन नाेवाक याेकाेविकने यंदाच्या नव्या सत्राला दमदार विजयाने सुरुवात केली. त्याने कतार ओपन टेनिस स्पर्धेत शानदार विजयी सलामी दिली. त्याने ५५ मिनिटांमध्ये पुरुष एकेरीच्या सलामी सामन्यात दामिर जुमहूरचा पराभव केला. याेकाेविकने ६-१, ६-२ अशा फरकाने एकतर्फी विजयाची नाेंद केली. यासह त्याला आपल्या माेहिमेला चांगली सुरुवात करता आली. यासह त्याच्या नावे आता येथील स्पर्धेत १३ व्या विजयाची नाेंद केली. या ठिकाणी त्याला आतापर्यंत एकाच लढतीत पराभवाचा सामना करावा लागला. दुसरीकडे...
  January 3, 09:58 AM
 • कार्डिफ- टाॅटेनहॅम हाॅट्सपरने आपली माेहीम अबाधित ठेवताना इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये शानदार विजयाची नाेंद केली. या क्लबने लीगमध्ये कार्डिफ सिटीचा पराभव केला. टाॅटेनहॅमने ३-० अशा फरकाने सामना जिंकला. यासह टाॅटेनहॅमने सलग चाैथ्यांदा कार्डिफवर शानदार विजय संपादन केला. यामुळे या क्लबला कार्डिफविरुद्धचा आपला १०० टक्के विजयाचा विक्रमही कायम ठेवता आला. कार्डिस सिटीच्या मैदानावर टाॅटेनहॅमचा हॅरी केन हा प्रतिभावंत खेळाडू चमकला. त्याने दमदार सुरुवात करताना तिसऱ्याच मिनिटाला गाेलचे खाते...
  January 3, 08:56 AM
 • स्पोर्ट्स डेस्क - टेनिस जगतातील दोन सर्वात मोठे स्टार रॉजर फेडरर आणि सेरेना विल्यम्स यांच्यात प्रथमच सामना झाला. ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या होपमॅन कप स्पर्धेच्या मिक्स्ड डबल्स सामन्यात रॉजर फेडरर आणि बेलिंडा बेनसिस यांची जोडी विजयी ठरली. त्यांनी अमेरिकेच्या फ्रान्सेस टिफोई-सेरेना जोडीला सरळ सेटमध्ये पराभूत केले. ही मॅच पाहण्यासाठी 14 हजाराहून अधिक फॅन्स पोहोचले होते. हा स्पर्धेतील एक नवा विक्रम ठरला. यापूर्वी सिंगल्समध्ये सेरेना आणि फेडरर दोघांनी त्यांचे सामने जिंकले होते....
  January 2, 11:14 AM
 • पर्थ/ ब्रिस्बेन- टेनिस विश्वातील राॅजर फेडरर आणि सेरेना विल्यम्स हे दाेघेही दिग्गज मंगळवारी समाेेरासमाेर आले हाेते. या दाेघांमध्ये हाेपमन चषक टेनिस स्पर्धेत मिश्र दुहेरीचा सामना रंगला. स्वीसच्या फेडररने आपली सहकारी बेलिंडासाेबत या सामन्यात फ्रान्सेस आणि सेरेनावर मात केली. त्यांनी ४-२, ४-३ अशा फरकाने मात केली. हा सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये १४ हजार चाहत्यांची खास उपस्थिती हाेती. मरेचे तीन महिन्यांनंतर पुनरागमन तीन वेळचा ग्रँडस्लॅम चॅम्पियन अँडी मरेने आता टेनिस काेर्टवर...
  January 2, 08:57 AM
 • औरंगाबाद- वर्ष २०१८ मध्ये राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या तीन वर्षापासून रेंगाळलेल्या शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. तब्बल १९५ खेळाडू, मार्गदर्शक, प्रशिक्षक, कार्यकर्तांना पुरस्काराने गौरवण्यात आले. यामध्ये बुद्धिबळपटू साक्षी चितलांगे हा पुरस्कार पटकावणारी राज्यातील सर्वात युवा खेळाडू ठरली. १७ वर्षीय साक्षीने वयाच्या १५ व्या वर्षी पुरस्कार पटकावला. ऑलिम्पियन अॅथलेटिक्स ललिता बाबर, टेनिसपटू प्रार्थना ठाेंबरे,राेव्हर दत्तू भाेकनळला पुरस्कार मिळाला....
  December 31, 08:56 AM
 • औरंगाबाद- जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने विभागीय क्रीडा संकुलात आयोजित राष्ट्रीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत यजमान महाराष्ट्र १४ व १९ वर्षांखालील मुला-मुलींच्या संघांनी शानदार विजय मिळवत विजयी सलामी दिली. त्याप्रमाणे केरळ, गुजरात, तेलंगण, तामिळनाडू, पंजाब संघांनी आपापल्या गटात विजयी आघाडी घेतली. यजमान महाराष्ट्र संघाने १४ वर्षे मुलांच्या गटात आयबीएएसओ संघाचा २-० असा पराभव केला. विजेत्या संघाकडून प्रथम वाणी, तेजस शिंदे, सान्विक चौधरीने...
  December 31, 08:51 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात