जाहिरात
जाहिरात
Home >> Sports >> Other Sports

Other Sports News

 • जकार्ता- आशियाई क्रीडा स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी भारताचा १६ वर्षीय नेमबाज सौरभ चौधरीने १० मीटर एअर पिस्टलमध्ये सुवर्णपदक जिंकले. या प्रकारातील हे भारताचे पहिलेच सुवर्ण आहे. यासोबतच तो या प्रकारात एशियाड सुवर्ण जिंकणारा भारताचा पहिला नेमबाज व सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. सौरभने फायनलमध्ये २०१० चा विश्वविजेता ४२ वर्षीय जपानचा नेमबाज तोमोयुकी मत्सुदाला हरवले. २४ राउंडच्या फायनलमध्ये २२ राउंडपर्यंत मत्सुदा सौरभच्या पुढे होता. शेवटच्या दोन राउंडमध्ये सौरभने बाजी उलटवली. सौरभचा...
  August 22, 08:03 AM
 • स्पोर्ट्स डेस्क - भारताची महिला पहिलवान विनेश फोगाट हिने 18व्या आशियाई स्पर्धांमध्ये गोल्ड मेडल मिळवत इतिहास रचला आहे. ही कामगिरी करणारी ती पहिली महिला भारतीय पहिलवान ठरली. यापूर्वी विनेशने 2014 इंचियोन एशियन गेम्समध्ये कांस्य पदक मिळवले होते. पण यावेळी मात्र तिने सुवर्ण कामगिरी करत क्रीडा जगताला तिच्या कामगिरीची दखल घेण्यास भाग पाडले आहे. अडचणींनी भरलेले जीवन लहानपणापासून एशियन गोल्डमध्ये मेडल मिळवण्यापर्यंतचा प्रवास हा विनेशसाठी अत्यंत खडतर ठरला आहे. तिच्या जीवनातील वैयक्तिक...
  August 22, 12:03 AM
 • स्पोर्ट्स डेस्क - टेनिस जगतात कोर्टवर आणि कोर्टाबाहेर अनेक धक्कादायक घटना (Shocking Incident) घडल्या आहेत. एकदा एका टेनिस स्टारवर भर मैदानात मर्डरचा प्रयत्न झाला होता. खरं तर यापेक्षा धक्कादायक घटना स्पोर्ट्स वर्ल्डमध्ये घडल्या आहेत. मात्र, हद्द तर तेव्हा झाली जेव्हा एका महिला टेनिस प्लेयरने सर्वांसमोरच अंडरवियर बदलली होती... पुढील स्लाईड्सवर पाहा, स्पोर्ट्स वर्ल्डमधील आणखी काही Shocking Incidents...
  August 21, 07:24 PM
 • जकार्ता- विनेश फोगाट (२३) आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण जिंकणारी देशातील पहिली महिला ठरली. तसेच एशियाड व राष्ट्रकुल स्पर्धांत सुवर्ण जिंकणारीही ती पहिलीच आहे. ती राष्ट्रकुल महिला कुस्तीत देशाला पहिले सुवर्ण मिळवून देणाऱ्या गीता फोगाटची चुलत बहीण आहे. प्री-क्वार्टरमध्ये विनेशने चीनच्या सुन यानन हिला हरवले. रिओ ऑलिम्पिकमध्ये याच सुनविरुद्ध खेळताना विनेशचा पाय मोडला होता. त्यानंतर वर्षभर विनेश फोगाट कुस्तीपासून लांबच होती. लढतीआधी महावीर फोगाट यांचे ट्विट एक गोष्ट लक्षात ठेव मुली!...
  August 21, 07:06 AM
 • जकार्ता- पहिलवान बजरंग पुनिया याने आपल्या नावाला शोभेल अशी कामगिरी करत १८ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. ६५ किलो वजनगटात फ्रीस्टाइल प्रकारात बजरंगने अंतिम लढतीत जपानच्या दाइची ताकातानीचा ११-८ अशा फरकाने पराभव केला. बजरंगचे आशियाई स्पर्धेतील हे पहिले सुवर्ण आहे. बजरंगने चार वर्षांपूर्वी इंचियोन आशियाई स्पर्धेत ६१ किलो वजनगटात रौप्य पटकावले होते. दरम्यान, अपूर्वी चंदेला आणि रवी कुमार यांनी १० मीटर एअर रायफल मिक्स्ड प्रकारात कांस्यपदक जिंकले आहे....
