आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वाहन क्षेत्राला चांगले दिवस:गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सणासुदीच्या हंगामात 13.6 % जास्त विकल्या कार

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • ट्रॅक्टरच्या विक्रीत जवळपास दीडपट वाढ, फाडाकडून सणासुदीतील वाहन विक्रीची आकडेवारी जाहीर
  • 17 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबरदरम्यान विकल्या 4.31 लाख गाड्या

हे वर्ष सणासुदीत कारच्या रिटेल विक्रीच्या दृष्टीने गेल्या वर्षीच्या तुलनेत चांगले राहिले. १७ ऑक्टोबरपासून ३० नोव्हेंबरदरम्यान ४२ दिवसांच्या अवधीत वाहन वितरकांनी ४,३१,५९७ कार विकल्या. या गेल्या वर्षीच्या सणासुदीच्या हंगामाच्या तुलनेत ५१,६७३ किंवा १३.६०% जास्त आहेत. २०१९ या सणासुदीत ३,७९,९२४ कारची विक्री झाली होती. वाहन वितरकांची संघटना फेडरेशन ऑफ ऑटोमोबाइल डीलर्स असोसिएशनने(फाडा) जारी केलेल्या आकडेवारीनुसार, कोरोना असतानाही प्रवासी वाहनांच्या विक्रीत वाढ दिसली. नवरात्रीत विक्री मंद होती. मात्र, धनत्रयोदशी-दीपावलीदरम्यान मोठ्या संख्येने लोकांनी शोरूममध्ये जाऊन आपल्या आवडीची कार खरेदी केली. ट्रॅक्टरच्या विक्रीत सणासुदीत ४८.७% ची मोठी वाढ दिसली. डीलर्सनी या अवधीत ७३,००३ ट्रॅक्टर विकले. २०१९ च्या सणासुदीत ४९,०९४ ट्रॅक्टर विकले.

नोव्हेंबरमध्ये कार विक्री ४% वाढून २.९१ लाखांपर्यंत

नोव्हेंबरमध्ये प्रवासी वाहनांची रिटेल विक्री वार्षिक आधारावर ४.१७% वाढून २,९१,००१ पर्यंत पोहोचली आहे. वर्षभरापूर्वी समान महिन्यात ही २,७९,३६५ होती. मात्र, नोव्हेंबरमध्ये दुचाकी वाहनांची विक्री २१.४% घटून १४,१३,३७८ राहिली. ही वर्षभरापूर्वी समान महिन्यात १७,९८,२०१ हाेती.

आऊटलूक : डिसेंबरमध्येही तेजी राहण्याची शक्यता

फाडानुसार, सणासुदीचा हंगाम संपला असला आणि पेंट-अप डिमांड नगण्य होत असला तरी यानंतरही डिसेंबर महिन्यात कारच्या विक्रीत वाढ होण्याची शक्यता आहे. कंपन्यांकडून वर्षअखेरीस दिल्या जाणाऱ्या ऑफर्सचा यामध्ये मोठा वाटा असेल. पुरवठा साखळीशी संबंधित अडचणी सोडवल्यास डिसेंबरदरम्यान कारच्या विक्रीत वाढीचा कल सुरू राहू शकतो.

खासगी वाहनांना प्राधान्य; कारची विक्री वाढली

कोरोना महारोगराईमुळे कुटुंबाला येण्या-जाण्यासाठी खासगी वाहनाचा वापर करण्यास जास्त प्राधान्य दिले जात आहे. यामुळे प्रवासी वाहनाच्या विक्रीत दोन आकडी वाढ पाहायला मिळाली. नव्या कार, विशेषत: कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये लाँच दर्शवते की, प्रवासी वाहन श्रेणीत मागणी चांगली आहे. - विंकेश गुलाटी, अध्यक्ष, फाडा

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser