आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबाद:बजाज ऑटो जगातील सर्वात मूल्यवान दुचाकी कंपनी

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बजाज ऑटो लिमिटेड, जागतिक पातळीवर १ लाख कोटी रुपयांचे बाजार भांडवल पार करणारी पहिली दुचाकी कंपनी झाली आहे. बजाज ऑटो लिमिटेडच्या प्रति समभागाचे मूल्य, एनएसईवर(१ जानेवारी २०२१ रोजी) ३४७९ रुपयांवर पोहोचले. यामुळे या मूल्यावर कंपनीचे बाजार भांडवल १००,६७०.७६ कोटी रुपयांपर्यंत पोहोचले. विशेष म्हणजे, बजाज ऑटोने ७५ वर्षे पूर्ण केल्याचा आनंद साजरा करत असताना हा टप्पा गाठला आहे. हे बाजार भांडवल अन्य कोणत्याही दुचाकी वाहन कंपन्यांच्या तुलनेत खूप जास्त आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, जगात कोणत्याही आंतरराष्ट्रीय दुचाकी वाहन कंपनीने आतापर्यंत एक लाख कोटी रुपयांहून जास्त बाजार भांडवल प्राप्त केले नाही. याच पद्धतीने बजाज ऑटो केवळ दुचाकी श्रेणीत सर्वात मूल्यवान कंपनी नाही तर एक लाख कोटी रुपयांहून जास्त बाजार भांडवलावर पोहोचणारी जगातील पहिली दुचाकी कंपनी झाली आहे.

भारतात बजाज ऑटोचा प्रवास ७५ वर्षांपूर्वी सुरू झाला. कंपनीचे पल्सर, बॉक्सर, प्लॅटिना आणि आरईसारखे ब्रँड्स जगभरातील ७० हून अधिक देशांत लोकप्रिय आहेत. हे खऱ्या अर्थाने यास “द वर्ल्ड्‌स फेव्हरेट इंडियन’ बनवतात. ब्रँडची जागतिक पोहोच सतत वाढत आहे. या वर्षी कंपनी थायलंडच्या बाजारात प्रवेश करत आहे. आगामी वर्षात ब्राझीलमध्ये प्रवेश करण्याचे नियोजन आहे. बजाज ऑटोने आपला प्रतिष्ठित ब्रँड चेतक पुनरुज्जीवित केला आणि वर्षाच्या सुरुवातीस एक प्रीमियम, स्टायलिश इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केली आहे. नुकतेच मोटारसायकल आणि इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांच्या प्रीमियम रेंजसाठी चाकण येथे चौथ्या युनिटमध्ये ६५० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणाही केली आहे.

बातम्या आणखी आहेत...