आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tech auto
  • Auto
  • Alan Musk Says ... India Faces Many Challenges At Government Level For Electric Car Launches, Marathi News

इलेक्ट्रिक कार:एलन मस्क म्हणतात... भारतात सरकारी पातळीवर अनेक आव्हाने, इलेक्ट्रिक कार लाँचिगसाठी आयात शुल्क घटवण्याची मागणी

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

भारतात वाहने लाँच करण्यासाठी आपल्याला सरकारी पातळीवर अनेक आव्हानांचा सामना करावा लागत असल्याचे अमेरिकी कंपनी टेस्लाचे सीईआे एलन मस्क यांनी म्हटले आहे. ते भारतात इलेक्ट्रिक कार लाँचिंगबाबत साेशल मीडियावर विचारण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तर देत होते.

टेस्लाने गेल्या वर्षी भारतात इलेक्ट्रिक वाहनांवर आयात शुल्कात कपातीची मागणी केली होती. त्याच्या उत्तरात टेस्लाने भारतातच ईव्हीचे मॅन्युफॅक्चरिंग करावे, यानंतरच कर सवलतीचा विचार केला जाईल, असे भारत सरकारने स्पष्ट केले होते.

प्रत्यक्षात मस्क यांना त्यांच्या कारवर आयात शुल्कात १०० टक्के सूट हवी आहे. उत्पादनाबाबत ते हमी देत नाहीत. तथापि, टेस्लाने भारतात वाहनांचे मॅन्युफॅक्चरिंग केले तरच कंपनीला योजनेचा फायदा मिळेल. कंपनीच्या दबावात झुकणार नाही, असे सरकारने स्पष्ट केलेले आहे. केंद्र सरकारने नुकतेच ऑटोमोबाइल क्षेत्रासाठी पीएलआय योजना लाँच केली आहे.

टेस्लाच्या मागणीला स्थानिक कार कंपन्यांचा विरोध
टेस्ला या वर्षापासून भारतात आयातीत इलेक्ट्रिक कार विकू पाहत आहे. टेस्लाच्या या मागणीला भारतातील स्थानिक ईव्ही कंपन्याचा विरोध आहे. नुकतेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी टेस्लाला सांगितले होते की, कंपनीने भारतात मेड इन इंडिया कार विक्रीवर लक्ष द्यावे. मात्र मस्क यांना स्थानिक बाजारात आयात कार कशी कामगिरी करतात, हे पाहायचे आहे.

बातम्या आणखी आहेत...