  August 20, 06:48 AM
 • स्पोर्ट्स डेस्क - अल्टीमेट फायटिंगचे अनडिसप्यूटेड किंग फ्लॉयड मेवेदरजवळ इतका पैसा आहे की, अनेकदा त्याला बॅंकेतून नोटा आणण्यासाठी ट्रकचा वापर करावा लागतो. होय, 4171 कोटी रूपयांच्या संपत्तीचा मालक असलेला मेवेदरला आपल्या बॅंक बॅलन्स आणि कॅशबाबत खूपच प्रेम आहे. तसेच त्याचा खर्चही एवढा आहे आपल्याला ऐकून धक्का बसेल. तो एकदा खर्चासाठी कोट्यावधी रुपये काढतो. कॅशबाबत तो इतका क्रेजी आहे की, तो कोट्यावधी रूपयांची कॅश आपल्या आसपास पसरून ठेवतो. झोपतो सुद्धा नोटांवर... - मेवेदर जेवत असो की कार चालवत...
  August 19, 12:19 AM
 • स्पोर्ट्स डेस्क - भारताचे पहिले ऑलिम्पिकवीर खशाबा जाधव यांच्या रक्तातच कुस्ती होती. 5 वर्षांचे असताना त्यांनी डावपेच शिकण्यास सुरुवात केली. 8 वर्षांचे झाले तेव्हा आपल्या परिसरातील सर्वात जबरदस्त पैलनानाला अवघ्या 2 मिनिटातच चित केले. थोडेशे मोठे झाले तेव्हा भारताच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी सर्व गोष्टी सोडून त्या लढ्यात सहभागी झाले. स्वातंत्र्यानंतर त्यांच्यातील पैलवान पुन्हा जागा झाला. त्याचवेळी त्यांनी शपथ घेतली की जगातील सर्वात मोठी स्पर्धा ऑलिम्पिकमधून भारतासाठी मेडल आणणारच....
  August 14, 01:19 PM
 • नानजिंग (चीन)- जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेली पी.व्ही. सिंधू सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये उपविजेती ठरली. तिला रविवारी या स्पर्धेच्या फायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. यातून तिची सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड चॅम्पियन हाेण्याची संधी हुकली. कॅराेलिना मरीनने महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात सिंधूला पराभूत केले. तिने ४५ मिनिटांत २१-१९, २१-१० ने मात केली. सामना जिंकला. तिने तीन वर्षांनंतर तिसऱ्यांदा हा किताब अापल्या नावे केला. सिंधूचे हे एकुण चाैथे अाणि दुसरे...
  August 6, 08:37 AM
 • बीजिंग - वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्या भारताची बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधु हिने फायनलमध्ये धडक मारली आहे. सिंधुने शनिवारी जपानच्या अकाने यामागुची हिला पराभूत करत हे यश मिळवले. यामागुची हिचा सिंधूने 21-16, 24-22 अशी सरळ सेटमध्ये पराभव केला. फायनलमध्ये सिंधुचा मुकाबला स्पेनच्या कॅरोलिना मारिन हिच्याशी होणार आहे. मारिनने सेमिफायनलमध्ये चीनच्याच बिंगजिआओचा 13-21, 21-16, 21-13 ने पराभव केला. 13व्या वेळा आमने-सामने येणार सिंधु आणि मारीन मारिन आणि सिंधु आतापर्यंत एकमेकींच्या विरोधात 12 वेळा कोर्टात...
  August 4, 08:23 PM
 • नानजिंग- माजी नंबर वन सायना नेहवालला अापली विजयी माेहीम कायम ठेवता अाली नाही. यासाठीचा तिचा प्रयत्न अपुरा ठरला. यामुळे तिचे जागतिक बॅडमिंटन स्पर्धेतील अाव्हान संपुष्टात अाले. याशिवाय भारताच्या स्वस्तिकराज अाणि अश्विनी पाेनप्पालाही स्पर्धेतून पॅकअप करावे लागले. या जाेडीला मिश्र दुहेरीत पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवामुळे सायनाचे पुढच्या फेरीतील प्रवेशाचे स्वप्न भंगले. अव्वल मानांकित झांग अाणि हुयांगने मिश्र दुहेरीच्या लढतीत भारताच्या स्वस्तिकराज अाणि अश्विनीला पराभूत...
