आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महागाई:नवीन वर्षांत गाडी खरेदी महागात पडू शकते, एक डझन कंपन्यांनी केली दरवाढीची घोषणा; फायदा उचलण्यासाठी डिलर्स देताहेत सूट

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रेनोच्या 28 हजार, फोर्डच्या गाड्या 35 हजारांपर्यंत महाग होणार

नवीन वर्षांत गाडी खरेदी करणे महागात पडू शकते. मारुती सुझुकी, टाटा मोटर्स, महिंद्रासह एक डझन कार आणि दुचाकी निर्मात्या कंपन्यांनी जानेवारीपासून कारच्या किमतीत वाढ करण्याची घोषणा केली आहे. अशा स्थितीत डिसेंबर अखेर शिल्लक राहिलेल्या दिवसांमध्ये जास्तीत जास्त ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी डिलर्सने ईअर एंड डिस्काउंट देण्याची सुरुवात केली आहे. देशातील सर्वात मोठी कार निर्माती मारुती सुझुकी इंडिया जानेवारी २०२१ पासून आपल्या सर्व मॉडेल्सच्या किमती वाढवत आहे. या वर्षी विविध प्रकारची मॅन्युफॅक्चरिंग खर्च वाढल्याने कंपनीच्या वाहनांच्या किमतीवर विपरित परिणाम झाला आहे. मारुती छोटी कार ऑल्टोपासून मल्टी पर्पज व्हेईकल(एमपीव्ही) विकते. ह्युंदाई मोटर इंडियाने जानेवारीपासून क्रेटासह सर्व मॉडेल्सच्या किमती वाढवण्याची घोषणा केली आहे.डिसेंबर महिनाअखेर गाडी घेण्याची चांगली संधी

डिसेंबरच्या अखेरच्या दिवसात गाडी खरेदीची अपेक्षा ठेवणाऱ्यांसाठी ही एक चांगली संधी आहे. ते या दिवसांत स्वस्त गाडी खरेदी करू शकतात. विविध ऑटो डिलर्सकडे डिसेंबर एंडची डिस्काउंट योजनाही सुरू आहे. डिसेंबरनंतर ही योजना बंद होईल. -विंकेश गुलाटी, अध्यक्ष,फाडा

रेनोच्या २८ हजार, फोर्डच्या गाड्या ३५ हजारांपर्यंत महाग होणार

> रेनो इंडिया पुढील महिन्यापासून कारच्या किमतीत २८,००० रुपयांपर्यंत वाढ करेल.

> फोर्ड इंडियाही विविध मॉडेलच्या किमती जानेवारीपासून ५ हजार ते ३५ हजार रुपये वाढवेल.

> ऑडीनुसार, त्यांच्या गाड्या जानेवारीपासून २% महाग होतील.

> बीएमडब्ल्यूच्या गाड्या ४ जानेवारीपासून २% महाग होतील.

> एमजी मोटर इंडिया नववर्षापासून कारच्या किमतीत ३% पर्यंत वाढ करेल.

> किया मोटर्स सेल्टोस व सोनेट मॉडेलच्या किमती जानेवारीपासून वाढवणार आहे.

बातम्या आणखी आहेत...