• Home
  • Tech auto
  • Auto
  • After the call of the government, the initiative of auto companies to make ventilators, Tata and Mahindra started work on the ground floor

सरकारच्या आवाहनानंतर व्हेंटिलेटर बनवण्यासाठी ऑटो कंपन्यांचा पुढाकार, टाटा आणि महिंद्राने तळगाळात सुरू केले काम

  • दिव्य मराठी विशेष : सरकारने मारुती सुझुकी, टाटा आणि ह्युंडाय सारख्या कंपन्यांशी साधला संपर्क

  • ऑटो कंपन्यांच्या बंद पडलेल्या कारखान्यांत तयार होणार उपकरणे

दिव्य मराठी

Mar 26,2020 10:33:00 AM IST

नवी दिल्ली : कोरोना विषाणूच्या धोका वाढला असताना देशात व्हेंटिलेटर्स आणि वैद्यकीय उपकरणांची कमतरता भरून काढण्यासाठी देशातील प्रमुख ऑटोमोबाइल निर्माते आणि ऑटो पार्ट्स कंपन्यांनी पुढाकार घेतला आहे. केंद्र सरकारच्या आवाहनानंतर कंपन्यांनी उपकरणांच्या निर्मितीला होकार दर्शवला आहे. टाटा आणि एम अँड एमने व्हेटिंलेटर तयार करण्यासाठी कामही सुरू केले आहे.


वृत्तानुसार, देशात लॉकडाऊनची स्थिती असल्यामुळे ऑटो मोबाइल कंपन्यांचे कारखाने बंद आहेत. यामुळे अवजड उद्योग मंत्रालय आणि फार्मास्युटिकल्स विभागाने याचा उपयोग वैद्यकीय उपकरणे तयार करण्यासाठी योजना आखली आहे. आतापर्यंत मारूती सुझुकी, महिंद्रा अँड महिंद्रा, टाटा मोटर्स आणि ह्युंडाय सारख्या कंपन्यांच्या कारखान्यांच्या उपयोगासाठी संपर्क साधला आहे. ऑटोमोटिव्ह कंपोनंट्स मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनचे महासंचालक विन्नी मेहता यांनी सांगितले, अवजड उद्योग मंत्रालयाच्या सचिवांसोबत याविषयी चर्चा झाली आहे. त्यांनी असोसिएशनची चर्चा करून मास्क, सॅनिटायझर आणि व्हेंटिलेटर तयार करण्याबाबत आढावा घेतला आहे. असोसिएशनही आपल्या सदस्यांसोबत याबाबत चर्चा करत आहे. सरकारने विविध निर्देश, नमुने आणि आवश्यक वैद्यकीय साहित्याविषयी माहिती मागितली आहे.


व्हेंटिलेटर बनवण्याला प्राध्यान्य


महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी नुकतेच ट्विटरवरून सांगितले की, कंपनी अशा स्थितीत मदतीसाठी पूर्णपणे तयार आहे. कंपनीचा निर्मिती विभाग आपल्या सुविधांचा वापर व्हेटिंलेटर निर्मितीसाठी करण्याकरिता पूर्ण पूर्ण प्रयत्न करत आहे. तर टाटा सन्सचे अध्यक्ष एन.चंद्रशेखरन म्हणाले, टाटा समूहाने व्हेंटिलेटर निर्मितीला प्राध्याय दिले आहे. यासाठी एक विभाग सुरू करण्याची तयारी आहे. तसेच टाटा रुग्यालयातही लवकरच एक हजार बेडची सोय करण्यात येईल.

X