  August 4, 08:12 AM
 • संगरूर - भारताचे नाव अख्ख्या जगात चमकवणारे हाकम सिंग (64) सध्या पंजाबच्या एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल आहेत. त्यांची किडनी बिघडली आहे. त्यांनी आपल्या करिअरमध्ये भारतासाठी अनेक पदके कमवली. परंतु, स्वतःसाठी पैसा ते कमवू शकले नाहीत. उपचारासाठी लागणाऱ्या खर्चासाठी सुद्धा त्यांच्याकडे काहीच नाही. त्यांच्या पत्नी अधिकारी आणि सरकारला विनंत्या करून दमल्या आहेत. परंतु, एकही नेता त्यांच्या मदतीला धावून आलेला नाही. एक खेळाडू जेव्हा देशासाठी मेडल आणतो तेव्हा अख्खा देश त्याला आपल्या डोक्यावर...
  July 30, 05:51 PM
 • स्पोर्ट्स डेस्क - आयएएफ वर्ल्ड अंडर-20 मध्ये अॅथलेटिक चॅम्पियनशिपचे सुवर्ण पदक जिंकून भारताचे नाव साऱ्या जगात चमकवणारी हिमा दास हिच्या कोचवर बलात्काराचे आरोप लागले आहेत. हिमा दासचे देश आणि परदेशात जेवढे कौतुक केले जात आहे त्या सर्वांचे श्रेय तिचे कोच निपोन दास यांना जाते. परंतु, त्याच कोचवर आसामच्या एका महिला खेळाडूने लैंगिक शोषणाचा आरोप दाखल केला आहे. 100 आणि 200 मीटर अॅथलेटिक्समध्ये त्या महिलेने निपोन यांच्याकडून गुवाहाटीच्या इंदिरा गांधी स्टेडिअममध्ये ट्रेनिंग घेतली होती. तिने...
  July 30, 12:44 PM
 • ब्लादिवाेस्टाॅक- भारताचा प्रतिभावंत खेळाडू साैरभ वर्मा हा रशिया अाेपन सुपर टूर बॅडमिंटन स्पर्धेत चॅम्पियन ठरला. त्याने पुरुष एकेरीचा किताब पटकावला. त्याने अापल्या करिअरमध्ये पहिल्यांदा या स्पर्धेच्या विजेतेपदाचा बहुमान पटकावला. दुसरीकडे भारताच्या राेहन कपूर अाणि कुहू गर्गने मिश्र दुहेरीत उपविजेतेपद अापल्या नावे केले. त्यांना या गटाच्या फायनलमध्ये पराभवाला सामाेरे जावे लागले. त्यामुळे भारताची ही दुसरी मानांकित जाेडी उपविजेतेपदाची मानकरी ठरली. माजी नॅशनल चॅम्पियन साैरभ...
  July 30, 07:46 AM
 • नवी दिल्ली- विदर्भ संघाला रणजीचा किताब मिळवून देणारा कर्णधार फैज फझल अाता दुलीप करंडक क्रिकेट स्पर्धेत नेतृत्व करणार अाहे. त्याच्याकडे इंडिया ब्ल्यू संघाच्या कर्णधारपदाची जवाबदारी साेपवण्यात अाली. या स्पर्धेत भारताच्या ब्ल्यू, रेड अाणि ग्रीन संघाची साेमवारी घाेषणा झाली. तसेच दक्षिण अाफ्रिका अ संघाविरुद्ध दाेन चारदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी अाैरंगाबादच्या गुणवंत खेळाडू अंकित बावणेची निवड झाली. ताे ४ अाॅगस्टपासून या मालिकेत यजमान भारत अ संघाचे प्रतिनिधित्व करणार अाहे. यासाठी...
  July 24, 09:08 AM
 • बंगळुरू- अाशियाई चॅम्पियन भारतीय संघाने घरच्या मैदानावरील हाॅकी मालिकेत विजयाची हॅटट्रिक नाेंदवली. यजमान भारताने रविवारी पाहुण्या न्यूझीलंड संघाचा तिसऱ्या अाणि शेवटच्या सामन्यात पराभव केला. भारताने ४-० अशा फरकाने एकतर्फी विजयाची नाेंद केली. रुपिंदर पाल सिंग (८ वा मि.), सुरेंदर कुमार (१५ वा मि.), मनदीप सिंग (४४ वा मि.) अाणि अाकाशदीप सिंग (६० वा मि.) यांनी प्रत्येकी एक गाेल करून भारताचा विजय निश्चित केला. न्यूझीलंडच्या खेळाडूंना शेवटपर्यंत सामन्यात एकही गाेल करता अाला नाही. यातूनच या पाहुण्या...
