आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
कोरोना विषाणू महारोगराईने साधारण प्रत्यक प्रकरणात जगातील लोकांचा दृष्टिकोन बदलला आहे. वाहनाचा वापर आणि खरेदीच्या विचारात व्यापक बदल केला आहे. कन्सल्टन्सी फर्म अर्न्स्ट अँड यंग(ईवायई)च्या सर्वेक्षणानुसार, ७४ टक्के भारतीय आता स्वत:च्या वाहनातून प्रवास करू इच्छितात. सर्वेक्षणात हीही माहिती समोर आली की, पहिल्यांदा गाडी खरेदी करणारे जवळपास ५७ टक्के खरेदीदार सेकंड हँड वाहन खरेदी करू इच्छितात. आधीपासून गाडी बाळगणारे ५७% लोक आपले वाहन अद्ययावत करू इच्छितात. सर्वेक्षणानुसार, कोरोना महारोगराईमुळे २६ टक्के लोकांनी सध्या गाडी खरेदीचा निर्णय लांबणीवर टाकला आहे. महारोगराईदरम्यान आलेली वित्तीय अनिश्चितता हे त्यामागचे कारण आहे.
आवडीच्या वाहनाच्या प्रश्नावर ईवाई सर्व्हेनुसार ३७ टक्के लोकांना हॅचबॅक श्रेणीपैकी एखाद्या कारची खरेदी करू इच्छितात. दुसरीकडे, २९ टक्के लोक कॉम्पॅक्ट सेडान श्रेणीतील गाडी घेण्याला प्राधान्य देतील. टाळेबंदीआधी झालेल्या सर्वेक्षणात पहिल्यांदा कार खरेदीची इच्छा असणाऱ्या लोकांपैकी ५७ टक्के कार्यालय ते घर येण्या-जाण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य देत होते. मात्र, आता ५६ टक्के लाेक यासाठी स्वत:च्या वाहनाचा वापर करू इच्छितात. ईवाई इंडिया पार्टनर विनय रघुनाथ म्हणाले, सध्या कोरोना विषाणू संकटाने लोकांमध्ये स्वत:चे वाहन खरेदी करण्याच्या भावनेला बळ दिले आहे.कोरोना बचावासाठी फिजिकल डिस्टन्सिंगवर भर दिला जात आहे.
एंट्री लेव्हल आणि कॉम्पॅक्ट कारची जास्त मागणी
रघुनाथ म्हणाले, कार निर्मात्या कंपन्यांना या ट्रेंडवर लक्ष दिले पाहिजे, ज्यात लोकांची पोहोच असणाऱ्या वाहनांची निर्मिती केली जाऊ शकते. ईवाई इंडियाचे एक अन्य पार्टनर सोमल कपूर म्हणाले, आर्थिक अनिश्चितता असतानाही मेट्रो शहरांत राहणारे बहुतांश लोक आता आपले वाहन बाळगू इच्छितात. त्यांच्यासाठी कोरोनासारख्या महारोगराईपासून बचावाला सर्वात मोठे प्राधान्य आहे. यामुळे एंट्री लेव्हल आणि कॉम्पॅक्ट श्रेणीतील वाहनांची मागणी जास्त राहील. असे लोक जे खूप मोठी रक्कम खर्च करू इच्छित नाहीत, ते सेकंड हँड कारला प्राधान्य देऊ शकतात.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.