आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
सणासुदीतील मागणीमुळे देशातील बाजारात प्रवासी वाहनांच्या घाऊक विक्रीत नोव्हेंबरमध्ये ४.६५% वाढ होऊन २,६८,९८९ कारपर्यंत पाेहोचली आहे. ही वर्षभरापूर्वी समान अवधीत २,५३,१३९ होती. उत्पादनाच्या आघाडीवरही ४.४७ टक्के वाढ झाली आहे. नोव्हेंबरमध्ये २,९४,५९६ युनिट्सचे उत्पादन झाले. गेल्या वर्षी या अवधीत २,८१,९६९ गाड्यांची निर्मिती झाली होती. वाहन निर्मात्यांची संघटना सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चरर्सकडून (सियाम) शुक्रवारी जारी आकड्यांतून ही माहिती समोर आली आहे.
सियामच्या आकडेवारीनुसार, नोव्हेंबरमध्ये दुचाकीची विक्री १३.४३ टक्के वाढून १६,००३,३७९ युनिट्स राहिली. वर्षभरापूर्वी समान अवधीत दुचाकीची विक्री १४,१०,९३९ वाहने होती. मोटारसायकलची ठोक विक्री १४.९ टक्क्यांच्या वाढीसह १०,२६,७०५ युनिट्स राहिली, जी नोव्हेंबर २०१९ मध्ये ८,९३,५३८ युनिट्स होती. ह्युंदाई, टाटा मोटर्स, किया मोटर्स आणि महिंद्रा अँड महिंद्राच्या कारचीही नोव्हेंबरमध्ये मोठी विक्री झाली. मात्र, रेनो, फोर्ड, निसान, फोक्सवॅगन आणि स्कोडासारख्या कार निर्मात्या कंपन्यांच्या विक्रीत घसरण आली आहे. सियामचे महासंचालक राजेश मेनन यांनी सांगितले की, प्रामुख्याने सणासुदीमुळे नोव्हेंबरमध्ये ठोक विक्रीच्या आकड्यांत वाढ झाली आहे. दुचाकीची किरकोळ विक्री ठोक विक्रीच्या तुलनेत कमी आहे, मात्र, काही अवधीनंतर रिटेल सेल्सचा आकडाही वाढेल. कारण, मूळ उपकरणे तयार करणारे या मुद्द्यावर डिलर्ससोबत काम करत आहेत. सणासुदीमुळे काही क्षेत्रात सुधारणा झाली. आगामी काळात देशाच्या आर्थिक स्थितीवर उद्योगाची कामगिरी अवलंबून असेल.
स्कूटर्सच्या विक्रीत ९.२९% वाढ : स्कूटरची ठोक विक्री गेल्या महिन्यात ९.२९ टक्क्यांसमान ५,०२,५६१ वर गेली. गेल्या नोव्हेंबरमध्ये ४,५९,८९१ स्कूटर विकल्या. तीनचाकीची ठोक विक्री गेल्या महिन्यात ५७.६४% घसरण झाली.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.