  July 23, 07:38 AM
 • लीड्स- नंबर वन इंग्लंड संघाने घरच्या मैदानावर सरस खेळी करताना मंगळवारी टीम इंडियावर मालिका विजय संपादन केला. यजमानांनी तिसरा अाणि निर्णायक वनडे सामना ८ गड्यांनी जिंकला. यासह इंग्लंड संघाने तीन वनडे सामन्यांची मालिका २-१ ने अापल्या नावे केली. याशिवाय इंग्लंडने घरच्या मैदानावरील सलग दुसऱ्या मालिका पराभवाची नामुष्कीही टाळली. यापूर्वी भारताने तीन टी-२० सामन्यांची मालिका गत अाठवड्यात २-१ ने जिंकली हाेती. अाता भारत अाणि इंग्लंड यांच्यात १ अाॅगस्टपासून पाच कसाेटी सामन्यांची मालिका रंगणार...
  July 18, 08:00 AM
 • माॅस्को- १९९८चा जेता फ्रान्सने २० वर्षांनंतर दुसऱ्यांदा फिफा वर्ल्डकप जिंकला. क्रोएिशयाविरुद्ध फ्रान्सने रविवारी ४-२ असा विजय मिळवला. फ्रान्सकडून एंटोनी ग्रीजमॅन, पॉल पोग्बा, किलियन एम्बापे यांनी गोल केले. क्रोएशियाच्या मारियो मांजुकिचच्या ओनगोलचाही फ्रान्सला लाभ झाला. प्रथमच अंतिम फेरीत दाखल क्रोएिशयाकडून पेरिसिच व मांजुकिच यांनी गोल केले. १९६६ नंतरचा अंतिम फेरीतील हा सर्वात मोठा विजय ठरला. तेव्हा इंग्लंडने प. जर्मनीला ४-२ने हरवले होते. ब्राझीलने १९५८ मध्ये स्वीडनला ५-२ने पराभूत...
  July 16, 06:41 AM
 • माॅस्को- १९९८चा जेता फ्रान्सने २० वर्षांनंतर दुसऱ्यांदा फिफा वर्ल्डकप जिंकला. क्रोएिशयाविरुद्ध फ्रान्सने रविवारी ४-२ असा विजय मिळवला. फ्रान्सकडून एंटोनी ग्रीजमॅन, पॉल पोग्बा, किलियन एम्बापे यांनी गोल केले. क्रोएशियाच्या मारियो मांजुकिचच्या ओनगोलचाही फ्रान्सला लाभ झाला. प्रथमच अंतिम फेरीत दाखल क्रोएिशयाकडून पेरिसिच व मांजुकिच यांनी गोल केले. १९६६ नंतरचा अंतिम फेरीतील हा सर्वात मोठा विजय ठरला. तेव्हा इंग्लंडने प. जर्मनीला ४-२ने हरवले होते. ब्राझीलने १९५८ मध्ये स्वीडनला ५-२ने पराभूत...
  July 16, 05:59 AM
 • सेंट पीटर्सबर्ग- फिफाच्या २१ व्या विश्वचषक फुटबाॅल स्पर्धेच्या फायनलमधील प्रवेशात माजी चॅम्पियन इंग्लंड अाणि बेल्जियम संघ सपशेल अपयशी ठरले. या दाेन्ही बलाढ्य संघांना उपांत्य फेरीत लाजिरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे त्याचे किताबाचे स्वप्न भंगले. मात्र, अाता स्पर्धेत तिसरे स्थान गाठण्याची संधी अाता दाेन्ही संघांना अाहे. शनिवारी सेंट पीटर्सबर्गच्या मैदानावर इंग्लंड अाणि बेल्जियम यांच्यात सामना रंगणार अाहे. हे दाेन्ही संघ तिसऱ्या स्थानासाठी समाेरासमाेर असतील. १९६६...
  July 14, 09:24 AM
 • माॅस्को- जागतिक क्रमवारीत २० व्या स्थानावर असलेल्या क्राेएशियाने फुटबाॅलच्या विश्वातील अनेक तज्ज्ञांचे अंदाज साफ चुकीचे ठरवले. अापल्या सर्वाेत्तम कामगिरीची लय कायम ठेवताना या संघाने पहिल्यांदाच फिफाच्या विश्वचषक फुटबाॅल स्पर्धेच्या फायनलमधील अापला प्रवेश निश्चित केला. क्राेएशियाने बुधवारी रात्री उपांत्य सामन्यात माजी चॅम्पियन इंग्लंडविरुद्ध सनसनाटी विजयाची नाेंद केली. यासह संघाने अतिरिक्त वेळेत २-१ ने हा अटीतटीचा सामना जिंकला. याच लक्षवेधी विजयाच्या बळावर अाता क्राेएशियाने...
  July 13, 08:20 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात