जाहिरात
जाहिरात
Home >> Sports >> Other Sports

Other Sports News

 • मुंबई - गत चॅम्पियन मुंबई इंडियन्स संघ अाता शेवटच्या संधीला सार्थकी लावताना बुधवारी ११ व्या सत्राच्या अायपीएलमधील अापले अाव्हान कायम ठेवण्यासाठी सज्ज अाहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर यजमान मुंबई अाणि अार.अश्विनच्या किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात सामना रंगणार अाहे. सुमार कामगिरीमुळे या दाेन्ही संघांना अापली लय गमवावी लागली. अाता पुन्हा दबदबा निर्माण करताना प्ले अाॅफ प्रवेशाच्या अाशा मजबूत करण्याचा मुंबई अाणि पंजाब संघाचा प्रयत्न असेल. त्यामुळे या सामन्यावर सर्वांची नजर असेल....
  May 16, 03:13 AM
 • मुंबई - युवा कर्णधार अजिंक्य रहाणेने अापल्या कुशल नेतृत्वाच्या बळावर राजस्थान राॅयल्स संघाच्या यंदाच्या अायपीएलमधील प्ले अाॅफ प्रवेशाच्या अाशा कायम ठेवल्या. या टीमने गत सामन्यात गत चॅम्पियन मुंबई इंडियन्सवर धडाकेबाज विजय संपादन केला. राजस्थानची यातील कामगिरी काैतुकास्पद ठरली. मात्र, दरम्यानच्या संथ गाेलंदाजीमुळे राजस्थानचा कर्णधार अजिंक्य रहाणेला कारवाईला सामाेरे जावे लागले. त्याच्यावर समितीने दंडात्मक कारवाई केेली. त्यामुळे त्याला या प्रकरणी १२ लाख रुपयांचा दंड ठाेठावण्यात...
  May 15, 12:58 AM
 • कोलकाता - भारतीय क्रिकेट टीम आयसीसी वनडे क्रमवारीत पहिल्यावरून दुसऱ्या स्थानी घसरली. त्यांच्या क्रमवारीच्या वार्षिक गुणांकनात ३ गुणांचे नुकसान झाले. इंग्लंडला ८ गुणांचा फायदा झाला असून त्याने तिसऱ्या स्थानावरून पहिले स्थान गाठले. इंग्लंडचा (१२५ गुण) संघ २०१३ नंतर पहिल्यांदाच नंबर वन बनला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेने बुधवारी ताजी क्रमवारी जाहीर केली. इंग्लंडने २०१५ - १६ दरम्यान ६३ पैकी ४१ सामने जिंकले आहेत. त्यांनी सहा वनडे मालिका जिंकल्या आहेत. भारतीय क्रिकेट संघाने १२५...
  May 3, 02:15 AM
 • स्पोर्ट्स डेस्क - भारतात क्रिकेटला धर्म आणि क्रिकेटरला देव मानले जाते. तर युरोपियन आणि इतर देशांमध्ये हीच क्रेझ फुटबॉलसाठी दिसून येते. अशाच एका क्रेझी फुटबॉल फॅनचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. या फुटबॉल चाहत्याला एका मैदानाने बॅन केले. कुठल्याही परिस्थितीत मैदानात एंट्री देण्यास नकार दिला. मैदानाने त्याला आत येण्यापासून रोखले. पण, मॅच पाहण्यापासून रोखू शकले नाही. त्याने चक्क मैदानाच्या बाहेर एक भली-मोठी क्रेन लावली. त्याच उंच अशा क्रेनवर बसून त्याने लाइव्ह फुटबॉल मॅच...
  May 2, 12:04 AM
 • वुहान- राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या सायना नेहवाल, रिअाे अाॅलिम्पिक पदक विजेत्या पी.व्ही. सिंधू अाणि नंबर वन के. श्रीकांतने विजयी माेहीम अबाधित ठेवताना गुरुवारी अाशियाई बॅडमिंटन चॅम्पियनशिपची उपांत्यपूर्व फेरी गाठली. दुसरीकडे भारताच्या साईप्रणीतला पुरुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. तसेच अर्जुन अाणि रामचंद्रन श्लाेकचे पुुरुष दुहेरीतील अाव्हान संपुष्टात अाले. अव्वल मानांकित के. श्रीकांतला दुसऱ्या फेरीत विजयी घाेषित करण्यात अाले. त्याच्या...
  April 27, 02:50 AM
 • वुहान- राष्ट्रकुल चॅम्पियन सायना नेहवाल, राैप्यपदक विजेत्या पी.व्ही. सिंधू अाणि के. श्रीकांतने मंगळवारी अाशियाई बॅडमिंटन स्पर्धेतील पदकांच्या अापल्या माेहिमेला दमदार सुरुवात केली. भारताच्या या तिन्ही अनुभवी खेळाडूंनी स्पर्धेत अापापल्या गटात विजयी सलामी दिली. दुसरीकडे अर्जुन अाणि श्लाेकनेही सलामी देत दुहेरीच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.मात्र, साैरभ शर्मा अाणि अनुष्का पारिखला पराभवाचा सामना करावा लागला. रिअाे अाॅलिम्पिक पदक विजेत्या पी.व्ही. सिंधूने महिला एकेरीच्या पहिल्या...
  April 26, 04:57 AM
 • चांगवाेन (द. काेरिया) - भारताचा अनुभवी खेळाडू शहजार रिझवीने मंगळवारी अायएसएसएफच्या नेमबाजी विश्वचषकात राैप्यपदकाची कमाई केली. यासह त्याने भारताला या स्पर्धेत पहिले पदक मिळवून दिले. त्याने पुरुषांच्या १० मीटर एअर पिस्तूल प्रकारामध्ये दुसरे स्थान गाठले. त्याने २३९.८ गुणांसह राैप्यपदक अापल्या नावे केले. अवघ्या ०.२ गुणांनी पिछाडीवर राहिल्याने त्याचे सुवर्णपदक हुकले. भारताच्या २३ वर्षीय रिझवीचे दीड महिन्यात हे दुसरे पदक ठरले. त्यानेे गत महिन्यात (४ मार्च) मेक्सिकाे येथील विश्वचषकात...
  April 25, 02:44 AM
 • मुंबई-राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारतासाठी पदके मिळवण्याचा प्रमुख क्रीडा प्रकार नेमबाजीला अागामी २०२२च्या बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमधून वगळण्यात आल्यामुळे भारतीयांना संताप येणे साहजिकच आहे; मात्र त्यावर त्या स्पर्धांवर बहिष्कार टाकणे हा योग्य पर्याय नाही, असे भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष डॉ. नरिंदर बत्रा यांनी स्पष्ट केले. गेले दोन दिवस आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाक भारताच्या दौऱ्यावर होते. त्या वेळी त्यांनीही यासंदर्भात हस्तक्षेप...
  April 24, 02:22 AM
 • स्पोर्ट्स डेस्क - भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झाला डोहाळे लागले आहेत. तिच्या घरी एक नवीन पाहुणा येणार असल्याची बातमी तिने आपल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये दिली. सानियाने यापूर्वीच म्हटले होते की तिला आणि पती शोएब मलिक दोघांनाही मुलगी हवी आहे. एवढेच नव्हे, तर तिचे अडनाव मिर्झा राहील असे शोएबने ठरवले आहे. तिने ती पोस्ट शेअर केली तेव्हा पाकिस्तानात प्रचंड टीकेला सामोरे जावे लागते. तरीही सानिया आणि शोएब वेळोवेळी आपल्या मनातील गोष्टी सोशल मीडियावर शेअर करतात. अशी शेअर केली गुड न्यूज...
  April 23, 06:41 PM
 • स्पोर्ट्स डेस्क - प्रोफेशनल रेसलिंगचे महाकुंभ मानल्या जाणाऱ्या WWE मध्ये ते सर्वकाही आहे, जे रेसलिंग फॅन्सना आवडते. या शोमध्ये रोमांस, फायटींग, ट्रॅजेडी आणि मनोरंजन या सर्वांचे एक परफेक्ट कॉम्बिनेशन आहे. मात्र असे असतानाही फॅन्सच्या मनात अनेक प्रश्न येत असतात. जसे की- ही फायटींग खरी असते की खोटी, हे सर्व नाटकीय तर नाही ना? मोठा पहिलवान लहान पहिलवानाकडून कसा काय हारतो? फाईटदरम्यान झालेल्या जखमांतून निघालेले रक्त खरे असते की खोटे? इत्यादी अनेक प्रश्न टीव्हीवर WWE पाहाणाऱ्या फॅन्सच्या मनात...
  April 22, 05:12 PM
 • स्पोर्ट्स डेस्क - विराट कोहलीने मुंबईविरोधातील आयपीएल सामन्यात 92 धावांची तुफानी खेळी केली. या खेळीमुळे आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज तो बनला. त्याचबरोबर यंदाच्या पर्वातीलदेखिल सर्वाधिक धावा करणारा फलंदाज तो ठरला. पण त्या मोबदल्यान मिळणारा ऑरेंज कॅपचा सन्मान त्याने नाकारला. त्याचे कारण म्हणजे सामन्यातील काही गोष्टींमुळे तो प्रचंड संतापला होता. सामन्यानंतर बोलताना तर तो ही कॅप फेकून द्यावीशी वाटत असल्याचे म्हणाला. नेमके काय घडले.. मुंबई इंडियन्सने कालच्या...
  April 18, 04:57 PM
 • स्पोर्ट्स डेस्क - वर्ल्ड रेसलिंगच्या लाइव्ह मॅचमध्ये महिला रेसलरला प्रपोज करून एंगेजमेंट करणारा स्टार रेसलर जॉन सीना याचे ब्रेक-अप झाले आहे. विशेष म्हणजे, 5 मे रोजी या दोघांचा विवाह निश्चित होता. पण, लग्नाच्या अवघ्या 2 आठवड्यांपूर्वीच ते एकमेकांपासून दूर झाले आहेत. गतवर्षी एप्रिलमध्ये निकी बेला हिला प्रपोज करून एंगेजमेंट केल्याच्या एका वर्षानंतर अर्थात 14 एप्रिलला त्याने प्रेम आणि माफीचे ट्वीट केले. यानंतर एका अमेरिकन माध्यमाशी संवाद साधताना संबंध मोडल्याच्या वृत्तास अधिकृत दुजोरा...
  April 17, 11:44 AM
 • गाेल्ड काेस्ट- माजी नंबर वन बॅडमिंटनपटू सायना नेहवाल रविवारी २१ व्या राष्ट्रकुल स्पर्धेत दुसऱ्यांदा चॅम्पियन ठरली. तिने एकेरीमध्ये सुवर्णपदक पटकावले. त्यापाठाेपाठ पी.व्ही. सिंधू अाणि नंबर वन के.श्रीकांतने बॅडमिंटनमध्ये प्रत्येकी एका राैप्यपदकाची कमाई केली. बॅडमिंटनपटू चिराग अाणि सात्त्विकने भारताला एेतिहासिक राैप्यपदक मिळवून दिले. यासह भारताने शेवटच्या दिवशी एकूण ७ पदके जिंकली. यामध्ये सायनाच्या एका सुवर्णासह चार राैप्य अाणि दाेन कांस्यपदकांचा समावेश अाहे. या चमकदार कामगिरीसह...
  April 16, 01:03 AM
 • स्पोर्ट्स डेस्क - गोल्ड कोस्ट कॉमनवेल्थ गेम्सचा रविवारी समारोप झाला. यात दिल्लीची 22 वर्षीय मणिका बत्रा भारताकडून सर्वात यशस्वी अॅथलीट ठरली आहे. तिने 4 पदके मिळवली आहेत. सोबतच, या गेमच्या इतिहासात 4 मेडल जिंकणारी ती पहिली महिला प्लेअर ठरली आहे. तिने हे मेडल्स सिंगल्स, वुमेन टीम, वुमेन डबल्स आणि मिक्स्ड डबल्समध्ये जिंकले आहेत. टेबल टेनिससाठी मॉडेलिंग नकारली... - ग्लॅमरस मणिका बत्रा हिला तिच्या लुक्समुळे शाळा आणि महाविद्यालय सुरू असतानाच मॉडेलिंगच्या ऑफर सुरू झाल्या होत्या. काही काळ तिने...
  April 16, 12:04 AM
 • गोल्ड कोस्ट- राष्ट्रकुल स्पर्धेच्या दहाव्या दिवशी भारताने १७ पदके जिंकली. राष्ट्रकुलच्या इतिहासात भारताने आधी कधीही एकाच दिवसात इतकी पदके जिंकली नव्हती. २०१० मध्ये एकाच दिवशी १५ पदके जिंकली होती. टेबल टेनिस एकेरी व भालाफेकीत प्रथमच सुवर्ण मिळाले. भालाफेकीत नीरज चोपडा, टेबल टेनिसमध्ये मणिका बत्रा, बॉक्सिंगमध्ये मेरी कोम, विकास कृष्णन, गौरव सोलंकी, सुमीत व विनेश फोगाटने कुस्तीत, संजीव राजपूतने नेमबाजीत सुवर्ण जिंकले. तसेच भारताने ५ रौप्य, ४ कांस्यपदकेही जिंकली. - ५ वेळची विश्वविजेती...
  April 15, 02:00 AM
 • गोल्ड कोस्ट - कॉमनवेल्थ गेम्समध्ये शनिवारी रेसलर सुमित मलिकने 125 किलो आणि विनेश फोगाटने वुमन्स 50 किलो कॅटेगरीत भारताला गोल्ड मेडल मिळवून दिले. वुमन्स 62 किलोमध्ये साक्षी मलिक आणि मेन्स फ्रीस्टाइल 86 किलोमध्ये सोमवीर यांना ब्राँझ पदक मिळवण्यात यश आले. भारताने आतापर्यंत या स्पर्धेत 54 मेडल जिंकले आहेत. त्यापैकी 23 सुवर्ण पदकं आहेत. भारताने सर्वाधिक 16 पदकं शुटिंगमध्ये जिंकली आहेत. तर रेसलिंगमध्ये आतापर्यंत 12 पदकांची कमाई केली आहे. कोणी कोणते पदक जिंकले - मेन्स फ्रीस्टाइल 125 किलो (नॉर्डिक...
  April 14, 03:19 PM
 • स्पोर्ट्स डेस्क - उत्तर प्रदेशच्या उन्नाव सामूहिक बलात्कार तसेच जम्मू काश्मिरात झालेल्या 8 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कारानंतर हत्या या दोन प्रकरणांवरून देशभर संताप आहे. रस्त्यांवरून सोशल मीडिया पर्यंत सर्वत्र या घटनांचा निषेध केला जात आहे. याच मुद्यावर भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झाने सोशल मीडियावर रोष व्यक्त केला. पण, एका व्यक्तीने तिला पाकिस्तानी म्हणत तिला भारतातील मुद्द्यांवर बोलण्याचा काहीच हक्क नाही असे ट्रोल केले. यावर सानियाने दिलेल्या उत्तराचे कौतुक केले जात आहे....
  April 14, 10:33 AM
 • गाेल्ड काेस्ट- भारताच्या १५ वर्षीय नेमबाज अनीश भनवालने शुक्रवारी राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णवेध घेताना इतिहास रचला. स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा ताे सर्वात युवा नेमबाज ठरला. त्याने २५ मीटर रॅपिड फायर पिस्तूल प्रकारात अव्वल स्थान गाठले. गत अाठवड्यात हाच बहुमान भारताच्या १६ वर्षीय नेमबाज मनू भाकरने पटकावला हाेता. तिला अनीशने मागे टाकले. याशिवाय महाराष्ट्राची अनुभवी नेमबाज तेजस्विनी सावंतने ५० मीटर रायफल थ्री पाेझिशन प्रकारात सुवर्णपदक अाणि अंजुम मुदगिलने राैप्यपदक जिंकले....
  April 14, 12:22 AM
 • - खोलीत नीडल आढळल्याने दोन्ही खेळाडू समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत. - भारतीय अॅथलेटिक्स महासंघाच्या सचिवांच्या मते, राकेश आणि इरफान यांनी ते निर्दोष असल्याचा दावा केला आहे. गोल्ड कोस्ट - कॉमनवेल्थ गेम्समध्ये नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोन भारतीय अॅथलिट्सना भारतात परत पाठवण्यात आले आहे. सीडब्ल्यूजी फेडरेशनचे अद्यक्ष लुइस मार्टिन यांनी सांगितले की, धावपटू केटी इरफान आणि ट्रिपल जंपर व्ही राकेश बाबूला गेम्ससाठी अपात्र ठरवले आहे. इव्हेंटच्या मधूनच त्यांना भारतात परतण्याचे...
  April 13, 11:33 AM
 • गोल्डकोस्ट- बीड जिल्ह्यातील पाटोद्याचा मराठमोळा पहिलवान राहुल आवारेने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत गुरुवारी इतिहास घडवत सुवर्णपदक पटकावले. राहुलने पुरुष गटात ५७ किलो फ्रीस्टाइल प्रकारातील कुस्तीच्या अंतिम सामन्यात कॅनडाच्या स्टीव्हन ताकाहाशीला १५-७ अशी धूळ चारली. त्याचे हे राष्ट्रकुल स्पर्धेतील पहिलेच सुवर्णपदक आहे. स्पर्धेच्या आठव्या दिवशी भारताने २ सुवर्ण, ३ रौप्य आणि २ कांस्यपदकांची कमाई केली. १९ मिनिटांत सुवर्ण राहुलने पहिला सामना ५ मिनिटांत, दुसरा २ मिनिटे, तिसरा व चौथा ६-६...
  April 13, 03:04 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात